आजचे राशीभविष्य - 15 डिसेंबर 2022; एखादी नवीन योजना सुरु करण्यास आजचा दिवस उत्तम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 07:18 IST2022-12-15T07:18:04+5:302022-12-15T07:18:28+5:30

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope - December 15, 2022; Today is a good day to start a new plan | आजचे राशीभविष्य - 15 डिसेंबर 2022; एखादी नवीन योजना सुरु करण्यास आजचा दिवस उत्तम

आजचे राशीभविष्य - 15 डिसेंबर 2022; एखादी नवीन योजना सुरु करण्यास आजचा दिवस उत्तम

मेष - आज आपणास शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल. कामाच्या मानाने यशप्राप्ती कमी झाल्याने हताश होण्याची वेळ येईल. सट्ट्या संबंधी थोडे चिंतित राहाल. कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष होईल. शक्यतो प्रवास टाळा. आणखी वाचा 

वृषभ - आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वास व दृढ मनोबलाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. वडिलांकडून आपणास काही लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासात उत्तम यश मिळवतील. संततीचे शिक्षण व अन्य बाबी ह्यासाठी खर्च होईल. आणखी वाचा

मिथुन -आजचा दिवस नवीन योजना सुरु करण्यास उत्तम आहे. व्यावसायिकांना सरकारकडून लाभ मिळेल. तसेच नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. भावंडे व शेजारी ह्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध राहतील. स्वास्थ्य टिकून राहील. आणखी वाचा

कर्क -आज आपण शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. परिणामतः मनात नकारात्मक विचार निर्माण होतील. गैरसमजातून काही मतभेद होतील. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. आणखी वाचा

सिंह - आज भरपूर आत्मविश्वास व दृढ निर्णयशक्ती ह्यांच्या जोरावर कोणतेही काम लगेच निर्णय घेऊन पूर्ण कराल. समाजात मान - प्रतिष्ठा वाढेल. वडील तसेच भावना प्रधान लोकांचा सहयोग प्राप्त होईल. मन आनंदी राहील. आणखी वाचा

कन्या - आज शारीरिक अस्वस्थते बरोबरच मानसिक चिंता वाढतील. डोळ्यासंबंधी तक्रार निर्माण होईल. कुटुंबियांशी मतभेद होतील. कठोर बोलणे व गर्व ह्यामुळे कोणाशी भांडण होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. अचानक खर्च वाढतील. आणखी वाचा

तूळ - आज विविध क्षेत्रातून फायदा मिळाल्याने शारीरिक व मानसिक दृष्टया आपण आनंदी व स्वस्थ राहाल. मित्रांचा सहवास, एखाद्या रम्य ठिकाणास भेट हे आज नक्की घडेल. वैवाहिक जीवनात सुख - शांतीचा अनुभव येईल. आणखी वाचा 

वृश्चिक - आज आपली सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. संसारात आनंद व समाधान राहील. समाजात मान - प्रतिष्ठा मिळेल. आरोग्य उत्तम राहील. वरिष्ठ व वडिलधार्यांची मर्जी राहील. आणखी वाचा

धनु -  शरीरात थकवा, उबग व बेचैनी राहील. प्रकृती साधारण राहील. मन चिंतित असेल. आज शक्यतो प्रवास टाळावेत. संतती विषयी चिंता निर्माण होईल. नशिबाची साथ मिळणार नाही. आणखी वाचा 

मकर - आज आहाराकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा प्रकृतीत बिघाड होऊ शकेल. आजाराच्या तपासण्या, प्रवास किंवा व्यापारातील कामे यासाठी पैसा खर्च होईल. नकारात्मक विचार व राग दूर ठेवल्यास संकटा पासून आपला बचाव करू शकाल. आणखी वाचा

कुंभ - आज खंबीर मन व दृढ आत्मविश्वासाने आपण प्रत्येक काम कराल. प्रवास - सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद व नवी वस्त्र परिधान करण्याचे प्रसंग येतील. आणखी वाचा

मीन -आजचा दिवस शुभ फलदायी आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. शारीरिक स्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. स्वभावातून अती उत्साह व उग्रता काढून टाकणे हितावह होईल. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope - December 15, 2022; Today is a good day to start a new plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app