आजचे राशीभविष्य - १४ जून २०२२: अतिरिक्त खर्च करावा लागेल; स्वभावातील तापटपणा वाढेल, एखादी मनाविरुद्ध घटना घडेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 07:40 IST2022-06-14T07:22:03+5:302022-06-14T07:40:01+5:30
Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य - १४ जून २०२२: अतिरिक्त खर्च करावा लागेल; स्वभावातील तापटपणा वाढेल, एखादी मनाविरुद्ध घटना घडेल
मेष- चंद्र वृश्चिक राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज नवीन कामाला यशस्वीपणे सुरुवात करू शकाल. आज आपण गूढ विद्या किंवा एखादा रहस्यमय विषय समजून घेण्याचा प्रयत्न कराल. दुपारनंतर प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा
वृषभ- चंद्र वृश्चिक राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरुवात आनंदाने व मित्रभेटीने होईल. नवीन ओळखी होतील. एखाद्या सहलीचे आयोजन यशस्वीपणे करू शकाल. परंतु दुपार नंतर वाद होण्याची शक्यता असल्याने बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा
मिथुन- चंद्र वृश्चिक राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आज कौटुंबिक वातावरण उल्हासमय राहील. शारीरिक स्फूर्ती व मानसिक प्रसन्नता लाभेल. अपूर्ण कामे पूर्णत्वास गेल्याने आनंदात वाढ होईल. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आर्थिक लाभ संभवतात. आणखी वाचा
कर्क- चंद्र वृश्चिक राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास अनुकूल आहे. एकाग्रतेने काम केल्यामुळे कामात यश जरूर मिळेल. वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा
सिंह- चंद्र वृश्चिक राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक दृष्टया अस्वस्थता जाणवेल. आईच्या प्रकृतीची चिंता राहील. आर्थिक हानी होऊ शकते. तरीही दुपार नंतर आर्थिक योजनांवर विचार कराल. परिश्रमानुरूप फळ मिळेल. विद्यार्थ्यांना यश प्राप्ती होईल. आणखी वाचा
कन्या- चंद्र वृश्चिक राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस भाग्यवर्धक आहे. आज अनेक लाभ होतील. आप्तांकडून काही लाभ संभवतो. आपसातील संबंधात प्रेम आणि सन्मानाचे वातावरण असेल. परंतु दुपार नंतर काही ना काही कारणाने आपण चिंतीत व्हाल व त्याचा प्रतिकूल परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होईल. आणखी वाचा
तूळ- चंद्र वृश्चिक राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वाद होण्याची शक्यता असल्याने आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. मनात नकारात्मक विचार येतील. आणखी वाचा
वृश्चिक- चंद्र वृश्चिक राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. सकाळी सौख्य व समाधान लाभेल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. एखादी चांगली बातमी ऐकीवात येईल. दुपार नंतर मात्र कुटुंबात एखादा गैरसमज पसरून वाद होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
धनु- चंद्र वृश्चिक राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. आनंद व सौख्यलाभ ह्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागेल. स्वभावातील तापटपणा वाढेल. एखादी मनाविरुद्ध घटना घडेल. आणखी वाचा
मकर- चंद्र वृश्चिक राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आज सामाजिक प्रसिद्धी मिळाल्याने व्यावसायिक व आर्थिक दृष्टया काही लाभ होतील. दुपार नंतर सावध राहावे लागेल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. अपघाताच्या शक्यतेमुळे वाहन जपून चालवावे. आणखी वाचा
कुंभ- चंद्र वृश्चिक राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपला मान-सन्मान झाल्याने काही धनलाभ होईल. प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. बढती संभवते. मित्रांसह सहलीला जाण्याचा बेत आखाल. आणखी वाचा
चंद्र वृश्चिक राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजची सकाळची वेळ व्यावसायिक व व्यापाऱ्यांसाठी प्रतिकूल आहे. नोकरीत वरिष्ठ व प्रतिस्पर्धी ह्यांच्याशी निष्कारण वाद होण्याची शक्यता आहे. प्रवास संभवतात. दुपार नंतर कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल बनेल. आणखी वाचा