आजचे राशीभविष्य १८ मार्च २०२६: नवीन कामांची सुरुवात होईल, आनंदात वेळ घालवू शकाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 07:31 IST2026-03-18T07:31:35+5:302026-03-18T07:31:43+5:30
Todays Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य १८ मार्च २०२६: नवीन कामांची सुरुवात होईल, आनंदात वेळ घालवू शकाल!
मेष- आज मित्रांच्या सहवासात आपण आनंदात वेळ घालवू शकाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. तसेच आपल्याला सुद्धा त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल. आणखी वाचा
वृषभ- नोकरी करणार्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. आणखी वाचा
मिथुन - आरोग्य बिघडल्याने कोणतेही काम करण्याचा उत्साह असणार नाही. नोकरी - व्यवसायात सहकारी व वरिष्ठांचे सहकार्य न मिळाल्याने मानसिक दृष्टया निराश व्हाल. आणखी वाचा
कर्क - आज वैचारिक नकारात्मकता मनात असल्याने दिवसभर आपण अस्वस्थ राहाल. रागावर आज संयम ठेवावा लागेल. खर्च अधिक होईल. आणखी वाचा
सिंह- आजचा दिवस आपण मनोरंजन व हिंडण्या - फिरण्यात घालवाल. तरीही प्रापंचिक विषयाकडे आपला व्यवहार उदासीनच असेल. आणखी वाचा
कन्या- आज आपणास शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. कुटुंबातील शांती - सुखाचे वातावरण मनाला प्रसन्ना देईल. आर्थिक लाभ व कामात यश मिळेल. आणखी वाचा
तूळ- आज कल्पनाशक्ती व सृजनशक्ती यांचा चांगला उपयोग आपण कराल. संततीची प्रगती होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल. आणखी वाचा
वृश्चिक- आज शारीरिक व मानसिक दृष्टया भीतीचा अनुभव आपण घ्याल. आज कोणती ना कोणती चिंता सतावेलच. कुटुंबीय, नातलग व संबंधित यांच्याशी पटणार नाही. आणखी वाचा
धनु- आज आपल्यावर गूढ व रहस्यमय विद्येचा विशेष प्रभाव राहील. त्याचा अभ्यास व संशोधन यांत गोडी राहील. मन शांत व प्रसन्न राहील. आणखी वाचा
मकर- आज संयमित बोलणे आपणाला अनेक संकटातून वाचवेल. म्हणून विचारपूर्वक बोला. कुटुंबियांशी गैरसमज झाल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आणखी वाचा
कुंभ- आजचा दिवस शारीरिक व मानसिक स्वास्थ्य व उत्साहाचा आहे. आर्थिक दृष्टया लाभदायक दिवस आहे. आप्तेष्ट व मित्र यांच्यासह रुचकर व स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल. आणखी वाचा
मीन- आज आपल्या मनाची एकाग्रता राहिल्यामुळे मानसिक व्यग्रता जाणवेल. मंगल कार्यावर खर्च होईल. स्वकीयांपासून दूर जावे लागेल. आणखी वाचा
