Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 07:25 IST2025-12-26T07:23:28+5:302025-12-26T07:25:21+5:30

Daily Horoscope Marathi: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?

Today's Horoscope: Today's Horoscope, December 26, 2025: An atmosphere of joy and enthusiasm; You will achieve success at work! | Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!

मेष:  आजचा दिवस मित्र व सामाजिक कार्ये ह्यांच्यासाठी धावपळ करण्यात जाईल. पैसा सुद्धा खर्च होईल. नवीन मित्रांच्या ओळखी होतील. भविष्यात त्यांचा उपयोग होईल.
आणखी वाचा

वृषभ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विशेषतः व्यापार - व्यवसाय करणार्यांना आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे. नोकरीत पदोन्नती संभवते. कार्यालयात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल.
आणखी वाचा

मिथुन: आपणास मानसिक व्यग्रता व शारीरिक शिथिलता अनुभवास येईल. काम करायला उत्साह वाटणार नाही. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार नाही. पैसा खर्च होईल.
आणखी वाचा

कर्क: प्रत्येक गोष्टीत जपून व्यवहार करावा लागेल. कुटुंबियांशी वाद संभवतात. वाणी व संतापावर नियंत्रण ठेवल्यास संभाव्य कटुता टाळू शकेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे.  
आणखी वाचा

सिंह: आज पति - पत्नीत मतभेद होऊन कटुता निर्माण होईल. दोघां पैकी एकाचे स्वास्थ्य बिघडणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. सांसारिक किंवा इतर प्रश्नांमुळे मन उदास राहील. 
आणखी वाचा

कन्या: कुटुंबात आनंद व उत्साहाचे वातावरण राहिल्याने आपले मन प्रसन्न राहील. स्वास्थ्य सुद्धा उत्तम राहील. आजारी व्यक्तीची तब्बेत सुधारेल. कामात यश मिळेल. कार्यालयात सहकारी मदत करतील.
आणखी वाचा

तूळ: आज आपण आपली कल्पनाशक्ती व सृजनशीलता चांगल्या प्रकारे कामी आणाल. बौद्धिक कामे तथा चर्चा ह्यात भाग घेणेआपणास आवडेल. संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. त्यांची प्रगती होईल.    
आणखी वाचा

वृश्चिक: आजचा दिवस आपण शांतपणे घालवाल. शारीरिक स्वास्थ्य बिघडल्याने आपण मानसिक दृष्टया बेचैन राहाल. आईच्या प्रकृतीची चिंता राहील. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मनास यातना होतील.
आणखी वाचा

धनु: आपणास गूढ व रहस्यमय विषयांची गोडी लागल्याने त्या विषयात खोलवर उतरण्याचा आपण प्रयत्न कराल. नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. प्रकृती उत्तम राहील व मन प्रसन्न राहील.
आणखी वाचा

मकर: आज 'मौनं सर्वार्थ साधनं' ही गोष्ट लक्षात ठेवून वाणीवर ताबा ठेवला तर अनर्थ घडणार नाही. कुटुंबियांशी मतभेद होऊ नयेत म्हणून ह्याची आवश्यकता आहे. विद्यार्थिवर्गाला अभ्यासासाठी परिश्रम घ्यावे लागतील.    
आणखी वाचा

कुंभ: आजचा दिवस शारीरिक, मानसिक व आर्थिक अशा सर्व दृष्टीनी चांगला आहे. कुटुंबीयांसह रुचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. मित्रांसह बाहेर फिरायला जाण्याचा बेत ठरेल. दांपत्य जीवनातील आनंद उपभोगू शकाल. 
आणखी वाचा

मीन: कमी वेळात जास्तीत जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा व पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या. चित्ताची एकाग्रता कमी राहील. शरीर स्वास्थ्य बिघडेल. संततीची समस्या चिंतेत टाकील. स्वकीयां पासून दूर जाण्याचे प्रसंग येतील.
आणखी वाचा

 

 

Open in app

Web Title : आज का राशिफल, 26 दिसंबर 2025: आनंद, उत्साह और सफलता की प्रतीक्षा!

Web Summary : 26 दिसंबर, 2025, मिश्रित भाग्य लेकर आता है। मेष राशि वाले सामाजिक गतिविधियों पर ध्यान केंद्रित करते हैं। वृषभ राशि वालों को व्यवसाय में समृद्धि, पदोन्नति की संभावना है। मिथुन राशि वाले मानसिक तनाव का सामना करते हैं। कर्क राशि वालों को रिश्तों में सावधानी बरतने की जरूरत है। सिंह राशि वाले वैवाहिक कलह की आशंका जताते हैं। कन्या राशि वाले सुख और सफलता का अनुभव करते हैं। तुला राशि वाले रचनात्मकता का उपयोग करते हैं। वृश्चिक अस्वस्थ महसूस करते हैं। धनु राशि वाले रहस्यों की खोज करते हैं। मकर राशि वालों को वाणी पर नियंत्रण रखना चाहिए। कुंभ राशि वाले पारिवारिक समय का आनंद लेते हैं। मीन राशि वाले जोखिम भरे निवेश से बचें।

Web Title : Horoscope Today, December 26, 2025: Joy, Enthusiasm, and Success Await!

Web Summary : December 26, 2025, brings mixed fortunes. Aries focuses on social activities. Taurus prospers in business, promotion likely. Gemini faces mental stress. Cancer needs caution in relationships. Leo anticipates marital discord. Virgo experiences happiness and success. Libra utilizes creativity. Scorpio feels unwell. Sagittarius explores mysteries. Capricorn should control speech. Aquarius enjoys family time. Pisces avoids risky investments.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.