Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 7 ऑगस्ट 2022; बौद्धीक चर्चेत सहभागी न होणे हितवह राहील, वादाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 07:25 AM2022-08-07T07:25:52+5:302022-08-07T07:27:53+5:30

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope: Today's Horoscope - 7th August 2022; It would be beneficial not to participate in intellectual discussions, the possibility of arguments | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 7 ऑगस्ट 2022; बौद्धीक चर्चेत सहभागी न होणे हितवह राहील, वादाची शक्यता

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 7 ऑगस्ट 2022; बौद्धीक चर्चेत सहभागी न होणे हितवह राहील, वादाची शक्यता

googlenewsNext

मेष - तूळ राशीचा चंद्र आज आपल्या सातवा स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरुवात आनंदात होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आणखी वाचा

वृषभ - तूळ राशीचा चंद्र आज आपल्या सहावा स्थानी असेल. व्यापार - व्यवसायात यश प्राप्ती होईल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. आर्थिक लाभ संभवतात. प्रतिस्पर्ध्यांना चकवा देऊ शकाल. आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामात अडचणी येतील. वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेत आज सहभागी न होणे हितावह राहील. संतती विषयक काळजी निर्माण होईल. आणखी वाचा

 

कर्क  - आज काही ना काही कारणाने आपणास नैराश्य येईल. त्याचा आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होईल. शक्यतो आज प्रवास टाळावेत. स्थावर संपत्तीचा व्यवहार न करणे हितावह होईल. आणखी वाचा

सिंह - आज अचानकपणे प्रवास घडतील. नवीन कार्यारंभ कराल. परदेशातून लाभदायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. फायदेशीर गुंतवणूक करू शकाल. दुपार नंतर अधिक भावनाशील व्हाल. मनात निराशेची भावना वाढू शकेल. आणखी वाचा

कन्या - आज निर्णय घेण्यात त्रास होण्याची शक्यता असल्याने नवीन कामाची सुरवात आपण यशस्वीपणे करू शकणार नाही. आज मतभेद होण्याची शक्यता असल्याने शक्यतो मौन पाळावे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सामान्य राहील. आणखी वाचा

तूळ - आज दिवसाच्या प्रारंभी आपले विचार दृढ व समतोल असतील. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. नवी वस्त्रे व अलंकार ह्यावर जास्त खर्च होईल. आणखी वाचा

वृश्चिक - तूळ राशीचा चंद्र आज आपल्या बारावा स्थानी असेल. आज आपल्या मनाला शांतता लाभेल. मनात येणार्‍या नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कोर्ट- कचेरीच्या कामात सावध राहावे लागेल. आणखी वाचा

धनु - आजचा दिवस लाभदायी आहे. प्राप्तीत वाढ संभवते. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने मन प्रसन्न होईल. मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल. व्यापारात लाभ संभवतो. अपघाताची शक्यता आहे. आणखी वाचा

मकर - कौटुंबिक जीवनाच्या दृष्टिने आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापार -व्यवसायात वृद्धी संभवते. व्यवसायात अनुकूलता जाणवेल. सहकारी उत्तम सहकार्य करतील. आणखी वाचा

कुंभ - आज आपण बौद्धिक काम, नवनिर्मिती व लेखनकार्यात व्यस्त राहाल. नवीन काम सुरू करू शकाल. एखाद्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. व्यापारात लाभाच्या संधी लाभतील मात्र त्या फसव्या असण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

मीन - आज वाद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वाणी व क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. गूढ विद्येचे आकर्षण होईल. सुखदायी बाबींत गोडी वाटेल. आणखी वाचा  

 

Web Title: Today Daily Horoscope: Today's Horoscope - 7th August 2022; It would be beneficial not to participate in intellectual discussions, the possibility of arguments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app