आज चंद्र रास बदलून 03 नोव्हेंबर, 2025 सोमवार च्या दिवशी मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस अस्वास्थ्य व त्रासाचा आहे. ताप, सर्दी, खोकला ह्यांचा त्रास संभवतो. इतरांचे भले करण्याच्या नादात आपणावर संकटे कोसळतील. शक्यतो आज आर्थिक व्यवहार टाळावेत. तसेच कोणाला जामीन राहू नये. निर्णयशक्तीच्या अभावामुळे मनःस्थिती द्विधा होईल व त्यामुळे चिंता वाढतील. अधिक लाभाच्या हव्यासापोटी नुकसान होण्याची शक्यता आहे.