आज चंद्र 29 डिसेंबर, 2025 सोमवार च्या दिवशी मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तसेच संतापावर व जिभेवर ताबा ठेवावा लागेल. त्यामुळे कोणाशी कटुता येणार नाही व मनातून नकारात्मक विचार दूर होतील. दुपार नंतर विचारात स्थैर्य येईल. सृजनशील व कलात्मक गोष्टींकडे आपला कल राहील. घरातील वातावरण सुख- समाधानाचे राहील. कार्यात यश मिळवू शकाल.