आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 07:43 IST2025-10-23T07:33:58+5:302025-10-23T07:43:20+5:30
Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य : गुरुवार 23 ऑक्टोबर २०२५; आत्मविश्वास वाढेल, जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल
मेष - आजचा दिवस मानसिक समाधानाचा आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. त्याच बरोबर सुखद प्रवासाचा आनंद व रूचकर भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी सुद्धा लाभेल. एखादी हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल. तरीही आपले विचार व अती उत्साहाला आवर घालावा लागेल.आणखी वाचा
वृषभ - आजचा दिवस आनंददायी आहे. कामात आघाडीवर राहाल व योजनेनुसार कार्य पूर्ण करू शकाल. अपूर्ण कामे यशस्वीरीत्या तडीस न्याल. कामाच्या ठिकाणी सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. स्त्रीयांना माहेरहून एखादी सुखद बातमी मिळण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
मिथुन - आजचा दिवस नवीन कामाच्या आरंभाला अनुकूल नाही. जीवनसाथी व संतती ह्यांच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. चर्चा किंवा वाद - विवाद ह्यात मानहानी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा
कर्क - आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. छातीत दुखणे किंवा इतर व्याधींचा त्रास जाणवेल. कुटुंबियांशी खडाजंगी उडेल. मानहानी संभवते. स्त्री किंवा वाणी यांमुळे एखादे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. पैसा खर्च होईल. आणखी वाचा
सिंह - आज आर्थिक फायदा होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास मन आनंदीत करेल. नशिबाची साथ मिळेल. आजचा दिवस नवीन काम किंवा योजना स्वीकारण्यास अनुकूल आहे. आज संगीतात विशेष रूची राहील. आणखी वाचा
कन्या - कौटुंबिक सुख - शांती व आनंद ह्यामुळे आजचा दिवस आनंदात जाईल. आपल्या मधुर वाणीचा प्रभाव आज इतर लोकांना प्रभावीत करेल. प्रवासाची शक्यता आहे. आणखी वाचा
तूळ -आज आपल्यातील रचनात्मक शक्ती प्रकट होईल. वस्त्रालंकार, मौज - मजेची साधने व मनोरंजन ह्यासाठी पैसे खर्च होतील. आत्मविश्वास वाढेल. जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास रोमांचक व आनंददायी असेल. आणखी वाचा
वृश्चिक - आज आपला पैसा व वेळ हौसमौज व मनोरंजन ह्यासाठी खर्च होईल. स्वास्थ्या संबंधी तक्रार राहील. मनाला चिंता लागून राहील. एखादी दुर्घटना संभवते. कुटुंबीय किंवा सगे - सोयरे यांच्याशी गैरसमज किंवा मतभेद होतील. आणखी वाचा
धनु - 23 ऑक्टोबर, 2025 गुरूवार च्या दिवशी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या लाभात स्थानी असेल. आज आर्थिक लाभ व सामाजिक प्रतिष्ठा मिळवून कौटुंबिक जीवनात सुद्धा सुख संतोष अनुभवाल. प्रिय व्यक्तीच्या सहवासात सुखद क्षण अनुभवू शकाल. आणखी वाचा
मकर - 23 ऑक्टोबर, 2025 गुरूवार च्या दिवशी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या दशमात स्थानी असेल. आज व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. व्यापारासाठी धावपळ व वसुलीसाठी प्रवास ह्यातून फायदा संभवतो. वरिष्ठ आपल्यावर खूश असल्याने पदोन्नती संभवते. आणखी वाचा
कुंभ - 23 ऑक्टोबर, 2025 गुरूवार च्या दिवशी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात स्थानी असेल. आज आपण जरी शारीरिक दृष्टया अस्वस्थ असलात तरीही मानसिक दृष्टया स्वस्थता टिकवण्याचा प्रयत्न करा. आज काम करण्याचा उत्साह कमी राहील. आणखी वाचा
मीन - 23 ऑक्टोबर, 2025 गुरूवार च्या दिवशी तूळ राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात स्थानी असेल. आज अवैध कामा पासून दूर राहावे. क्रोध व वाणीवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा