आजचे राशीभविष्य ५ जानेवारी २०२६ :आज ग्रहांची चाल 'या' राशींसाठी ठरणार फलदायी; पाहा तुमचे राशीभविष्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 07:35 IST2026-01-05T07:30:47+5:302026-01-05T07:35:00+5:30
Daily Horoscope Marathi: आज, ५ जानेवारी २०२६ रोजी चंद्र कर्क राशीत भ्रमण करत असून 'गौरी योग' तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग करिअर आणि प्रेमसंबंधांसाठी अत्यंत शुभ मानला जातो.

आजचे राशीभविष्य ५ जानेवारी २०२६ :आज ग्रहांची चाल 'या' राशींसाठी ठरणार फलदायी; पाहा तुमचे राशीभविष्य!
मेष - आज आपण खूप संवेदनशील झाल्याने कोणाचे बोलणे आपल्या भावना दुखावेल. आईच्या आरोग्याची काळजी राहील. आणखी वाचा
वृषभ - आज शरीर व मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. कुटुंबियांशी घरातील प्रश्नांसंबंधी चर्चा कराल. आणखी वाचा
मिथुन - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज थकवा, कार्यमग्नता व प्रसन्नता ह्यांचा संमिश्र अनुभव येईल. आणखी वाचा
कर्क - मित्र व स्नेही यांच्यासह आजचा दिवस आपण उल्हासात घालवू शकाल. आणखी वाचा
सिंह - आज आपणास आपल्या संवेदनशीलतेवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी राहील. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस आनंदात व उत्साहात जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रात आज लाभ संभवतो. आणखी वाचा
तूळ - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. वरिष्ठांसह महत्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल. आणखी वाचा
वृश्चिक - आज शारीरिक थकवा, आळस व मानसिक चिंता अनुभवाल. व्यवसायात अडचणी येतील. आणखी वाचा
धनु - आज आपण वाणी व संताप यावर आवर घालावा अन्यथा अनर्थ ओढवेल. सर्दी, खोकला यांमुळे प्रकृती खराब राहील. आणखी वाचा
मकर - दैनंदिन काम सोडून आज आपण मनोरंजन व गाठी भेटी ह्यात आपला वेळ घालवाल. स्वादिष्ट भोजन मिळेल. आणखी वाचा
कुंभ - आजचा दिवस कार्य सिद्धीच्या दृष्टीने शुभ फलदायी आहे. कार्यातील यशाने आपली प्रसिद्धी होईल. आणखी वाचा
मीन - आज आपण कल्पना विश्वात विहार करणे पसंत कराल. साहित्य लेखनात आपण सृजनशीलता दाखवू शकाल. आणखी वाचा
