Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ६ जानेवारी २०२६ : आजचा दिवस आनंदाचा! आर्थिक लाभ संभवतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 07:27 IST2026-01-06T07:26:13+5:302026-01-06T07:27:33+5:30
Daily Horoscope Marathi: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, ६ जानेवारी २०२६ : आजचा दिवस आनंदाचा! आर्थिक लाभ संभवतात
मेष - आजचा दिवस सावध राहण्याचा असून प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागेल. एखाद्या व्यक्तीशी तीव्र मतभेद संभवतात. शारीरिक व मानसिक दृष्टया त्रस्त व्हाल. निद्रानाश झाल्यामुळे आरोग्यावर ताण येईल. आणखी वाचा
वृषभ - आज आपण भावनेच्या बंधनात गुंतण्याची शक्यता आहे. कामे पूर्ण झाल्याने आनंदाचे प्रमाण वाढेल. भावंडांकडून लाभ होईल. शारीरिक व मानसिक दृष्टया ताजेतवाने राहाल. आर्थिक लाभ संभवतात. आणखी वाचा
मिथुन - सकाळी आपले मन अशांत राहील. शारीरिक व मानसिक आरोग्य समाधानकारक नसल्याने आपली चिडचिड होईल. वायफळ खर्च होतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकणार नाही. दुपार नंतर मात्र मित्र व स्नेहीजनांच्या सहवासामुळे मनास प्रसन्नता लाभेल. आणखी वाचा
कर्क - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. दुपार नंतर मात्र कुटुंबियांशी एखादा वाद होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
सिंह - आपल्या वक्तव्याने गैरसमज होण्याची किंवा एखादी व्यक्ती दुखावली जाण्याची शक्यता असल्याने आपणास संयमित राहावे लागेल. अपेक्षेहून अधिक खर्च होईल. मानसिक चिंता वाढतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा
कन्या - सकाळी परिस्थिती अनुकूल राहील. शारीरिक व मानसिक शांतता लाभेल. व्यावसायिक क्षेत्रात वातावरण अनुकूल राहील. दुपार नंतर मनःस्थिती द्विधा होईल. त्यामुळे कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात व्यत्यय येईल. आणखी वाचा
तूळ - आजचा दिवस आपणास अनुकूलतेचा आहे. विविध क्षेत्रात लाभ संभवतात. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. पदोन्नती संभवते. आपली मनीषा पूर्ण होऊ शकेल. प्रिय व्यक्ती व मित्र ह्यांच्याशी संपर्क साधू शकाल. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस आपणास अनुकूलतेचा आहे. विविध क्षेत्रात लाभ संभवतात. परदेश गमनाची संधी प्राप्त होऊ शकेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नती संभवते. मित्र व प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. आणखी वाचा
धनु - मनात नैराश्य व मरगळ असल्याने आज आपण नवीन कार्याची सुरवात करू शकणार नाही. कुटुंबियांशी वाद संभवतात. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. कुटुंबातील वाद निवळू लागतील. आणखी वाचा
मकर - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी आप्तेष्टांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. प्रवास संस्मरणीय होऊ शकेल. भागीदारीत फायदा होईल. व्यापारात लाभ होईल. दुपार नंतर मात्र परिस्थिती प्रतिकूल होईल. आणखी वाचा
कुंभ - आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. व्यापार - व्यवसायात अनुकूल वातावरण राहून भरपूर लाभ होतील. आणखी वाचा
मीन - आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी प्रकृती नरम गरम राहील. काही कारणाने अचानक खर्च करावे लागतील. दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. आणखी वाचा
