आजचे राशीभविष्य - 18 डिसेंबर 2022; वाणीवर संयम ठेवल्यास संघर्ष टाळू शकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 07:34 IST2022-12-18T07:33:46+5:302022-12-18T07:34:44+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope - December 18, 2022; If you keep your voice, you can avoid conflict | आजचे राशीभविष्य - 18 डिसेंबर 2022; वाणीवर संयम ठेवल्यास संघर्ष टाळू शकाल

आजचे राशीभविष्य - 18 डिसेंबर 2022; वाणीवर संयम ठेवल्यास संघर्ष टाळू शकाल

मेष - आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल. धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवू शकाल. बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल. वाणीवर संयम राखणे आवश्यक आहे. आणखी वाचा

वृषभ - वाणीच्या प्रभावाने इतरांना मंत्रमुग्ध करून लाभ मिळवाल. नवीन संबंध जुळण्याची शक्यता आहे. वैचारिक समृद्धी वाढेल व मन आनंदी रहील. शुभ कार्याची प्रेरणा मिळेल. कष्टाच्या मानाने फळ मात्र कमी मिळेल. आणखी वाचा

मिथुन - आज आपल्या मनात विविध विचार तरंग उमटतील. त्या विचारांत आपण गढून जाल. आज बौद्धिक कार्य कराल. मात्र वाद टाळावेत. आपण आज संवेदनशील व्हाल. आई व स्त्रियांशी संबंधित विषयात हळवे व्हाल. शक्यतो प्रवास टाळण्याचा प्रयत्न करावा.  आणखी वाचा

कर्क - आज शारीरिक व मानसिक उत्साहा बरोबर घरातील वातावरणही आनंदी असेल. मित्र - स्नेहीजन ह्यांचा सहवास घडेल. मित्रांकडून लाभ होईल. मंगल कार्याची सुरूवात करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कामातील यश व प्रिय व्यक्तीचा सहवास ह्यामुळे आपण आनंदी राहाल. आर्थिक लाभ संभवतो. आणखी वाचा 

सिंह - आज विविध योजनांच्या विषयांवर अधिक विचार केल्यामुळे द्विधा अवस्था होईल. तरीही कुटुंबीयांसह चांगले वातावरण राहील्याने आपली प्रसन्नता वाढेल. दूरस्थ व्यक्ती किंवा संस्था यांच्या बरोबरचे संबंध दृढ होतील की ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. अतिरिक्त खर्च संभवतात. आणखी वाचा

कन्या - आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गोड बोलण्याने आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. प्रकृती उत्तम राहील. शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळावी. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. प्रवास संभवतो. आणखी वाचा

तूळ - आज आपणास क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. शक्यतो वाद टाळावेत. कुटुंबियांशी एखाद्या विषयावर वाद संभवतात. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. विशेषतः डोळ्यांची निगा राखावी लागेल. एखादा अपघात संभवतो. कोर्ट - कचेरीच्या प्रकरणात लक्ष घालावे लागेल. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची छटा पसरेल. प्रत्येक कार्यात यश मिळेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. पिता व वडीलधार्‍यांकडून लाभाची शक्यता. व्यावसायिक क्षेत्रात प्रवास होईल. आणखी वाचा

धनु - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची छटा पसरेल. प्रत्येक कार्यात यश मिळेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. पिता व वडीलधार्‍यांकडून लाभाची शक्यता. व्यावसायिक क्षेत्रात प्रवास होईल.  आणखी वाचा

मकर -  आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. बौद्धिक व व्यावसायिक क्षेत्रात आपण नव्या विचारांनी प्रभावित व्हाल. सृजनात्मक क्षेत्रात नवीन रचना क्षमतेचा परिचय करून द्याल. तरीही मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. संतती विषयक प्रश्न आपणाला दुःख देतील. पैश्यांचा अपव्यय होणार नाही याकडे लक्ष द्या. आणखी वाचा

कुंभ - आज अवैध कृत्यां पासून दूर राहावे. वाणीवर संयम ठेवल्यास पारिवारिक संघर्ष टाळू शकाल. प्रत्येक घटना व्यक्ती व वस्तू ह्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहाल. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण जाणवेल. क्रोधावर संयम ठेवा. आणखी वाचा

मीन - आज दैनंदिन कामातून मोकळीक मिळून बाहेर हिंडण्या - फिरण्याला जाण्यास व मनोरंजनासाठी वेळ काढाल. कुटुंबीय व मित्रांना पण त्यात समाविष्ट करून घ्याल. त्यांनाही त्याचा आनंद वाटेल. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope - December 18, 2022; If you keep your voice, you can avoid conflict

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app