आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 07:30 IST2025-11-25T07:29:54+5:302025-11-25T07:30:33+5:30

Daily Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस.. वाचा काय सांगते तुमची रास

daily horoscope 25 November 2025 astrology day predictions based on zodiac signs | आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!

आजचे राशीभविष्य, २५ नोव्हेंबर २०२५: प्रियजनांचा सहवास लाभेल, प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल!

मेष- आज नोकरीत वरिष्ठां बरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा होऊन आपण आखलेल्या योजनेला सरकार कडून फायदा होईल. कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल व त्यात बदल करून वातावरण प्रसन्न बनवाल. आणखी वाचा

वृषभ- आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. व्यापारी आपल्या व्यापारात भांडवल घालून नवीन कामे सुरू करतील व भविष्यातील योजना ठरवतील. परदेशी प्रवास घडतील. एखाद्या प्रवासाने मन प्रसन्न झाले तरी सुद्धा प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कामाचा व्याप वाढेल. आणखी वाचा

मिथुन- आज कोणत्याही प्रकारच्या संकटा पासून बचाव होण्यासाठी रागावर नियंत्रण ठवावे लागेल. आजचा दिवस शस्त्रकियेसाठी अनुकूल नाही. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण भासेल. कुटुंबीय व सहकारी यांच्याशी मतभेद झाल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आणखी वाचा

कर्क- आजचा दिवस मित्र व स्वकियांच्या सहवासात आपण आनंदात घालवाल. मनोरंजनातून आनंद मिळेल. व्यापारात फायदा होईल. भागीदारांकडूनही लाभ होईल. छोटासा प्रवास घडेल जो दीर्घकाळ स्मृतीत राहील. समाजात मान - सन्मान वाढेल. आणखी वाचा

सिंह- आज घरात हर्ष व आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती व आनंद लाभेल. नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील. व्याधीमुक्त व्हाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आणखी वाचा

कन्या- आजचा दिवस चिंता व उद्विग्नपूर्ण असून या ना त्या कारणाने काळजी वाढवेल. विशेषतः संतती व आरोग्य विषयक जास्त चिंता वाटेल. पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येतील. अचानक धनखर्च होईल. शेअर - सट्टा यांपासून दूर राहावे. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. आणखी वाचा

तूळ- आज शारीरिक थकवा व मानसिक दृष्टया आपण व्यस्त राहाल. माते विषयी चिंता राहील. स्थावर संपत्ती विषयीचे व्यवहार सांभाळून करावे लागतील. शक्य असेल तर प्रवास टाळा. कौटुंबिक वातावरण कलहाचे असेल. एखादी मानहानी संभवते. आणखी वाचा

वृश्चिक- आजचा दिवस आपण खुशीत घालवाल. नवीन कामाची सुरुवात कराल. घरात भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. स्वकीय व मित्रांशी सुसंवाद साधाल. जवळपासचे प्रवास होतील. सर्व कामे पूर्ण होतील. जीवनात काही लाभदायक बदल होतील. आणखी वाचा

धनु- आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. वायफळ खर्च होतील. मनास मरगळ येईल. कुटुंबीयांशी गैरसमज झाल्याने मनस्ताप होईल. कामात अपेक्षित यश मिळणार नाही. व्दिधा मनःस्थितिमुळे कोणताही महत्वाचा निर्णय आपण घेऊ शकणार नाही. आणखी वाचा

मकर- आज नियोजीत काम व्यवस्थित पार पडेल. कार्यालय वा कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. गृहजीवनात वातावरण आनंदी राहील. प्रकृती उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल. मित्र, स्नेही ह्यांच्या सहवासाने एकदम खुश व्हाल. उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. आणखी वाचा

कुंभ- आज कोणाला जामीन राहणे, पैसे देणे - घेणे करू नका. खर्च वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. कोणाशी गैरसमजाने भांडण होऊ शकेल. रागावर नियंत्रण ठेवा. दुर्घटनेपासून जपा. आणखी वाचा

मीन- आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. वडीलधारी व मित्रांकडून लाभ होईल. नवे मित्र मिळतील. त्यांची मैत्री भविष्यकाळात लाभदायक ठरेल. मंगलकार्यात हजेरी लावाल. मित्रांसह सहलीचे बेत आखाल. अचानक धनलाभ होईल. आणखी वाचा

Open in app

Web Title : राशिफल, 25 नवंबर, 2025: प्रियजनों का साथ, प्रतिद्वंद्वियों पर विजय!

Web Summary : मेष राशि वालों को सरकारी योजनाओं से लाभ होगा। वृषभ यात्रा कर सकते हैं। मिथुन राशि वालों को क्रोध पर नियंत्रण रखना चाहिए। कर्क राशि वाले प्रियजनों के साथ समय का आनंद लें। सिंह राशि वाले सुख और सफलता का अनुभव करते हैं। कन्या राशि वाले चिंताओं का सामना करते हैं। तुला राशि वाले थका हुआ महसूस करते हैं। वृश्चिक राशि वाले नए काम शुरू करते हैं। धनु राशि वालों को गलतफहमी होती है। मकर राशि वालों का दिन अच्छा है। कुंभ राशि वालों को क्रोध पर नियंत्रण रखना चाहिए। मीन राशि वालों को धन लाभ होता है।

Web Title : Horoscope, November 25, 2025: Enjoy loved ones, conquer rivals!

Web Summary : Aries benefits from government schemes. Taurus may travel. Gemini should control anger. Cancer enjoys time with loved ones. Leo experiences happiness and success. Virgo faces worries. Libra feels tired. Scorpio starts new work. Sagittarius has misunderstandings. Capricorn has a good day. Aquarius should control anger. Pisces gains money.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.