आजचे राशीभविष्य, २६ जून २०२३ : कर्कसाठी आनंदाचा तर वृश्चिक लाभाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 07:19 IST2023-06-26T07:17:49+5:302023-06-26T07:19:00+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope, June 26, 2023 : A day of happiness for Cancer and a day of gain for Scorpio | आजचे राशीभविष्य, २६ जून २०२३ : कर्कसाठी आनंदाचा तर वृश्चिक लाभाचा दिवस

आजचे राशीभविष्य, २६ जून २०२३ : कर्कसाठी आनंदाचा तर वृश्चिक लाभाचा दिवस

मेष: 26 जून, 2023 सोमवार च्या दिवशी आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस दूरगामी आर्थिक योजनेसाठी अनुकूल आहे. तसेच आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया फायदेशीर आहे. आणखी वाचा 

वृषभ: आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज आपल्या बोलण्याच्या जादूने कोणी प्रभावीत झाल्याने आपलाच फायदा होईल, तसेच मधुर व सौम्य वक्तव्याने नवे संबंध प्रस्थापित व्हायला मदत होईल. शुभ कार्य करण्याची प्रेरणा मिळेल.  आणखी वाचा 

मिथुन: आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे आपण कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. वैचारिक वादळामुळे मानसिक अस्वस्थता अनुभवाल. अती हळवेपणा आपली दृढता कमकुवत करेल. आणखी वाचा 

कर्क: आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज शारीरिक व मानसिक उत्साहा बरोबर घरातील वातावरणही आनंदी असेल. मित्र - स्नेहीजन ह्यांचा सहवास घडेल. मित्रांकडून लाभ होईल. मंगल कार्याची सुरूवात करायला आजचा दिवस अनुकूल आहे.  आणखी वाचा 

सिंह: आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आजचा दिवस कुटुंबियासह सुखात घालवाल. त्यांचे सहकार्य मिळेल. स्त्री मित्रांकडून विशेष मदत प्राप्त होईल. दूरचे मित्र व स्नेही ह्यांच्याशी साधलेला संपर्क फायदेशीर ठरेल. आणखी वाचा 

कन्या: आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. वैचारिक समृद्धी वाढेल. वाकचातुर्य व मधुरवाणी ह्यांच्या साह्याने मैत्रीपूर्ण संबंध विकसित करू शकाल. उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इत्यादींची प्राप्ती होईल. आणखी वाचा 

तूळ: आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज थोडा सुद्धा असंयम व अवैध व्यवहार आपणास अडचणीत आणेल. एखादी दुर्घटना संभवते. बोलण्यातील शिथीलता उग्र तक्रार वाढवण्याची शक्यता आहे. सगे सोयरे यांच्याशी पटणार नाही. आणखी वाचा 

वृश्चिक: आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आज नोकरी, व्यापार व व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रां बरोबर गाठीभेटी, प्रवास ठरवाल. विवाहेच्छुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी आहे. संतती किंवा पत्नी कडून लाभ होईल. आणखी वाचा 

धनु: आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज यश, कीर्ती व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असल्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे. स्वास्थ्य ठीक राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वडील तसेच सरकारकडून फायदा मिळेल.  आणखी वाचा 

मकर: आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आजचा दिवस बौद्धिक कार्य किंवा साहित्य लेखन ह्यासाठी अनुकूल आहे. व्यवसायात नवे विचार प्रवाह आणल्याने आपल्या कामाला नवे स्वरूप येईल. व्यवसाय क्षेत्रातील प्रतिकूल वातावरण मनाला अस्वस्थ करेल.  आणखी वाचा 

कुंभ: आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज निषेधात्मक व नकारात्मक विचारां पासून दूर राहावे. वाद, भांडणे ह्या पासून दूर राहा. राग व बोलण्यावर संयम ठेवा. कौटुंबिक वातावरण कलुशित राहील. आर्थिक चणचण जाणवेल. आणखी वाचा 

मीन: आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज दैनंदिन कामातून मोकळीक मिळून बाहेर हिंडण्या - फिरण्याला जाण्यास व मनोरंजनासाठी वेळ काढाल. कुटुंबीय व मित्रांना पण त्यात समाविष्ट करून घ्याल. त्यांनाही त्याचा आनंद वाटेल.  आणखी वाचा 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Open in app

Web Title: Today's Horoscope, June 26, 2023 : A day of happiness for Cancer and a day of gain for Scorpio