आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 07:26 IST2025-11-11T07:24:35+5:302025-11-11T07:26:32+5:30

Daily Horoscope : कसा असेल तुमचा आजचा दिवस.. वाचा काय सांगते तुमची रास

daily horoscope 11 November 2025 day prediction zodiac sign love life career things to do | आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !

आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !

मेष- आज आपले मन अधिक संवेदनशील बनेल. त्यामुळे कोणाचे बोलणे किंवा वागणे यामुळे मनाला दुःख होईल. मानसिक भीती बरोबर शारीरिक अस्वस्थतेमुळे आपण बेचैन व्हाल. आईचे स्वास्थ्य खराब असेल. आणखी वाचा...

वृषभ- आज चिंतेपासून मुक्तता मिळाल्याने आपण स्फूर्ती व उत्साह अनुभवाल. हळवेपणा व काल्पनिकता यांच्या जगात वावराल. आपल्या अंतर्गत कला व साहित्य बाहेर येण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा...

मिथुन- आज काम होण्यास वेळ लागला तरी प्रयत्न चालू ठेवणे हितावह राहील. कामे नक्की पूर्ण होतील. आर्थिक योजनात सुरुवातीला काही अडचणी येतील पण नंतर मार्ग मोकळा होताना दिसेल. आणखी वाचा...

कर्क- आजचा दिवस सर्व दृष्टीने आनंददायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया स्वस्थ व आनंदी राहाल. आप्तेष्ट व कुटुंबीयां कडून सौख्य व आनंद ह्यांची प्राप्ती होईल. तसेच त्यांच्या कडून काही भेटवस्तू मिळतील. आणखी वाचा...

सिंह- आज आपण अती भावनाशील व्हाल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. दलाली, चर्चा व वाद ह्या पासून दूर राहणे हितावह राहील. कोर्ट - कचेरीच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा... 

कन्या- आजचा दिवस लाभदायी आहे. विविध पातळ्यांवर यश, कीर्ति व लाभ होतील. धन प्राप्ती होईल. मित्र - मैत्रिणीं कडून काही लाभ संभवतात. प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे मन आनंदित होईल. आणखी वाचा...

तूळ- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात व कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. नोकरीत बढतीची संधी लाभेल. कौटुंबिक जीवनात आनंद व उत्साहाचे वातावरण असेल. आणखी वाचा...

वृश्चिक- आज नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी सावधपणे कामे करावी लागतील. . वरिष्ठांच्या नकारात्मक धोरणाने तुम्हाला त्रास होऊ शकतो. दिवस आळसात जाईल. संततीशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा...

धनु- आज आपणास खूप सावध राहावे लागेल. कोणतेही नवीन काम आज सुरू न करणे आपल्या हिताचे राहील. आत्यंतिक संवेदनशीलतेमुळे मनःस्थिती दुःखी होईल. पाण्या पासून सावध राहावे लागेल. आणखी वाचा...

मकर- विविध कारणांनी आपल्या व्यापाराचे विस्तृतीकरण होऊन त्यात वाढ होईल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादी मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल. धन लाभ संभवतो. संततीच्या अभ्यासा विषयी चिंता निर्माण होईल. आणखी वाचा...

कुंभ- आजचा दिवस आनंददायी आहे. कामात यश तसेच कीर्ती मिळेल. कुटुंबियांसह दिवस चांगला जाईल. नोकरी - व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. घरातील वातावरण आनंदी राहील. आणखी वाचा...

मीन- आज आपण काल्पनिक जगात रमून जाल. विद्यार्थ्यांना आपली हुशारी दाखविता येईल. प्रणयाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. पाण्या पासून शक्यतो दूर राहावे.मानसिक संतुलन सांभाळावे लागेल. आणखी वाचा...

Open in app

Web Title : आज का राशिफल, 11 नवंबर 2025: काम पूरे होंगे, आलस्य त्यागें!

Web Summary : मेष राशि वाले संवेदनशील महसूस करेंगे। मिथुन को शुरुआती बाधाओं का सामना करना पड़ेगा लेकिन सफलता मिलेगी। कर्क राशि वाले खुशियां मनाएंगे। वृश्चिक को आलस्य से बचना चाहिए। दूसरों को करियर, रिश्तों और वित्त में मिश्रित भाग्य मिलेगा। सावधानी से आगे बढ़ें।

Web Title : November 11, 2025 Horoscope: Work will be completed, avoid laziness!

Web Summary : Aries may feel sensitive. Gemini will face initial hurdles but succeed. Cancer enjoys happiness. Scorpio should avoid laziness. Others see mixed fortunes in career, relationships, and finances. Proceed cautiously.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.