Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 07:21 IST2025-12-25T07:21:11+5:302025-12-25T07:21:31+5:30
Daily Horoscope Marathi: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
मेष: आजचा दिवस आपण सामाजिक कार्यात व मित्रांसह घालवाल. आपल्या मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. मित्रांसाठी खर्च कराल. वडीलघार्यांकडून लाभ होईल व त्यांचे सहकार्य मिळेल.
आणखी वाचा
वृषभ: आज नोकरीत पदोन्नतीची आनंददायी बातमी मिळेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सरकारी निकाल आपल्या बाजूने लागून लाभ होईल. कौटुंबिक जीवनात सुख - समाधान लाभेल. नवीन कार्याचे आयोजन हाती घ्याल. अपूर्ण कामे पूर्ण कराल.
आणखी वाचा
मिथुन: मानसिक दृष्टया आजचा दिवस द्विधा अवस्था व कटकटीचा राहील. शरीराने थकाल व आळसामुळे कामात उत्साह वाटणार नाही. पोटदुखीचा त्रास संभवतो. पैसा खर्च होईल. व्यवसायात अडचणी येतील.
आणखी वाचा
कर्क: आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. वैवाहिक जीवनात वाद होतील. तसेच व्यापारात भागीदारां बरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. सरकारी कामात विघ्ने येतील. कुटुंबात भांडणे होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल.
आणखी वाचा
सिंह: वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे. भागीदार व व्यापारी ह्यांच्याशी शांतपणे व्यवहार करावा. शक्यतो निरर्थक चर्चा किंवा वाद ह्यापासून दूर राहावे.
आणखी वाचा
कन्या: आज नोकरी - व्यवसायात यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. सहकार्यांचे सहकार्य वाढेल. कुटुंबातील वातावरण सुखावह असेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभ होईल.
आणखी वाचा
तूळ: आपली वैचारिक व मधुर वाणी लोकांना प्रभावित करेल व तसेच त्यामुळे इतर व्यक्तींशी संबंध दृढ होतील. चर्चा - वादविवाद ह्यात सुद्धा आपला प्रभाव राहील. कष्टाच्या मानाने यश संतोषजनक नसेल.
आणखी वाचा
वृश्चिक: मित्रांशी सावधपणे वागावे लागेल. शारीरिक व मानसिक अस्वस्थता राहील. मातेचे स्वास्थ्य बिघडू शकते. धन व किर्तीची हानी होईल. कौटुंबिक वातावरण त्रासदायक राहील. मन प्रसन्न नसल्याने आज झोप सुद्धा होणार नाही.
आणखी वाचा
धनु: आपण प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आजचा दिवस नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल आहे. मित्रांसह दिवस आनंदात घालवाल.
आणखी वाचा
मकर: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. कुटुंबियांशी गैरसमजातून मतभेदाचे प्रसंग घडल्याने मन दुःखी होईल. विनाकारण खर्च होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आज विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही.
आणखी वाचा
कुंभ: आजचा दिवस आपणास आर्थिक दृष्टया लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. मित्र व कुटुंबीय ह्यांच्यासह आनंदात दिवस घालवाल. प्रवास, सहल ह्यातून सुद्धा आज आनंद मिळवू शकता.
आणखी वाचा
मीन: स्थावर संपत्ती व कोर्ट - कचेरी ह्यांच्या पासून आज शक्यतो दूर राहा. मनाच्या एकाग्रतेमुळे सर्व कामात फायदा होईल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. स्वकीयांचा वियोग घडू शकतो. कुटुंबियांशी मतभेद संभवतात.
आणखी वाचा
