आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 07:03 IST2025-07-17T07:03:04+5:302025-07-17T07:03:35+5:30

Today's Horoscope: तुमची राशी कोणती, तुमचा आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या

Today's Horoscope, July 17, 2025: Today is a very beneficial day, you will get success in your job | आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल

आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल

मेष : आज चंद्र 17 जुलै, 2025 गुरूवार च्या दिवशी मीन राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आपली सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. त्यामुळे आपला उत्साह वाढेल. एखादा आर्थिक लाभ संभवतो. कुटुंबियांसह आनंदात वेळ जाईल. मातृ घराण्या कडून फायदा होईल. आणखी वाचा

वृषभ : आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. आपले मन वेगवेगळ्या चिंतांनी ग्रस्त असेल. स्वास्थ्य बिघडेल किंवा डोळ्याचे विकार संभवतात. कुटुंबीय किंवा आप्तजन यांचा विरोध राहील. आज सुरू केलेली सर्व कामे अपूर्ण राहतील. वायफळ खर्च होईल. एखादा अपघात संभवतो. आणखी वाचा  

मिथुन :शरीर व मनाने दिवसभर प्रसन्नता राहील. व्यवसायात प्रशंसा झाल्याने कामातील उत्साह वाढेल. सहकार्‍यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. समाजात मान - सन्मान प्राप्त होईल. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवाल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. आणखी वाचा

कर्क : आज आपण मंगल कार्य व परोपकारी कामात जास्त वेळ घालवाल. एखादा प्रवास संभवतो. शारीरिक व मानसिक दृष्टया प्रसन्न राहाल. नशिबाची साथ मिळेल. घरात भावंडांबरोबर आनंदात वेळ घालवाल. विदेश यात्रेची संधी लाभेल. आणखी वाचा

सिंह : आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आरोग्याकडे अधिक लक्ष पुरवावे लागेल. बाहेरचे खाणे - पिणे टाळा. आजारामुळे खर्च करावा लागेल. नकारात्मक विचार मनावर प्रभाव पाडतील. कुटुंबातील व्यक्तींशी जपून राहा. आणखी वाचा

कन्या : आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत लाभाबरोबरच प्रसिद्धी सुद्धा मिळेल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. दांपत्य जीवनात परमोच्च सुखाचे क्षण अनुभवाल. नव्या वस्त्रालंकाराची खरेदी करून ते वापरण्याची संधी मिळेल. भिन्नलिंगी व्यक्तींशी परिचय होईल. त्यांच्याशी मैत्री जुळेल. आजचा दिवस भागीदारीसाठी अनुकूल आहे. आणखी वाचा

तूळ :आजचा दिवस अत्यंत लाभदायी आहे. नोकरीत यश मिळेल. घरातील वातावरण सुखद राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. कामाच्या ठिकाणी सहकारी चांगले सहकार्य करतील. मातुल घराण्याकडून चांगल्या बातम्या मिळतील. प्रकृती उत्तम राहील. बौद्धिक चर्चेत भाग घेण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आजचा दिवस आर्थिक योजना बनविण्यासाठी अनुकूल आहे. परिश्रम प्रगति पथावर नेतील. संतती विषयक आनंददायी बातम्या समजतील.  आणखी वाचा 

वृश्चिक : आज आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य उत्तम राहील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. कार्यालयात सहकारी लोकांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल. मैत्रिणी भेटतील. स्त्रीयांना माहेरहून चांगली बातमी समजेल. धन लाभ होईल. आणखी वाचा  

धनु : आज आपणात शारीरिक व मानसिक स्फूर्ती व उत्साह ह्यांचा अभाव राहील. कुटुंबात क्लेश व कलहजन्य वातावरण राहिल्याने मनात उदासीनता राहील. निद्रानाशाचा त्रास होईल. आईची प्रकृती बिघडेल. सार्वजनिक जीवनात अपमान होण्याचे प्रसंग येतील. धनहानी होईल. स्त्रीवर्गा कडून हानी संभवते. आणखी वाचा

मकर :आजचा दिवस सुखात जाईल. अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने आपण प्रत्येक काम व्यवस्थित पूर्ण करू शकाल. मन प्रसन्न राहील. व्यापार - व्यवसायात आर्थिक लाभ होतील. भागीदारीत फायदा होईल. भावंडांसह वेळ खूप चांगला जाईल. एखादे नवे कार्य सुरू करू शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश प्राप्त होईल. आणखी वाचा

कुंभ :आज आपल्या द्विधा मनःस्थिती मुळे निर्णय शक्तीचा अभाव जाणवेल. त्यामुळे विपरीत परिणाम होईल.प्रकृती सुद्धा साथ देणार नाही. वाणीवर ताबा न राहिल्याने वाद - विवाद होऊन आपल्याच लोकांशी मतभेद होतील. कामात अल्प प्रमाणात यश मिळेल. नाहक खर्च व धनहानी होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

मीन : आज आपणास आनंद, उत्साह व प्रसन्नतेचा अनुभव येईल. नवीन कार्यारंभ लाभदायक ठरेल. मित्र व कुटुंबीय ह्यांच्यासह स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी मिळेल. प्रवास संभवतात. आर्थिक लाभ होईल. परोपकारी कार्यावर खर्च होईल. ठरवलेली कामे पूर्ण होतील. दांपत्य जीवनात सुख प्राप्ती होईल. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope, July 17, 2025: Today is a very beneficial day, you will get success in your job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app