आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२३ : सार्वजनिक जीवनात प्रगती होईल, या राशींसाठी खास दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 07:30 AM2023-11-28T07:30:17+5:302023-11-28T07:31:28+5:30

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Today's Horoscope, November 28, 2023 : There will be progress in public life, a special day for these zodiac signs | आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२३ : सार्वजनिक जीवनात प्रगती होईल, या राशींसाठी खास दिवस

आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२३ : सार्वजनिक जीवनात प्रगती होईल, या राशींसाठी खास दिवस

मेष- आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज कुटुंबात व कामाच्या ठिकाणी समजूतदारपणाने व्यवहार केल्याने संघर्ष टळतील.  आणखी वाचा

वृषभ - आर्थिक विषयांचे योग्य नियोजन कराल. आपली कलात्मक जाण वाढीस लागेल. वस्त्रे, अलंकार, सौंदर्य प्रसाधने व मनोरंजनावर खर्च होईल. आणखी वाचा

मिथुन-   आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपली वाणी किंवा व्यवहार इतरांशी गैरसमज निर्माण करू शकतात. कुटुंबीय व सगे - सोयरे यांच्याशी वागताना खूप सांभाळून राहावे लागेल. आणखी वाचा

कर्क- आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस आर्थिक नियोजन व नव कार्यारंभ करण्यासाठी उत्तम आहे. उद्योग - व्यवसायात लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नाच्या मार्गांत वाढ झाल्याने आपणाला खूप आनंद व समाधान वाटेल. आणखी वाचा

सिंह- आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस नोकरी - व्यवसायात लाभदायी व यशदायी आहे. आपल्या कार्य क्षेत्रात वर्चस्व मिळवाल व प्रभाव पाडाल. पुरेपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल यामुळे आपली कामे सहजपणे पार पडतील. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस आपला परोपकारी कार्यात खर्च होईल. एखाद्या प्रवासात संवाद साधण्याची संधी मिळेल. परदेशगमनाचे योग येतील. भावंडांकडून लाभ होईल. आणखी वाचा

तूळ-  आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस अचानक धनलाभाचा आहे. एखाद्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तरीही नवे कार्य हाती घेऊ नका. आणखी वाचा

वृश्चिक- आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आज दैनंदिन घटनाक्रमात बदल होईल. आज आपण मौज- मजा व मनोरंजनाच्या विश्वात फिरण्याच्या मूडमध्ये असाल. मित्र व कुटुंबीयांची त्यात साथ मिळेल. आणखी वाचा

धनु- आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस आर्थिक व व्यापारी नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. कार्ये यशस्वी होतील. आणखी वाचा

मकर- आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज बौद्धिक कामे व व्यवसायात आपण नवी विचार प्रणाली अंमलात आणाल. लेखन व साहित्य क्षेत्रात आपली सृजनात्मकता दिसेल. आणखी वाचा

कुंभ-  आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आज नकारात्मक विचारांनी मन हताश होईल. आज उद्वेग व क्रोध आपल्या मनात जागा घेईल. खर्च वाढेल. आणखी वाचा

मीन- आजचा दिवस सुख शांतीत जाईल. व्यापार्‍यांना भागीदारीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. पति - पत्नी वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope, November 28, 2023 : There will be progress in public life, a special day for these zodiac signs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app