आजचे राशीभविष्य, २० मार्च २०२६: प्रवास घडेल, कामाची प्रशंसा होईल; आजचा दिवस आनंदात जाईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 07:29 IST2026-03-20T07:18:05+5:302026-03-20T07:29:17+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope, March 20, 2026: Travel will happen, work will be appreciated; Today will be a day of joy! | आजचे राशीभविष्य, २० मार्च २०२६: प्रवास घडेल, कामाची प्रशंसा होईल; आजचा दिवस आनंदात जाईल!

आजचे राशीभविष्य, २० मार्च २०२६: प्रवास घडेल, कामाची प्रशंसा होईल; आजचा दिवस आनंदात जाईल!

मेष:  आजचा दिवस अस्वास्थ्य व त्रासाचा आहे. ताप, सर्दी, खोकला ह्यांचा त्रास संभवतो. इतरांचे भले करण्याच्या नादात आपणावर संकटे कोसळतील. शक्यतो आज आर्थिक व्यवहार टाळावेत. आणखी वाचा 

वृषभ:  आजचा दिवस शुभ फलदायी आहे. धनवृद्धी व पदोन्नती संभवते. व्यापारी सौदे यशस्वी होतील. कुटुंबीय व मित्रांसह आनंदाचे सुखद क्षण अनुभवू शकाल. एखादा प्रवास होऊन त्यातून काही लाभदायी नवीन संबंध प्रस्थापित होतील. आणखी वाचा 

मिथुन: आज शारीरिक, मानसिक सुख चांगले मिळेल. नोकरी - व्यवसायात आपल्या कामाची प्रशंसा होईल. व्यापारी कामाची कदर करतील. त्यामुळे आपणास जास्त प्रोत्साहन मिळेल. बढती संभवते. आणखी वाचा 

कर्क: आज नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल. विदेशी जाण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. विदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. मंगल कार्य किंवा प्रवास ह्यावर खर्च होईल. आणखी वाचा 

सिंह: आज प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. प्रकृतीसाठी खर्च करावा लागेल. नकारात्मक विचार आपणाला चुकीच्या मार्गावर नेणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. कुटुंबियांशी मतभेद होतील.  आणखी वाचा 

कन्या: दांपत्य जीवनात सुखद क्षण अनुभवाल. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाग घ्याल. वस्त्रे, अलंकार, वाहन इत्यादींची खरेदी होईल. भिन्नलिंगी व्यक्तीची ओळख प्रणयात परिवर्तित होईल. आणखी वाचा 

तूळ:  आज सामान्यतः प्रकृती उत्तम राहील. आजारी व्यक्तींना पण आराम वाटेल. घरातील सुख शांतीच्या वातावरणात वेळ घालवाल. कामात सफलता मिळाल्याने उत्साह वाढेल.  आणखी वाचा 

वृश्चिक: आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती करता येईल. नवीन कार्य शक्यतो आज सुरू करू नये. आर्थिक नियोजनासाठी अनुकूलता असल्यामुळे आपल्या कष्टाचे फळ मिळेल.  आणखी वाचा 

धनु: आज मनात औदासिन्य दिसून येईल. शारीरिक उत्साह व मानसिक तरतरी ह्यांचा अभाव असेल. कुटुंबीयांशी तणावाच्या प्रसंगामुळे घरातील वातावरण कलुषित होईल. आणखी वाचा 

मकर: आजचा दिवस नवीन कार्य हाती घेण्यास अनुकूल आहे. नोकरी, व्यापार व दैनंदिन कामात अनुकूल स्थिती असल्याने मन प्रसन्न राहील.  आणखी वाचा 

कुंभ:  आज वाद - विवाद होण्याची शक्यता आहे. एखाद्या मांगलिक कार्यासाठी खर्च होईल. घरातील वातावरण कलुषित होईल. कामात अपयश आल्याने मन दुःखी होऊन नैराश्य येईल.  आणखी वाचा 

मीन: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. उत्साह व स्वास्थ्य टिकून राहील. नवीन कार्यारंभासाठी दिवस अनुकूल आहे. मित्र व कुटुंबीयांसह भोजनाचा आस्वाद घ्याल. आणखी वाचा

Open in app

Web Title : राशिफल, 20 मार्च 2026: यात्रा, कार्यस्थल पर प्रशंसा, आनंदमय दिन!

Web Summary : मिलाजुला दिन। कुछ को स्वास्थ्य संबंधी समस्याएं, कुछ को धन लाभ और कार्यस्थल पर प्रशंसा। वृषभ राशि के लिए शुभ। मिथुन राशि की सराहना होगी। रिश्तों, स्वास्थ्य में सावधानी बरतें।

Web Title : Horoscope, March 20, 2026: Travel, praise at work, joyful day!

Web Summary : Mixed day. Some face health issues, others gain wealth, praise at work. Auspicious for Taurus. Gemini will be appreciated. Proceed cautiously in relationships, health.