आजचे राशीभविष्य, २३ मार्च २०२६: आनंदात वेळ घालवाल, व्यापारात यश मिळेल; 'असा' जाईल आजचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 07:20 IST2026-03-23T07:20:20+5:302026-03-23T07:20:37+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य, २३ मार्च २०२६: आनंदात वेळ घालवाल, व्यापारात यश मिळेल; 'असा' जाईल आजचा दिवस
मेष: आज आपले शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. कुटुंबियांसह स्वादिष्ट भोजन घेऊन आनंदात वेळ घालवू शकाल. आर्थिक बाबतीत भविष्यासाठी उत्तम नियोजन करू शकाल. आज प्राप्तीत वाढ होईल. आणखी वाचा
वृषभ: आजचा दिवस उत्साह व प्रसन्नतेचा आहे. प्रकृती उत्तम असल्याने सुख व आनंद अनुभवाल. सगे - सोयरे किंवा मित्र यांच्याकडून उपहार मिळतील. प्रवास व स्वादिष्ट भोजन ह्यामुळे आजचा दिवस आणखीच आनंदी होईल. आणखी वाचा
मिथुन: आज आपणास आपल्या बोलण्यावर व व्यवहारात सावध राहावे लागेल. आपल्या वक्तव्याने काही गैरसमज होण्याची शक्यता आहे. आपले स्वास्थ्य खराब असू शकेल. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो. त्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा
कर्क: आजचा दिवस आपणासाठी लाभदायी आहे. उत्पन्न वाढेल. इतर काही मार्गानी पण आर्थिक लाभ होतील. मित्र भेटतील. स्त्रीवर्गाकडून विशेष लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. जोडीदार व संततीकडून आनंददायी बातमी मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील. संततीशी सुसंवाद साधू शकाल. आणखी वाचा
सिंह: आजचा दिवस नोकरी - व्यवसायात लाभदायी व यशदायी आहे. आपल्या कार्य क्षेत्रात वर्चस्व मिळवाल व प्रभाव पाडाल. पुरेपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल यामुळे आपली कामे सहजपणे पार पडतील. वरिष्ठ अधिकारी आपल्या कामाची कदर करतील. आणखी वाचा
कन्या: आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नातलगांसह प्रवासाचे बेत कराल. स्त्रीवर्गाकडून लाभाची शक्यता आहे. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. आणखी वाचा
तूळ: आज प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. टाकून बोलणे किंवा खराब व्यवहार ह्या मुळे वाद व भांडणे होतील. क्रोध, व कामवृत्ती ह्यावर संयम ठेवणे आवश्यक आहे. हितशत्रू सरसावतील. अचानक धनलाभ होईल. आणखी वाचा
वृश्चिक: आज आपणास नोकरी, व्यापार किंवा व्यवसाय ह्यातून भरपूर लाभ होणार आहे. तसेच मित्र, थोर मंडळी, सगेसोयरे यांच्या कडून ही लाभ होईल. सामाजिक समारोह, पर्यटन यासारख्या ठिकाणी जाऊ शकाल. आपण आनंदी राहाल. आणखी वाचा
धनु: आजचा दिवस आर्थिक व व्यापारी नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. कार्ये यशस्वी होतील. आज परोपकाराची भावना प्रबळ होईल. आजचा दिवस आनंदात व्यतित होईल. आणखी वाचा
मकर: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज बौद्धिक कामे व व्यवसायात आपण नवी विचार प्रणाली अंमलात आणाल. लेखन व साहित्य क्षेत्रात आपली सृजनात्मकता दिसेल. तरीही मनाच्या एका कोपर्यात अस्वस्थता जाणवेल. आणखी वाचा
कुंभ: आज नकारात्मक विचारांनी मन हताश होईल. आज उद्वेग व क्रोध आपल्या मनात जागा घेईल. खर्च वाढेल. बोलण्यावर संयम न राहिल्याने घरात मतभेद व भांडणे होतील. स्वास्थ्य खराब होईल. दुर्घटनेपासून स्वतःला सांभाळा. आणखी वाचा
मीन: आजचा दिवस कार्यात यश मिळण्यास व महत्वपूर्ण निर्णय घेण्यास उत्तम आहे. आज विचारांत स्थैर्य असेल. त्यामुळे कोणतेही कार्य व्यवस्थीत करू शकाल. कलाकारांना कला प्रदर्शन करण्याची उत्तम संधी मिळेल. आणखी वाचा
