आजचे राशीभविष्य- १८ जानेवारी २०२३: वृश्चिक राशीतील व्यक्ती आज अडचणीत येण्याची शक्यता; एखादी अप्रिय घटनाही संभवते...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 07:31 IST2023-01-18T07:17:47+5:302023-01-18T07:31:02+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope - January 18, 2023: Scorpio may get into trouble today; An unpleasant incident is also possible...! | आजचे राशीभविष्य- १८ जानेवारी २०२३: वृश्चिक राशीतील व्यक्ती आज अडचणीत येण्याची शक्यता; एखादी अप्रिय घटनाही संभवते...!

आजचे राशीभविष्य- १८ जानेवारी २०२३: वृश्चिक राशीतील व्यक्ती आज अडचणीत येण्याची शक्यता; एखादी अप्रिय घटनाही संभवते...!

मेष- चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आजच्या दिवसाची सुरुवात आनंदात होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपार नंतर नवीन कार्यारंभ करण्यात अडचणी येतील. आपल्या कृती संयमित ठेवणे हितावह राहील. आणखी वाचा

वृषभ- चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. व्यापार - व्यवसायात यश प्राप्ती होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. आर्थिक लाभ संभवतात. प्रतिस्पर्ध्यांना चकवा देऊ शकाल. दुपार नंतर चांगले मनोरंजन होईल. आणखी वाचा

मिथुन- चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. आजचा आपला दिवस बौद्धिक कामे व चर्चा करण्यात जाईल. आपल्या कल्पनाशक्तिस वाव मिळेल. शारीरिक व मानसिक आरोग्यास मात्र जपावे लागेल. आणखी वाचा

कर्क- चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. प्रवासात त्रास संभवतो. जमीन व वाहन या विषयीच्या समस्या भेडसावतील दुपार नंतर परिस्थितीत बदल होईल. शांतता लाभेल. आणखी वाचा

सिंह- चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आजचा दिवस प्रवासास अनुकूल आहे. परदेशस्थ नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. धनलाभ संभवतो. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. दुपार नंतर आपली सहनशीलता दिसून येईल. आणखी वाचा

कन्या- चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आज आपली मानसिक स्थिती द्विधा असल्याने नवीन कार्याचा आरंभ करण्यात त्रास होईल. कुटुंबियांशी वाद होऊन आपले मन दुखावले जाण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा

तूळ- चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आज शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दृढ विचार व वैचारिक संतुलन ह्यामुळे हाती घेतलेले काम सहजपणे पूर्ण करू शकाल. वस्त्रालंकार व मनोरंजन ह्यासाठी पैसा खर्च होईल. दुपारनंतर द्विधा मनःस्थिती होईल. आणखी वाचा

वृश्चिक- चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आज आपला संतापीपणा व अविचारीपणा ह्यामुळे आपण अडचणीत येण्याची शक्यता आहे. एखादी अप्रिय घटना संभवते. दुपार नंतर शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा

धनु- चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नोकरीत बढती संभवते. मित्रांसह सहलीस जाऊ शकाल. व्यापारात लाभ होईल. आणखी वाचा

मकर​​​​​​​- चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टिने आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापार -व्यवसायात वृद्धी संभवते. व्यवसायात अनुकूलता जाणवेल. सहकारी उत्तम सहकार्य करतील. आणखी वाचा

कुंभ- चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आज आपण बौद्धिक काम, नवनिर्मिती व लेखनकार्यात व्यस्त राहाल. नवीन काम सुरू करू शकाल. एखाद्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. व्यापारात लाभाच्या संधी लाभतील मात्र त्या फसव्या असण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

मीन- चंद्र आज तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आज आपणाला आपल्या कृतीवर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope - January 18, 2023: Scorpio may get into trouble today; An unpleasant incident is also possible...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app