Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ डिसेंबर २०२२: ‘या’ ८ राशींना आर्थिक लाभ; शुभ-फलदायी दिवस, प्रतिष्ठा वाढेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 07:19 IST2022-12-21T07:16:45+5:302022-12-21T07:19:16+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ डिसेंबर २०२२: ‘या’ ८ राशींना आर्थिक लाभ; शुभ-फलदायी दिवस, प्रतिष्ठा वाढेल
मेष: वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस फारच चांगला आहे. जोडीदारासह वैवाहिक जीवनाचा आनंद सुद्धा उपभोगू शकाल. आर्थिक लाभ तसेच प्रवास संभवतात. राग व अधिकार गाजविण्याची भावना वाढेल. आपल्या कामाचे कौतुक होईल. शक्यतो वाद टाळा. आणखी वाचा
वृषभ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल. नियोजनाप्रमाणे सर्व कामे पार पडतील. आर्थिक लाभ संभवतात. माहेरहून एखादी चांगली बातमी मिळून काही लाभ होण्याची शक्यता आहे. कार्यालयीन कामे पूर्ण होतील. आणखी वाचा
मिथुन: आज वैवाहिक जोडीदार व संतती ह्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. शक्यतो वाद - विवाद व बौद्धिक चर्चे पासून दूर राहा. मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. नव्या कार्याचा आरंभ करण्यात अडचण येण्याची शक्यता आहे. प्रवासात त्रास संभवतो. आणखी वाचा
कर्क: आज आपल्यात आनंद व स्फूर्ती ह्यांचा अभाव दिसून येईल. मन खिन्न होईल. छातीत दुखणे किंवा इतर काही कारणांनी त्रास होईल. निद्रानाश होईल. सार्वजनिक ठिकाणी स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो. पैसा खर्च होईल. आणखी वाचा
सिंह: आपणास मिळेल. संबंधां मधील भावनांची जाणीव आपणाला होईल. एखाद्या रम्य स्थळी सहलीला जाण्याचा बेत ठरवू शकाल. मानसिक चिंता दूर होतील. कार्यात यशस्वी व्हाल. आणखी वाचा
कन्या: आज कुटुंबातआनंदाचे वातावरण राहील. इतरांशी गोड बोलून आपण आपले निर्धारित काम पूर्ण करू शकाल. प्रकृती उत्तम राहील. वाद होण्याच्या शक्यतेमुळे कोणाशी बौद्धिक चर्चा करणे टाळावे. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. प्रवास होतील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. आणखी वाचा
तूळ: आज आपल्यातील रचनात्मक शक्ती प्रकट होईल. सृजनात्मकताही दिसून येईल. वैचारिक दृढता असेल व त्यामुळे कामे सफल बनतील. वस्त्रालंकार, मौज - मजेची साधने व मनोरंजनावर पैसे खर्च होतील. आत्मविश्वास वाढेल. जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी असेल. आणखी वाचा
वृश्चिक: आज आपला पैसा व वेळ हौसमौज व मनोरंजन ह्यासाठी खर्च होईल. स्वास्थ्या संबंधी तक्रार राहील. मनाला चिंता लागून राहील. कुटुंबात गैरसमज किंवा मतभेद होतील. कोर्ट - कचेरीच्या कामात सावध राहावे लागेल. प्रत्येक विषयात संयम ठेवून व्यवहार केल्यास अनर्थ होणार नाही. आणखी वाचा
धनु: आजचा दिवस लाभदायक आहे. संसारात सुख - शांती नांदेल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय राहील. उत्पन्नाचे मार्ग वाढतील. उच्च अधिकारी व वडीलधारी यांची मर्जी राहील. मित्रांसह एखाद्या पर्यटनाचा बेत ठरेल. उत्तम भोजन प्राप्तीमुळे आनंद वाटेल. आणखी वाचा
मकर: आज व्यापार - व्यवसायात लाभ होईल. वसुली, प्रवास, मिळकत यांसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. सरकारी कामात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामाची प्रशंसा करतील. बढती संभवते. पित्याकडून लाभ होईल. संततीच्या शिक्षणा संबंधी समाधान लाभेल. प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा
कुंभ: आज आपण जरी शारीरिक दृष्टया अस्वस्थ असलात तरीही मानसिक दृष्टया स्वस्थता टिकवण्याचा प्रयत्न करा. काम करण्याचा उत्साह कमी राहील. नोकरीत वरिष्ठांच्या नाराजीस सामोरे जावे लागेल. मौज - मजा तसेच सहलीसाठी खर्च होईल. संतती बाबतीत चिंता राहील. आणखी वाचा
मीन: आज आपणास अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. मानसिक तसेच शारीरिक श्रमामुळे स्वास्थ्य खराब होऊ शकते. सर्दी, श्वसनाचा त्रास, खोकला व पोट दुखी यांचा जोर वाढेल. खर्चात वाढ होईल. इस्टेटीतून फायदा होईल. आपले श्रम कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहा. आणखी वाचा
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"