आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 07:25 IST2025-09-29T07:24:41+5:302025-09-29T07:25:12+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope, September 29, 2025: There will be financial benefits even if expenses are incurred for important work | आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील

आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील

मेष - चंद्र आज 29 सप्टेंबर, 2025 सोमवार च्या दिवशी धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आज आपणाला थकवा, आळस व व्यग्रता जाणवेल. उत्साह अजिबात वाटणार नाही. प्रत्येक गोष्टीचा राग आल्याने आपली कामे बिघडतील. नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी किंवा घरात आपल्यामुळे कोणाचे मन दुखावणार नाही, ह्याची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा

वृषभ - आज शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. अशा परिस्थितीत नवीन कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील. आज आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी लागेल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. शक्यतो प्रवास टाळावेत. आज नियोजीत वेळेत आपले काम पूर्ण होऊ शकणार नाही. आणखी वाचा

मिथुन- आजचा दिवस मनोरंजन व आनंद - प्रमाद करण्याचा आहे. मित्र व कुटुंबीयांसह आनंदी वातावरणात दिवस घालवाल. सामाजिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल.  आणखी वाचा

कर्क - आजचा दिवस आनंददायी व यशदायी आहे. कुटुंबीयांसह आनंदात वेळ जाईल. महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील. आणखी वाचा

सिंह - आज आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. सृजनशीलता विकसित होऊन नवनिर्मिती सुंदर प्रकारे करता येईल. संततीकडून आनंददायी बातमी मिळेल. मित्रांचा सहवास आनंद देईल. आणखी वाचा 

कन्या - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. अनेक गोष्टींची काळजी लागून राहील. त्यामुळे शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. आईची प्रकृती बिघडेल. कागदपत्रांवर विचारपूर्वक सही करावी. आणखी वाचा

तूळ - आज नशिबाची साथ लाभेल. भावंडांशी सौहार्दतेचे संबंध राहतील. एखाद्या प्रवासाचे नियोजन कराल. नवीन कार्यारंभास आजचा दिवस अनुकूल आहे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. परदेशातून आनंददायी बातम्या येतील. हितशत्रूंवर मात करू शकाल. आणखी वाचा

वृश्चिक - आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. वाणी संयमित ठेवल्यास कुटुंबात सुख - शांति नांदू शकेल. विचारांवर असलेला नकारात्मक पगडा दूर सारावा लागेल. एखाद्या मांगलिक कामासाठी खर्च करावा लागेल. आणखी वाचा

धनु - आज शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. नियोजित कामे करु शकाल. आर्थिक फायदा होईल. प्रवास संभवतात. नातेवाइकां कडील एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. स्वकीयांना भेटून आनंद होईल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. आजचा आपला व्यवहार सामान्य राहील. आणखी वाचा

मकर - आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. कामांमध्ये सहकार्यांचा हस्तक्षेप वाढेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात व्यस्तता वाढेल व त्यात खर्चही होऊ शकतो. आरोग्य विषयक चिंता राहील. संतती व नातेवाईक ह्यांच्याशी मतभेद संभवतात. यश कष्टप्रदच होईल.  आणखी वाचा

कुंभ - नवीन कार्य सुरु करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. नोकरी - व्यवसायात फायदा संभवतो. एखाद्या स्त्रीमुळे आपली कामे होतील. आज मोठे आर्थिक लाभ होतील. सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धी मिळेल. संततीशी सलोख्याचे संबंध राहतील. पत्नी व संतती ह्यांच्या कडून एखादी आनंददायी बातमी मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. आणखी वाचा

मीन - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामे यशस्वीपणे होऊ शकतील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश झाल्याने आपला दिवस आनंदात जाईल. व्यापार वृद्धी होईल. वडील व वडिलधाऱ्यांकडून फायदा होईल. एखादा मोठा आर्थिक लाभ संभवतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. सरकार कडून फायदा होईल. मान - सम्मान मिळेल. आणखी वाचा

Web Title : आज का राशिफल, 29 सितंबर, 2025: खर्चों के बावजूद आर्थिक लाभ

Web Summary : आज मिश्रित भाग्य का दिन है। कुछ राशियों को थकान महसूस होगी, जबकि अन्य परिवार के साथ खुशी का आनंद लेंगे। कुछ के लिए खर्चों के बावजूद वित्तीय लाभ की भविष्यवाणी की गई है। कुछ राशियों को स्वास्थ्य और सावधानी बरतने की सलाह दी जाती है।

Web Title : Today's Horoscope, September 29, 2025: Financial Gains Despite Expenses

Web Summary : Mixed fortunes await. Some signs will feel fatigue, while others enjoy happy times with family. Financial gains are predicted for some, despite potential expenses. Health and caution are advised for a few signs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app