आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 06:49 IST2025-08-08T06:36:28+5:302025-08-08T06:49:17+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
मेष: आज घर, कुटुंब व संतती आपणाला आनंद व संतोषाची भावना देतील. आप्तेष्ट व मित्र आपणाला घेरून टाकतील. व्यापार-व्यवसायासाठी प्रवास होऊन त्यात लाभ होईल. व्यवसायात लाभ, मान व प्रतिष्ठा मिळेल. नोकरीत बढती मिळेल. कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवेल. आणखी वाचा
वृषभ: व्यापार्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आर्थिक लाभ प्राप्त होतील. विदेशातील मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून येणार्या बातम्या आपणाला भाव विवश बनवतील. दूरच्या प्रवासाची शक्यता आहे. कामाचा व्याप थकवा व उबग आणेल. आणखी वाचा
मिथुन: आज नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हितावह राहील. शक्यतो नवीन कार्य सुरू करू नये. रागावम संयम ठेवला नाही तर एखाद्या अप्रिय प्रसंगास सामोरे जावे लागेल. खर्च जास्त झाल्याने आर्थिक चणचण भासेल. नकारात्मक विचारांपासून दूर राहण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करावा. आणखी वाचा
कर्क: आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह व मनोरंजनात जाईल. आनंदाची साधने, वस्त्रे इ. खरेदी होईल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. वाहन सौख्य लाभेल. प्रतिष्ठेस तडा जाऊ शकतो. व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. प्रकृती उत्तम राहील. आणखी वाचा
सिंह: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबियांशी बोलताना वाणीवर संयम ठेवावा. दैनंदिन कामात विघ्ने येतील. कार्यपूर्तीत अडचणी येतील. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी झाल्याने नैराश्य येईल. आणखी वाचा
कन्या: आज शक्यतो वाद व चर्चा ह्यापासून दूर राहणे हितावह राहील. अचानकपणे खर्चात वाढ होईल. विद्यार्थी वर्गाला शिक्षणात अडचणी येतील. प्रिय व्यक्तीचा सहवास घडल्याने मन आनंदित होईल. शेअर्स बाजारात गुंतवणूक करताना सावध राहावे. आणखी वाचा
तूळ: आज मानसिक थकवा जाणवेल. आपण जास्त हळवे व्हाल. मनात उठणार्या विचार तरंगांमुळे त्रास होईल. आजचा दिवस प्रवासासाठी प्रतिकूल आहे. झोप पूर्ण न झाल्याने मानसिक ताण येईल. कौटुंबिक तसेच जमीन-जुमल्याच्या बाबतीत सावध राहावे लागेल. आणखी वाचा
वृश्चिक: नवीन कार्याचा आरंभ करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. दिवसभर मन आनंदी राहील. भावंडांशी घराविषयी महत्वाची चर्चा कराल. आर्थिक लाभ संभवतात. नशिबाची साथ लाभेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. मित्रांच्या सहवासामुळे मन आनंदित होईल. कामात यश मिळेल. आणखी वाचा
धनु: आज द्विधा मनःस्थिती व घरातील बिघडलेले वातावरण यामुळे त्रास होईल. नाहक खर्च होईल. कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. महत्वाचे निर्णय घेणे हिताचे ठरणार नाही. कुटुंबियांचे गैरसमज होणार नाहीत यासाठी प्रयत्न करावे लागतील. दूरस्थ मित्र वा नातलगांकडून येणार्या बातम्या किंवा निरोप लाभदायक ठरतील. आणखी वाचा
मकर: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. एखाद्या सामाजिक कार्यात आपण सहभागी व्हाल. नोकरी-व्यवसायात अनुकूल परिस्थिती असेल. प्रत्येक काम सहजपणे पूर्ण होईल. मान-सन्मान होतील. नोकरीत बढतीची शक्यता आहे. आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळाल्याने आपण आनंददित व्हाल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. आणखी वाचा
कुंभ: आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा. कुटुंबियांशी मतभेद होतील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. पैसा खर्च होईल. आणखी वाचा
मीन: आज आपण कौटुंबिक व सामाजिक सोहळ्यात सहभागी व्हाल. मित्रांचा सहवास घडेल. त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. एखाद्या रम्य स्थळी सहलीसाठी जाऊ शकाल. प्रत्येक क्षेत्रात आपणाला फायदा होईल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. आणखी वाचा