Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - १ मार्च २०२३, व्यवसायात लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नात वाढ होईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 07:17 IST2023-03-01T07:15:55+5:302023-03-01T07:17:11+5:30

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope - March 1, 2023, Profit in business, promotion in job, increase in income | Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - १ मार्च २०२३, व्यवसायात लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नात वाढ होईल

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - १ मार्च २०२३, व्यवसायात लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नात वाढ होईल

मेष -आज चंद्र वृषभ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज कुटुंबात व कामाच्या ठिकाणी समजूतदारपणाने व्यवहार केल्याने संघर्ष टळतील. वाणीवर नियंत्रण न राहिल्याने कोणाशी वादविवाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. स्त्रियांकडून फायदा होईल. आणखी वाचा

वृषभ -  आज खंबीर विचारांमुळे आपण सावधपणे काम कराल. आर्थिक विषयांचे योग्य नियोजन कराल. आपली कलात्मक जाण वाढीस लागेल. वस्त्रे, अलंकार, सौंदर्य प्रसाधने व मनोरंजनावर खर्च होईल. कौटुंबिक सुख शांती लाभेल. आणखी वाचा

मिथुन - आज आपली वाणी किंवा व्यवहार इतरांशी गैरसमज निर्माण करू शकतात. कुटुंबीय व सगे - सोयरे यांच्याशी वागताना खूप सांभाळून राहावे लागेल. आजार किंवा दुर्घटना होण्यामुळे ते संबंध सांभाळा. मान - प्रतिष्ठेची हानी होईल. आणखी वाचा

कर्क - आजचा दिवस आर्थिक नियोजन व नव कार्यारंभ करण्यासाठी उत्तम आहे. उद्योग - व्यवसायात लाभ, नोकरीत बढती, उत्पन्नाच्या मार्गांत वाढ झाल्याने आपणाला खूप आनंद व समाधान वाटेल. मित्र, पत्नी, संतती अशा सर्वांकडून आनंददायी बातम्या मिळतील. मंगलकार्ये ठरतील. आणखी वाचा 

सिंह - आजचा दिवस नोकरी - व्यवसायात लाभदायी व यशदायी आहे. आपल्या कार्य क्षेत्रात वर्चस्व मिळवाल व प्रभाव पाडाल. पुरेपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल यामुळे आपली कामे सहजपणे पार पडतील. वरिष्ठ अधिकारी आपल्या कामाची कदर करतील. पदोन्नतीची शक्यता आहे. वडिलांकडून लाभ होईल. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस आपला परोपकारी कार्यात खर्च होईल. एखाद्या प्रवासात संवाद साधण्याची संधी मिळेल. परदेशगमनाचे योग येतील. भावंडांकडून लाभ होईल. कार्यालयात वरिष्ठांपासून सांभाळून राहा. आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा

तूळ - आजचा दिवस अचानक धनलाभाचा आहे. एखाद्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तरीही नवे कार्य हाती घेऊ नका. प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. हितशत्रू आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. आणखी वाचा

वृश्चिक - आज दैनंदिन घटनाक्रमात बदल होईल. आज आपण मौज- मजा व मनोरंजनाच्या विश्वात फिरण्याच्या मूडमध्ये असाल. मित्र व कुटुंबीयांची त्यात साथ मिळेल. सार्वजनिक जीवनात मान - प्रतिष्ठा वाढेल. नवीन वस्त्र प्रावरणे व वाहन सुख मिळेल. भागीदारीत लाभ होईल. दांपत्य जीवनात सुखद क्षणांचा अनुभव घ्याल. आणखी वाचा

धनु - आजचा दिवस आर्थिक व व्यापारी नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. कार्ये यशस्वी होतील. आज परोपकाराची भावना प्रबळ होईल. आजचा दिवस आनंदात व्यतित होईल. नोकरी - व्यवसायात उन्नती व मान - सन्मान प्राप्त होईल. आणखी वाचा

मकर - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज बौद्धिक कामे व व्यवसायात आपण नवी विचार प्रणाली अंमलात आणाल. लेखन व साहित्य क्षेत्रात आपली सृजनात्मकता दिसेल. तरीही मनाच्या एका कोपर्‍यात अस्वस्थता जाणवेल. परिणाम असा होईल की त्यामुळे शारीरिक थकवा व ऊबग येईल. संततीच्या प्रश्ना संबंधी चिंता निर्माण होईल. आणखी वाचा

कुंभ -आज नकारात्मक विचारांनी मन हताश होईल. आज उद्वेग व क्रोध आपल्या मनात जागा घेईल. खर्च वाढेल. बोलण्यावर संयम न राहिल्याने घरात मतभेद व भांडणे होतील. स्वास्थ्य खराब होईल. दुर्घटनेपासून स्वतःला सांभाळा.  आणखी वाचा

मीन - आजचा दिवस सुख शांतीत जाईल. व्यापार्‍यांना भागीदारीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. पति - पत्नी वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. मित्र, स्वजन ह्यांचा सहवास घडेल. प्रणयाराधन वाढेल. सार्वजनिक जीवनात प्रगती होईल. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope - March 1, 2023, Profit in business, promotion in job, increase in income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app