आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 07:35 IST2025-11-18T07:32:49+5:302025-11-18T07:35:02+5:30

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope - November 18, 2025, Today is a beneficial day for this zodiac sign in terms of financial, social and family matters. | आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी

आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी

मेष - आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल. धनलाभ संभवतो. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवाल. बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल. वाणीवर संयम राखणे आवश्यक आहे. आणखी वाचा

वृषभ  - आजचा दिवस खूप आनंदात जाईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपले काम निर्धारित वेळेत पूर्ण होईल. आर्थिक लाभ संभवतात. अपूर्ण कामे पूर्ण होतील. स्त्रीयांना माहेरहून आनंददायी बातम्या मिळून काही लाभ सुद्धा होईल. आणखी वाचा

मिथुन  - आज शरीर व मन बेचैन राहील. नवीन कार्य सुरू करण्याचा बेत आखाल पण काम सुरू करण्यात अडचणी येतील. मानहानी होण्याची शक्यता आहे. संतती विषयक कामासाठी खर्च करावा लागेल. पचनसंस्येचे विकार बळावतील. आणखी वाचा 

कर्क  - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आज आनंद व उत्साह यांचा अभाव राहील. मन चिंतेने ग्रासलेले व अशांत राहील. घरात भांडणाचे वातावरण असेल. आप्तांबरोबर मतभेद होऊ शकतात. स्त्रियांबरोबर सुद्धा मतभेद व तणाव राहील. आणखी वाचा

सिंह - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आज आरोग्य उत्तम राहील. भावंडांसह आनंदात वेळ जाईल. त्यांच्या कडून फायदा होईल. एखादया सुंदर स्थळाला भेट देण्यास जाल. मित्र भेटतील. कार्य यशस्वी झाल्याने मित्र आनंदीत होतील. भावनिक संबंध प्रस्थापीत होतील.  आणखी वाचा 

कन्या -आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आपल्या गोड बोलण्याने कोणाचेही मन जिंकू शकाल. कामे सफल होण्याची जास्त शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. त्यांच्यासह दिवस आनंदात जाईल. आर्थिक लाभ संभवतात. आरोग्य उत्तम राहील.  आणखी वाचा 

तूळ  - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. रचनात्मक व कलात्मक शक्तीची चमक दिसेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. विधायक कार्य हातून घडेल. खंबीर विचाराने काम पूर्ण कराल. आर्थिक योजना ठरवाल. आणखी वाचा 

वृश्चिक - आज मनोरंजन, आनंद ह्यासाठी पैसा खर्च होईल. चिंता व शारीरिक कष्ट ह्यामुळे आपण त्रासून जाल. एखादा अपघात संभवतो. गैरसमज होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा

धनु -  आर्थिक, सामाजीक व कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी आहे. वैवाहिक जीवनात पूर्णतः आनंद मिळेल. प्रेमाचा सुखद आनंद घेऊ शकाल. मित्रांसह एखाद्या रम्य स्थळी फिरायला जावू शकाल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्याची शक्यता आहे.  आणखी वाचा

मकर - आजचा दिवस संघर्षाचा आहे. आज अग्नी, पाणी व वाहन ह्यापासून एखादा अपघात संभवतो. व्यापारात कार्यमग्न राहाल. व्यापारा निमित्त प्रवास करावा लागेल व त्याचा फायदा सुद्धा होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. नोकरीत बढती मिळेल.  आणखी वाचा

कुंभ  - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृती नरम गरम राहील. तरीही मनस्वास्थ्य चांगले राहील. कामाचा उत्साह कमी होईल. वरिष्ठांशी सांभाळून राहावे लागेल. अकारण खर्च वाढेल. आनंद - सोहळा, प्रवास- पर्यटन ह्यावर पैसा खर्च होईल.  आणखी वाचा

मीन - आज आपणास अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. मानसिक तसेच शारीरिक श्रमामुळे स्वास्थ्य खराब होऊ शकते. सर्दी, श्वसनाचा त्रास, खोकला व पोट दुखी यांचा जोर वाढेल. खर्चात वाढ होईल. शक्यतो जलाशया पासून दूर राहावे. आणखी वाचा

Open in app

Web Title : आज का राशिफल: 18 नवंबर, 2025 - इस राशि के लिए शुभ दिन।

Web Summary : कुछ राशियों के लिए आर्थिक, सामाजिक और पारिवारिक दृष्टि से शुभ दिन। दूसरों के लिए मिश्रित परिणाम, स्वास्थ्य, वित्त और रिश्तों में सावधानी बरतने की आवश्यकता है। मिथुन को वाणी पर नियंत्रण रखने और नए उद्यमों से बचने की जरूरत है। धनु वैवाहिक जीवन का आनंद लें।

Web Title : Daily Horoscope: November 18, 2025 - Auspicious day for this zodiac.

Web Summary : Auspicious day for some signs regarding finance, society, and family. Mixed results for others, needing caution in health, finances, and relationships. Gemini needs to control speech and avoid new ventures. Sagittarius enjoys marital bliss.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.