आजचे राशीभविष्य १६ मार्च २०२६: 'या' राशींसाठी आजचा दिवस लाभदायक; घरात शुभ प्रसंगाचे नियोजन होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 07:34 IST2026-03-16T07:33:41+5:302026-03-16T07:34:04+5:30

Todays Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope March 16, 2026: Today is a beneficial day for 'these' zodiac signs; auspicious occasions will be planned at home! | आजचे राशीभविष्य १६ मार्च २०२६: 'या' राशींसाठी आजचा दिवस लाभदायक; घरात शुभ प्रसंगाचे नियोजन होईल!

आजचे राशीभविष्य १६ मार्च २०२६: 'या' राशींसाठी आजचा दिवस लाभदायक; घरात शुभ प्रसंगाचे नियोजन होईल!

मेष- आजचा दिवस थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास व प्रवास ह्यासाठी उत्तम आहे. व्यापार विषयक कामासाठी दिवस लाभदायक आहे. घरात शुभ प्रसंगाचे नियोजन होईल.  आणखी वाचा

वृषभ- आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. व्यवसायात नवीन विचार प्रणाली अंमलात आणाल. प्रकृतीकडे थोडे लक्ष द्यावे लागेल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. आणखी वाचा

मिथुन - आज आपल्या आहाराकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. मनातून नकारात्मक विचार काढून टाकल्याने नैराश्यातून बाहेर पडू शकाल. अवैध कामे करून अडचणीत सापडण्याचा शक्यतेमुळे त्यापासून दूर राहणे हितावह होईल. आणखी वाचा

कर्क  - आज आपण एखाद्याशी भावनात्मक नात्याने जोडले जाल. आनंद व मनोरंजनात्मक प्रवृत्तीमुळे मन प्रफुल्लित राहील. त्यात मित्रांचे सहकार्य मिळाल्याने मनोरंजनाचा आनंद द्विगुणित होईल. आणखी वाचा

सिंह-  आजचा दिवस व्यापार विस्ताराच्या दृष्टीने आर्थिक नियोजन करण्यास अनुकूल आहे. व्यावसायिकांना त्यांच्या हाताखाली असणार्‍या लोकांकडून व्यावसायिक लाभ होतील. धनप्राप्ती संभवते.  आणखी वाचा

कन्या-  वस्त्र व अलंकारांची खरेदी आनंददायी राहील. कलेत विशेष आवड निर्माण होईल. व्यापारातील विकासामुळे मनास आनंद होईल. आजचा दिवस व्यवसायासाठी अनुकूल आहे. आणखी वाचा

तूळ- आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. स्थावर संपत्ती विषयक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आईच्या तब्बेतीची काळजी राहील. कुटुंबात वाद संभवतात.  आणखी वाचा

वृश्चिक-  वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण होईल. स्थावर संपत्ती संबंधित कामाचे सुद्धा निराकरण होऊ शकेल. भावंडांशी जवळीक साधू शकाल. आणखी वाचा

धनु- आज संभाव्य मतभेद टाळण्यासाठी उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवावे लागेल. दिवसभर मनात गूढ व रहस्यमय विषयांचे विचार येतील. विद्यार्थ्यांना लेखन- वाचनात एकाग्रता ठेवावी लागेल. आणखी वाचा

मकर- आज व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आज प्रत्येक कार्य विना विघ्न पार पडेल. दांपत्य जीवनातील वातावरणात कटुता निर्माण होईल. गूढ विषयांत गोडी निर्माण होईल.  आणखी वाचा

कुंभ-  आज आपल्यातील धार्मिक भावना उफाळून येईल. आज एखाद्या धार्मिक कार्यासाठी खर्च कराल. कोर्ट- कचेरीच्या कामात यश मिळेल. पुण्यकार्यासाठी पैसा खर्च होईल. आणखी वाचा

मीन-  आज शेअर- सट्टा ह्यातून काही आर्थिक लाभ होईल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. व्यवसायात लाभ होईल. कुटुंबात सुख- शांती लाभेल. रमणीय ठिकाणी प्रवासाला जाल. मित्रां कडून लाभ होईल. आणखी वाचा

Open in app

Web Title : 16 मार्च 2026 राशिफल: इन राशियों के लिए आज का दिन शुभ।

Web Summary : मेष राशि को व्यवसाय और यात्रा में लाभ। वृषभ को सेहत का ध्यान रखना होगा। मिथुन नकारात्मक विचारों से बचें। कर्क मित्रता का आनंद लेंगे। सिंह व्यवसाय विस्तार की योजना बना सकते हैं। कन्या भौतिक सुखों का आनंद लें। तुला संपत्ति में सावधानी बरतें। वृश्चिक वैवाहिक समस्याओं का समाधान करें। धनु को अपने शब्दों पर नियंत्रण रखना होगा। मकर को अच्छा व्यावसायिक माहौल मिलेगा। कुंभ धार्मिक गतिविधियों पर खर्च करें। मीन को अटकलों से लाभ होगा।

Web Title : March 16, 2026 Horoscope: Auspicious day for these zodiac signs.

Web Summary : Aries benefits in business and travel. Taurus needs to watch their health. Gemini should avoid negative thoughts. Cancer will enjoy friendships. Leo can plan business expansion. Virgo enjoys material comforts. Libra must be cautious with property. Scorpio resolves marital issues. Sagittarius needs to control their words. Capricorn finds a good business environment. Aquarius spends on religious activities. Pisces gains from speculation.