आजचे राशीभविष्य, १८ मार्च २०२३: आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता, लाभदायी दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 07:12 IST2023-03-18T07:11:29+5:302023-03-18T07:12:12+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य, १८ मार्च २०२३: आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता, लाभदायी दिवस
मेष- आज चंद्र धनु राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपण एखाद्या अडचणीत सापडू शकता. नोकरीत इतरांशी प्रेमाने वागून कार्य पूर्ण करून घ्या. वाद संभवतात. नशिबाची साथ मिळणार नाही. कामात त्वरित यश मिळणार नाही. दुपार नंतर परिस्थितीत सुधारणा होईल. वैवाहिक जीवनातील वातावरण आनंदी राहील. आणखी वाचा
वृषभ- आज आपण हळवे व्हाल व त्यामुळे आपणास बेचैनी जाणवेल. शारीरिक स्वास्थ्यावर सुद्धा त्याचा नकारात्मक परिणाम होईल. नवे कार्य आज सुरू करू नका. उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवा. खाण्या-पिण्याकडे लक्ष द्या. व्यवसायात विघ्ने येतील. नोकरीत वरिष्ठांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
मिथुन- आज आपली मनःस्थिती मनोरंजनात्मक कार्यात सहभागी होण्याची असल्याने मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. रुचकर भोजन व उंची वस्त्रालंकार लाभतील. दुपार नंतर आपण जास्त हळवे व्हाल व त्यामुळे मनातील दुःख वाढेल. आर्थिक खर्चात वाढ होईल. अवैध कार्यापासून दूर राहा. आणखी वाचा
कर्क- आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना दिवस लाभदायी आहे. नोकरीतील उत्तम कामगिरीमुळे बढती मिळण्याची शक्यता निर्माण होईल. दुपार नंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्रांसह सहल व स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेण्याची संधी प्राप्त होईल. आणखी वाचा
सिंह- साहित्य व कला ह्यातील गोडी वाढेल. पोटाच्या तक्रारींमुळे अस्वस्थता जाणवेल. दुपार नंतर आर्थिक अडचण दूर होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रकृतीत सुधारणा होईल. आणखी वाचा
कन्या- आज शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मातेची प्रकृती बिघडेल. स्वकीयांवर संकट ओढवेल. धनहानी संभवते. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावे. शक्यतो प्रवास टाळावेत. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्या विषयी चिंता निर्माण होईल. आणखी वाचा
तूळ- आजचा दिवस नवीन कार्याचा आरंभ करण्यास अनुकूल आहे. गूढ विद्यांचे आकर्षण निर्माण होईल. दुपार नंतर मात्र आनंद व उत्साहाचा अभाव जाणवेल. आणखी वाचा
वृश्चिक- आज आपल्या एखाद्या वक्तव्यामुळे कुटुंबीयांची मने दुखावण्याची शक्यता आहे. कामात अपेक्षित यश प्राप्त होणार नाही. मनाची अवस्था द्विधा होईल. कामाचा व्याप वाढेल. दुपार नंतर मात्र मनातील मरगळ दूर होईल. मित्र आणि संबंधीतांशी सुसंवाद साधू शकाल. आणखी वाचा
धनु- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नियोजित कामे पूर्ण होऊन धनप्राप्ती होईल. शारीरिक व मानसिक दृष्टया उत्साहित व ताजेतवाने राहाल. प्रत्येक काम उत्साहाने कराल. प्रवास संभवतो. दुपार नंतर मात्र द्विधा मनःस्थिती होईल. आणखी वाचा
मकर- आज आपल्या बोलण्या वागण्याने भांडण होण्याची शक्यता असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. संतापाचे प्रमाण वाढेल. मन चिंतीत राहील. मनःशांती मिळविण्याचा प्रयत्न करा. दुपार नंतर स्फूर्ती व उत्साह वाढेल. घरातील वातावरण शांत व आनंददायी होईल. एखाद्या मंगलकार्यात सहभागी होऊ शकाल. आणखी वाचा
कुंभ- आजचा दिवस सर्व दृष्टींनी लाभदायी आहे. सामाजिक क्षेत्रात आपण सक्रीय राहाल व त्याच्या फल स्वरूप आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकल्याने त्यांच्या आनंदात भर पडेल. दुपार नंतर मात्र घरातील वातावरण कलुषित होईल. आणखी वाचा
मीन- आजचा दिवस आपणास सर्व दृष्टींनी लाभदायी आहे. हातून परोपकारी कार्य घडेल. व्यापारात सुयोग्य नियोजनामुळे व्यापार वृद्धी करू शकाल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामाचे कौतुक करतील. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. आणखी वाचा