आजचे राशीभविष्य - १९ जानेवारी २०२५, प्रत्येक कार्यात यश मिळेल, वडीलधार्यांकडून लाभाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 07:20 IST2025-01-19T07:19:15+5:302025-01-19T07:20:18+5:30
Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य - १९ जानेवारी २०२५, प्रत्येक कार्यात यश मिळेल, वडीलधार्यांकडून लाभाची शक्यता
मेष - आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक आहे. आर्थिक लाभ होईल. दीर्घकालीन आर्थिक नियोजन कराल. शरीर व मन स्वस्थ राहील. मित्र व कुटुंबीयांसह दिवस आनंदात घालवाल. जास्त लोकांच्या संपर्कात याल. आणखी वाचा
वृषभ - आज आपल्या विचारांचा मोठेपणा व वाणीची करामत इतरांना प्रभावित व मंत्रमुग्ध करेल. इतरांशी सौहार्दाचे संबंध राहतील. बौद्धिक चर्चा, वाद - विवाद ह्यात यशस्वी व्हाल. वाचन - लेखनात रस घ्याल. आणखी वाचा
मिथुन - आज आपल्या द्विधा मनःस्थितीमुळे आपण कोणतेही महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. वैचारिक वादळामुळे मानसिक अस्वस्थता अनुभवाल. अती हळवेपणा आपली दृढता कमकुवत करेल. पाणी तसेच इतर प्रवाही पदार्थांपासून सावध राहा. आणखी वाचा
कर्क - आजचा दिवस कामात यश व नव्या कामाचा प्रारंभ ह्यासाठी अनुकूल आहे. मित्र व स्वकीयांचा सहवास आपणाला आनंद देईल. जवळचे प्रवास होतील. भावंडांशी सलोखा राहील. प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल. आणखी वाचा
सिंह - आज दूरस्थ स्नेही व नातलग ह्यांच्याशी झालेल्या पत्र व्यवहारामुळे लाभ होईल. कुटुंबात सुख शांती नांदेल. स्वादिष्ट भोजन मिळेल. आपले वाक्चातुर्य इतरांची मने जिंकेल. निर्धारित कामात यश मिळेल. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस आनंददायी असेल. शारीरिक व मानसिक दृष्टया उत्साही व प्रसन्न राहाल. आर्थिक लाभ होतील. मित्र व स्नेह्यांची भेट आनददायी राहील. आणखी वाचा
तूळ - आज आपले बोलणे व व्यवहार ह्यावर आपणास संयम ठेवावा लागेल. कुटुंबीय व इतरांशी उद्धटपणे बोलाचाली होण्याची शक्यता आहे. परोपकाराचा बदला उपकारात मिळतो. उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा
वृश्चिक - आज नोकरी, व्यापार व व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रां बरोबर गाठीभेटी, प्रवास ठरवाल. विवाहेच्छुक तरूण तरूणींसाठी चांगली संधी आहे. संतती किंवा पत्नी कडून लाभ होईल. वाडवडील किंवा थोरले बंधू त्या लाभात निमित्तमात्र बनतील. आणखी वाचा
धनु - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची छटा पसरेल. प्रत्येक कार्यात यश मिळेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. पिता व वडीलधार्यांकडून लाभाची शक्यता. व्यावसायिक क्षेत्रात प्रवास होईल. आणखी वाचा
मकर - आजचा दिवस बौद्धिक कार्य किंवा साहित्य लेखन ह्यासाठी अनुकूल आहे. व्यवसायात नवे विचार प्रवाह आणल्याने आपल्या कामाला नवे स्वरूप येईल. व्यवसाय क्षेत्रातील प्रतिकूल वातावरण मनाला अस्वस्थ करेल. शारीरिक थकवा जाणवेल. आणखी वाचा
कुंभ - आज अवैध काम व नकारात्मक विचारां पासून दूर राहावे. खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल. आरोग्य बिघडेल. कुटुंबात खडाजंगी होईल. खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक चणचण भासेल. आणखी वाचा
मीन - आज दैनंदिन कामातून मोकळीक मिळून बाहेर हिंडण्या - फिरण्याला जाण्यास व मनोरंजनासाठी वेळ काढाल. कुटुंबीय व मित्रांना पण त्यात समाविष्ट करून घ्याल. त्यांनाही त्याचा आनंद वाटेल. आणखी वाचा