आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२२: वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभाचा दिवस, व्यापाऱ्यांसाठीही शुभ दिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 07:41 IST2022-12-27T07:40:30+5:302022-12-27T07:41:00+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today s Horoscope December 27 2022 A day of financial gain for Taurus people auspicious day for traders too know whats your rashi says zodiac signs astrology | आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२२: वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभाचा दिवस, व्यापाऱ्यांसाठीही शुभ दिन

आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२२: वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक लाभाचा दिवस, व्यापाऱ्यांसाठीही शुभ दिन

मेष: आज आपण आपल्या कौटुंबिक गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. कुटुंबीयांची एकत्रितपणे बैठक घेऊन एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा कराल. घराचा कायापलट करण्याच्या दृष्टीने काही नवीन मांडणी - सजावट ह्याचा सुद्धा विचार कराल. कामात समाधान लाभेल. आणखी वाचा 

वृषभ: व्यापार्‍यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आर्थिक लाभ प्राप्त होतील. विदेशातील मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून येणार्‍या बातम्या आपणाला भाव विवश बनवतील. आणखी वाचा 

मिथुन: आज एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. एखादी शस्त्रक्रिया करावी लागेल. रागामुळे स्वतःचीच हानी होण्याची शक्यता असल्याने डोके शांत ठेवा. मानहानी संभवते. आज आपण मनाने अस्वस्थ असाल. बोलण्यावर ताबा ठेवून वादविवाद टाळणे हेच आपल्या हिताचे आहे. आणखी वाचा 

कर्क: आजचा दिवस मित्र व स्वकियांच्या सहवासात आपण आनंदात घालवाल. मनोरंजनातून आनंद मिळेल. व्यापारात फायदा होईल. भागीदारांकडूनही लाभ होईल. आणखी वाचा 

सिंह:  आज घरात हर्ष व आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती व आनंद लाभेल. नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील. आणखी वाचा 

कन्या:  आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल आहे. संतती विषयी चिंता लागून राहील. सट्टा - शेअर बाजार ह्यात सावध राहून व्यवहार करावेत. मन दु:खी असेल. आणखी वाचा 

तूळ:  आज आपणास अतिशय संवेदनशीलता व विचारांचे अवडंबर ह्या मुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. माता व स्त्रियांच्या बाबतीत काळजी लागून राहील. प्रवासासाठी आजचा दिवस अनुकूल नसल्याने प्रवास टाळा. छातीदुखीचा त्रास जाणवेल. आणखी वाचा 

वृश्चिक: आजचा दिवस आपण खुशीत घालवाल. नवीन कामाची सुरुवात कराल. घरात भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. स्वकीय व मित्रांशी सुसंवाद साधाल. जवळपासचे प्रवास होतील. सर्व कामे पूर्ण होतील. जीवनात काही लाभदायक बदल होतील. आणखी वाचा 

धनु: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबियांशी गैरसमज निर्माण झाल्यामुळे मतभेद वाढतील. आज मानसिक व्यवहारात खंबीरता नसल्यामुळे कोणताही निर्णय घाईगडबडीने घेऊ नका. महत्वाचा निर्णय घेऊच नका. आणखी वाचा 

मकर: आज नियोजीत काम व्यवस्थित पार पडेल. कार्यालय वा कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. गृहजीवनात वातावरण आनंदी राहील. प्रकृती उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. मित्र, स्नेही ह्यांच्या सहवासाने एकदम खुश व्हाल.  आणखी वाचा 

कुंभ: आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. शक्यतो कोर्ट - कचेरी पासून दूर राहा. आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा. कुटुंबियांशी मतभेद होतील. एखादा अपघात संभवतो. आणखी वाचा 

मीन: आज अचानक धनलाभ संभवतो. संतती कडून चांगली बातमी मिळेल. बालपणीचे किंवा जुने मित्र भेटल्याने आनंदीत व्हाल. नवीन मित्रांशी सुद्धा संपर्क होईल व त्याचा भविष्यात फायदा होईल. सामाजिक प्रसंगात भाग घेण्यासाठी बाहेर जावे लागेल. आणखी वाचा 

Web Title: Today s Horoscope December 27 2022 A day of financial gain for Taurus people auspicious day for traders too know whats your rashi says zodiac signs astrology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app