आजचे राशीभविष्य, २८ मार्च २०२६: उत्साहात वाढ होईल, नोकरीत पगार वाढ व पदोन्नती होण्याची शक्यता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 07:28 IST2026-03-28T07:28:17+5:302026-03-28T07:28:42+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope, March 28, 2026: Enthusiasm will increase, salary increase and promotion at work are possible! | आजचे राशीभविष्य, २८ मार्च २०२६: उत्साहात वाढ होईल, नोकरीत पगार वाढ व पदोन्नती होण्याची शक्यता!

आजचे राशीभविष्य, २८ मार्च २०२६: उत्साहात वाढ होईल, नोकरीत पगार वाढ व पदोन्नती होण्याची शक्यता!

Today Daily Horoscope

मेष: आज आपण अधिक हळवे व भावनाशील होण्याची शक्यता असल्याने आपणास सावध राहावे लागेल. आज लहान -सहान गोष्टींनी आपल्या मनास ठेच लागून मन दुःखी होईल. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आणखी वाचा 

वृषभ: आज आपल्या चिंता दूर होऊन आपल्या उत्साहात वाढ होईल. मन आनंदी राहील. जास्त भावूक व हळवे व्हाल. आपली कल्पनाशक्ती विकसित होईल. त्यामुळे सृजनशील साहित्य रचना करू शकाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल.  आणखी वाचा 

मिथुन: आज थोडा विलंब किंवा अडचणींनंतर निर्धाराने काम पूर्ण करू शकाल. आर्थिक नियोजन यशस्वी कराल. मिष्टान्नाची प्राप्ती होईल. विद्यार्जनाच्या दृष्टीने विद्यार्थांना आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. स्नेही व मित्र परिवाराच्या भेटीने आनंद होईल. आणखी वाचा 

कर्क: आज भावनांच्या प्रवाहात आपण मश्गुल व्हाल ज्यात कुटुंबीय व स्नेही, नातलग सहभागी होतील. भेट वस्तू मिळतील. स्वादिष्ट भोजन व बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखाल. मंगल प्रसंगांना हजेरी लावाल. आनंददायक प्रवास होतील. आणखी वाचा 

सिंह: आज जास्त चिंतातुर व भावनाशील राहिल्याने आपणास शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. चुकीच्या वाद - विवादामुळे भांडण निर्माण होईल. कोर्ट - कचेरी प्रकरणात सावध राहावे. उक्ती व कृती यात संयम राखणे आवश्यक आहे. आणखी वाचा 

कन्या: आज नाना प्रकारचे लाभ हेणारा दिवस आहे. व्यापार - व्यवसायाच्या विकासा बरोबरच उत्पन्न वाढेल. नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील. वैवाहिक जीवनात सुख - शांती लाभेल. पत्नी, संतती, वडीलधारी यांचेकडून लाभ होईल.  आणखी वाचा 

तूळ:  आज घरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीत पगार वाढ व पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आईकडून लाभ होईल. गृहसजावटीचे काम हाती घ्याल. कार्यालयात वरिष्ठ अधिकार्‍यांकडून कामाची स्तुती होऊन प्रेरणा सुद्धा मिळेल. आणखी वाचा 

वृश्चिक: आज प्रत्येक गोष्टीत नकारात्मक पैलूंचा अनुभव येईल. थकवा व आळस यांमुळे स्फूर्तीची उणीव राहील. मनात गाढ चिंता सतत येत राहतील. नोकरी - व्यवसायात अडचणी येतील. वरिष्ठ अधिकार्‍यांशी वादविवाद टाळा. परदेश गमनाच्या संधी येतील.  आणखी वाचा 

धनु: अनपेक्षित घटना, आजारपण, राग यामुळे आपला मानसिक व्यवहार हताश झालेला असेल. म्हणून रागावर नियंत्रण ठेवावे. सरकार विरोधी प्रवृत्ती घातक ठरेल. काही कारणाने वेळेवर भोजन मिळणार नाही. खर्चावर नियंत्रण ठेवा. भांडण - तंट्या पासून दूर राहा. आणखी वाचा 

मकर: आज आपल्या विचारात व व्यवहारात भावूकपणा जास्त राहील. तरीही आपण आपले कुटुंबीय व मित्रांसह दिवस आनंदात घालवाल. शरीर व मन, स्फूर्ती व प्रसन्नतेने भरेल. व्यवसाय वाढ होईल. दलाली, व्याज, कमिशन इत्यादी मार्गांनी उत्पन्नात वाढ होईल.  आणखी वाचा 

कुंभ:  आज केलेल्या कामात आपणाला यश, कीर्ती व सफलता मिळेल. कुटुंबात एकोपा राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.आपले विचार व व्यवहार यांत हळवेपणा राहील. नोकरीत सहकारी सहकार्य करतील. आणखी वाचा 

मीन: आज आपल्या अंगी असलेली सृजनात्मकता बाहेर पडून आपण साहित्य क्षेत्रात लेखन किंवा पठण कार्यात रूची घ्याल. हृदयाची कोमलता प्रियजनांस जवळ आणेल. स्वभावात हळवेपणा व रसिकता राहील. स्वास्थ्याच्या दृष्टीने दिवस मध्यम आहे. आणखी वाचा 

Open in app

Web Title : आज का राशिफल, 28 मार्च 2026: उत्साह में वृद्धि, नौकरी में पदोन्नति की संभावना!

Web Summary : उत्साह में वृद्धि; भावनात्मक संवेदनशीलता से सावधान रहें। मिथुन वित्तीय योजना में उत्कृष्ट। कर्क परिवार के साथ आनंद लेता है। कन्या को व्यवसाय में लाभ। तुला में नौकरी में उन्नति की संभावना। विवादों से बचें। मकर राशि वाले प्रियजनों के साथ खुशी का समय बिताएं।

Web Title : Horoscope Today, March 28, 2026: Enthusiasm Increases, Job Promotion Possible!

Web Summary : Enthusiasm rises; be cautious of emotional sensitivity. Gemini excels in financial planning. Cancer enjoys family time. Virgo gains in business. Libra sees potential job advancement. Avoid disputes. Capricorns spend joyful time with loved ones.