आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 07:19 IST2025-10-05T07:18:09+5:302025-10-05T07:19:45+5:30

Todays Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope - 5 October 2025: Auspicious and fruitful day, you will be able to start new work successfully. | आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल

आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल

मेष - 05 ऑक्टोबर, 2025 रविवारी आज चंद्र कुंभ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभ भावात असणार आहे. आज मित्रांच्या सहवासात आपण आनदात वेळ घालवू शकाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. तसेच आपल्याला सुद्धा त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. नवीन मित्रांमुळे भविष्यात लाभ होतील. संतती कडून सुद्धा फायदा होईल. निसर्गरम्य ठिकाणी सहलीस जाण्याचा बेत आखाल. आणखी वाचा

वृषभ - आपल्या राशी पासून चंद्र दशम भावात असणार आहे. नोकरी करणार्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. पदोन्नती पण मिळू शकेल. वैवाहिक जीवनात माधुर्य वाढेल. अपूर्ण कामे तडीस जातील.  आणखी वाचा

मिथुन- आपल्या राशी पासून चंद्र भाग्य भावात असणार आहे. आज आपणाला प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागेल. आरोग्य बिघडल्याने कोणतेही काम करण्याचा उत्साह असणार नाही. नोकरी - व्यवसायात सहकारी व वरिष्ठांचे सहकार्य न मिळाल्याने मानसिक दृष्टया निराश व्हाल. संतती विषयक समस्या निर्माण होतील. विरोधकां बरोबर वाद - विवाद करणे उचित ठरणार नाही. आणखी वाचा

कर्क - आपल्या राशी पासून चंद्र अष्टम भावात असणार आहे. आज वैचारिक नकारात्मकता मनात असल्याने दिवसभर आपण अस्वस्थ राहाल. रागावर आज संयम ठेवावा लागेल. खर्च अधिक होईल. कुटुंबियांशी संघर्ष संभवतो. आज नवीन कामे सुरू करू नये. नवे परिचय सुद्धा लाभदायी होणार नाहीत.  आणखी वाचा

सिंह -  आपल्या राशी पासून चंद्र सातव्या भावात असणार आहे. आजचा दिवस आपण मनोरंजन व हिंडण्या - फिरण्यात घालवाल. तरीही प्रापंचिक विषयाकडे आपला व्यवहार उदासीनच असेल. जोडीदाराची प्रकृती बिघडेल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास आनंददायी असणार नाही. व्यापारी वर्गाला भागीदारांशी जरा धैर्याने काम करावे लागेल.  आणखी वाचा 

कन्या - आपल्या राशी पासून चंद्र सहाव्या भावात असणार आहे. आज आपणास शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. कुटुंबातील शांती - सुखाचे वातावरण मनाला प्रसन्ना देईल. आर्थिक लाभ व कामात यश मिळेल. आजारातून मुक्त व्हाल. नोकरीत फायदा होईल. आपल्या हाता खालचे कर्मचारी व सहकारी यांचे सहकार्य मिळेल. आणखी वाचा

तूळ - आपल्या राशी पासून चंद्र पाचव्या भावात असणार आहे. आज कल्पनाशक्ती व सृजनशक्ती यांचा चांगला उपयोग आपण कराल. संततीची प्रगती होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. तन व मन तरतरी व स्फूर्तीचा अनुभव घेईल. विचारांचा अतिरेक मन विचलित करेल. आणखी वाचा

वृश्चिक -आपल्या राशी पासून चंद्र चवथ्या भावात असणार आहे. आज शारीरिक व मानसिक दृष्टया भीतीचा अनुभव आपण घ्याल. आज कोणती ना कोणती चिंता सतावेलच. कुटुंबीय, नातलग व संबंधित यांच्याशी पटणार नाही. आईची प्रकुती बिघडेल. आणखी वाचा

धनु - आपल्या राशी पासून चंद्र तिसऱ्या भावात असणार आहे. आज आपल्यावर गूढ व रहस्यमय विद्येचा विशेष प्रभाव राहील. त्याचा अभ्यास व संशोधन यांत गोडी राहील. मन शांत व प्रसन्न राहील. भावंडांशी सुसंवाद साधाल. आज नवे काम सुरू कराल. आप्तेष्ट व मित्रांच्या आगमनामुळे आपणाला आनंद वाटेल. जवळपासच्या प्रवासाची शक्यता आहे. आणखी वाचा

मकर - आपल्या राशी पासून चंद्र दुसऱ्या भावात असणार आहे. आज संयमित बोलणे आपणाला अनेक संकटातून वाचवेल. म्हणून विचारपूर्वक बोला. कुटुंबियांशी गैरसमज झाल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. शेअर सट्टा यांत पैसे गुंतविण्याचे नियोजन कराल. गृहिणींना मानसिक असंतुष्टता जाणवेल. आणखी वाचा

कुंभ - आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजचा दिवस शारीरिक व मानसिक स्वास्थ्य व उत्साहाचा आहे. आर्थिक दृष्टया लाभदायक दिवस आहे. आप्तेष्ट व मित्र यांच्यासह रुचकर व स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. एखाद्या पर्यटनाचा बेत ठरवाल. आज आपणाला गूढ शक्तीचा प्रभाव जाणवेल. आणखी वाचा

मीन - आपल्या राशी पासून चंद्र बाराव्या भावात असणार आहे. आज आपल्या मनाची एकाग्रता राहिल्यामुळे मानसिक व्यग्रता जाणवेल. मंगल कार्यावर खर्च होईल. स्वकीयांपासून दूर जावे लागेल. कोर्ट - कचेरीच्या कामात किंवा एखाद्याला जामीन राहण्याच्या बाबतीत खूप सावधपणे वागा. वाणीतील असंयम भांडणे निर्माण करील. आणखी वाचा

Web Title : आज का राशिफल, 5 अक्टूबर, 2025: शुभ दिन, नए कार्य सफल हो सकते हैं।

Web Summary : 5 अक्टूबर, 2025, विभिन्न राशियों के लिए अलग-अलग भाग्य लेकर आया है। वृषभ राशि के जातकों को करियर में उन्नति मिल सकती है, जबकि मिथुन राशि वालों को चुनौतियों का सामना करना पड़ सकता है। कर्क राशि वाले नए उद्यमों से बचें। कन्या राशि वाले स्वास्थ्य और सफलता का आनंद लेंगे। वृश्चिक राशि वाले चिंतित महसूस कर सकते हैं। कुंभ राशि वाले ऊर्जा और अच्छे भाग्य के साथ आगे बढ़ेंगे।

Web Title : Horoscope Today, October 5, 2025: Auspicious day, successful new beginnings possible.

Web Summary : October 5, 2025, promises varied fortunes. Taurus can expect career advancement, while Gemini faces challenges. Cancer should avoid new ventures. Virgo enjoys health and success. Scorpio may feel anxious. Aquarius thrives with energy and good fortune.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app