आजचे राशीभविष्य, २४ नोव्हेंबर २०२५: मन आनंदी राहील, आर्थिक लाभ होतील, नोकरीत लाभ होतील !
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 07:32 IST2025-11-24T07:31:23+5:302025-11-24T07:32:16+5:30
Daily Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस.. वाचा काय सांगते तुमची रास

आजचे राशीभविष्य, २४ नोव्हेंबर २०२५: मन आनंदी राहील, आर्थिक लाभ होतील, नोकरीत लाभ होतील !
मेष- आज आपणास रागावर ताबा ठेवावा लागेल. अन्यथा आपल्या कामात बिघाड व संबंधात कटुता निर्माण होईल. मानसिक व्यग्रता व मनाची बेचैनी ह्यामुळे आपले कामात लक्ष लागणार नाही. प्रकृती नरमच राहील. आणखी वाचा
वृषभ- शारीरिक दृष्टया अस्वस्थ असल्याने कामात सफलता मिळण्यास उशीर होईल व त्यामुळे निराश व्हाल. आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका. योग्य आहार घ्या. आज कामाचा व्याप वाढेल. शिथिलता राहील. आणखी वाचा
मिथुन- आजचा दिवस आनंदात व भोग विलासात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास घडेल. प्रणयक्रीडेसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रकृती उत्तम राहील. वैवाहिक सुखाचा आनंद उपभोगता येईल. आणखी वाचा
कर्क- आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. घरात शांती व आनंदाचे वातावरण राहील. सुखद प्रसंग घडतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. प्रकृती उत्तम राहील. कुटुंबियांसह आनंदात वेळ जाईल. नोकरीत लाभ होतील. आणखी वाचा
सिंह- आजचा दिवस आनंददायी आहे. आज आपण अधिक कल्पनाशील बनाल. साहित्य नवनिर्मितीमुळे काव्य लेखनाची प्रेरणा मिळेल. आवडत्या व्यक्तीची भेट फलदायी होईल व त्यामुळे दिवसभर मन आनंदी राहील. आणखी वाचा
कन्या- आज प्रतिकूलतेला तोंड दयावे लागेल. आरोग्य यथा तथाच राहील. आईशी असणारे संबंध दुरावतील किंवा तिची प्रकृती बिघडेल. स्वकियांशीच खटके उडून मतभेद निर्माण होतील. पाण्यापासून धोका संभवतो. आणखी वाचा
तूळ- आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. काही अडचणींमुळे मन दुःखी राहील. स्फूर्तीचा अभाव असेल. स्वकीयांचे गैरसमज होतील. आईची तब्बेत बिघडेल. कागदपत्रे जपून ठेवावी लागतील. आणखी वाचा
वृश्चिक- आजचा दिवस साधारणच आहे. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबात वाद संभवतात. कुटुंबातील सदस्यांचे गैरसमज होण्याची शक्यता आहे. शारीरिक त्रास व मनात मरगळ राहील. नकारात्मक विचार येतील. आणखी वाचा
धनु- आज आपण शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राखू शकाल. आर्थिक लाभ होतील. एखादा प्रवास कराल. सगे सोयरे व मित्रांच्या आगमनाने मन खुश होईल. दांपत्य जीवनात जवळीक व गोडी राहील. मान - मरातब वाढेल. आणखी वाचा
मकर- आरोग्याच्या तक्रारी राहतील. विचित्र अनुभव येतील. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. मांगलिक कार्यावर खर्च कराल. परोपकारी व्यवहार वाढतील. शत्रूंचा त्रास होईल. डाव्या डोळ्यास त्रास होईल. एखादी दुर्घटना संभवते. आणखी वाचा
कुंभ- आजचा दिवस मंगल कार्य व नवीन कार्य ह्यांच्या आयोजनासाठी अनुकूल आहे. अविवाहितांचे विवाह ठरतील. पत्नी व संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. कौटुंबिक जीवन व दांपत्य जीवन ह्यात सुखा- समाधानाचा अनुभव येईल. आणखी वाचा
मीन- आज आपले प्रत्येक काम सफलतापूर्वक पूर्ण होईल. नोकरीत पदोन्नती मिळेल. व्यापार्यांची येणी वसूल होतील. वडील व वडीलधार्यांकडून लाभ होईल. आर्थिक लाभ होऊन कुटुंबात आनंद पसरेल. सरकारकडून लाभ मिळतील. आणखी वाचा
