Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, १७ जानेवारी २०२६ : प्रिय व्यक्तीसोबत फिरायला जाल, नोकरीत लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 07:19 IST2026-01-17T07:18:35+5:302026-01-17T07:19:42+5:30
Today Daily Horoscope 16 january 2026: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, १७ जानेवारी २०२६ : प्रिय व्यक्तीसोबत फिरायला जाल, नोकरीत लाभ!
मेष: आज आपल्यात तरतरीतपणा व उत्साह यांचा अभाव राहील. तसेच रागाचे प्रमाण वाढल्याने काम बिघडण्याची शक्यता आहे. तेव्हा रागावर नियंत्रण ठेवा. आणखी वाचा
वृषभ: आज कामाचा खूप व्याप व खाण्या - पिण्याची बेपर्वाही यामुळे आरोग्य बिघडेल. वेळेवर जेवण व झोप न झाल्याने मानसिक बेचैनी वाटेल. प्रवासात विघ्न येण्याची शक्यता असल्याने प्रवास करू नका. आणखी वाचा
मिथुन: आज आपण मौज - मजा व मनोरंजन यांत विशेष रस घ्याल. कुटुंबीय, मित्रमंडळी व प्रिय व्यक्तीसह बाहेर फिरायला जाण्याचा बेत कराल. सार्वजनिक जीवनात मान - प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा
कर्क: आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा राहील. कुटुंबियांना वेळ देऊ शकाल. त्यांच्या सहवासात घरात वेळ घालवाल. कार्यात सफलता मिळेल. नोकरदारांना नोकरीत लाभ होईल. आणखी वाचा
सिंह: आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया शांतपणे काम कराल. सृजनात्मक कामांची अधिक गोडी लागेल. साहित्य व कला क्षेत्रांत काही नवनिर्मिती करण्याची प्रेरणा मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. आणखी वाचा
कन्या: आज आपणास प्रतिकूलतेस तोंड देण्यास तयार राहावे लागेल. आरोग्य विषयक तक्रारी राहतील. मनावर काळजीचे दडपड राहिल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी खटका उडेल. आईच्या प्रकृतीची काळजी राहील. आणखी वाचा
तूळ: सांप्रतकाळी धाडस करणे, एखादे काम हाती घेणे यांसाठी दिवस अनुकूल आहे. योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आपणास लाभदायक ठरेल. कुटुंबात भावंडांशी आपलेपणा व खेळीमेळीचे वातावरण असेल. आणखी वाचा
वृश्चिक: आज नकारात्मक मानसिक वृत्ती टाळावी. 'मौनं सर्वार्थ साधनम्' या नीतीने वागा म्हणजे कुटुंबियांशी संघर्ष होणार नाही. आरोग्याच्या तक्रारी राहतील. आणखी वाचा
धनु: आज आपल्या कामात यश व आर्थिक लाभाची शक्यता आहे. एकादया मंगल कार्यास सहकुटुंब हजर राहाल. प्रवासाची शक्यता आहे. स्वकीयांची भेट आपणाला आनंदित करील. आणखी वाचा
मकर: आपण एखाद्या मंगल कार्यांत मग्न राहाल. परोपकारी कार्यांवर पैसा खर्च होईल. नातलग, संबंधित व कुटुंबीय यांच्याशी जपून बोला कारण आपले बोलणे कोणाचे मन दुखावण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
कुंभ: आज नवे काम हाती घेऊ शकाल. नोकरी - व्यवसायात लाभ होऊन अतिरिक्त प्राप्ती होईल. मित्रगण विशेषतः स्त्री वर्गाकडून लाभ होईल. सामाजिक क्षेत्रात आपणाला प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळेल.आणखी वाचा
मीन: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामातील यश व वरिष्ठ अधिकार्यांचे प्रोत्साहन आपला उत्साह द्विगुणित करेल. व्यापारी वर्गाला व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल. आणखी वाचा
