आजचे राशीभविष्य- १९ जानेवारी २०२३: आज आर्थिक लाभ होईल, अपूर्ण कामे पूर्ण होतील; मतभेदाचे प्रसंग येतील, सावधानता बाळगा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 07:58 IST2023-01-19T07:19:09+5:302023-01-19T07:58:38+5:30

Today Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope - January 12, 2023: Today there will be financial gains, incomplete works will be completed; There will be times of disagreement, be careful... | आजचे राशीभविष्य- १९ जानेवारी २०२३: आज आर्थिक लाभ होईल, अपूर्ण कामे पूर्ण होतील; मतभेदाचे प्रसंग येतील, सावधानता बाळगा...

आजचे राशीभविष्य- १९ जानेवारी २०२३: आज आर्थिक लाभ होईल, अपूर्ण कामे पूर्ण होतील; मतभेदाचे प्रसंग येतील, सावधानता बाळगा...

मेष- आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवणे तसेच राग द्वेषापासून दूर राहणे हितावह राहील. गुप्तशत्रूंचा त्रास संभवतो. रहस्यमय व गूढ विषयांचे आकर्षण राहील. आणखी वाचा

वृषभ- आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज संसारात व दांपत्य जीवनात सुख - शांती अनुभवाल. कुटुंबीय व निकटचे मित्र यांच्या सह उत्तम भोजनाचा आस्वाद घ्याल. एखाद्या जवळच्या प्रवासाचे नियोजन कराल. आणखी वाचा

मिथुन- आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज आपली अपूर्ण कामे पूर्ण होतील. त्यात मनासारखे यश मिळेल. घरातील शांती व समाधानाचे वातावरण मनाला प्रसन्न ठेवेल. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक लाभ होईल. आणखी वाचा

कर्क- आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरूवात चिंता व उद्वेगाने होईल. आरोग्याच्या तक्रारी पण राहतील. नवे काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. आणखी वाचा

सिंह- आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. घरात वाद होतील. कुटुंबात अशी एखादी घटना घडेल की त्यामुळे आपणास दुःख होईल. अस्वस्थ रहाल. मन व्यग्र राहील. नकारात्मक विचारांमुळे आपणास त्रास होईल. मातेचे आरोग्य बिघडेल. शांत झोप लागणार नाही. संपत्तीच्या व्यवहारात सावध राहावे लागेल. आणखी वाचा

कन्या- आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज कोणत्याही कार्यात विचार पूर्वकच सहभागी व्हावे. बरोबरीच्या लोकांमध्ये वेळ चांगला जाईल. भावनात्मक संबंधातून हळवे व्हाल. आप्तेष्ट व मित्रांचा सहवास घडेल. आणखी वाचा

तूळ- आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपली मनःस्थिती द्विधा झाल्याने आपण कोणत्याही बाबतीत ठाम निर्णय करू शकणार नाही. अशा परिस्थितीत नवीन कामाची सुरवात न करणे हितावह राहील. आणखी वाचा

वृश्चिक- आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस साधारणच आहे. तन - मनाला सुख - आनंद मिळेल. कुटुंबियांसह उत्साहात व आनंदात वेळ घालवाल. मित्रांकडून भेटवस्तू मिळाल्याने मनाला आनंद होईल. आणखी वाचा

धनु- आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेदाचे प्रसंग उदभवतील. स्वभावात रागीटपणा येऊन वाद होतील. आरोग्यास त्रास संभवतो. वर्तन व बोलणे संयमित ठेवावे लागेल. आणखी वाचा

मकर- आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज विविध क्षेत्रातून लाभ होण्याचा दिवस असल्याने सामाजिक कार्यांतून लाभ होईल. मित्र व स्नेही यांच्या भेटीतून लाभ होईल. विवाहोत्सुकांचे विवाह सहज जुळतील. आणखी वाचा

कुंभ- आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल. त्यामुळे आनंदी राहाल. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहील. आणखी वाचा

मीन- आज चंद्र रास बदलून वृश्चिक राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. मनातील दुःख व अशांतता ह्याने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. शारीरिक थकवा जाणवेल. वरिष्ठांशी वाद संभवतात. संतती विषयी काळजी सतावेल. निरर्थक खर्च होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळा. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope - January 12, 2023: Today there will be financial gains, incomplete works will be completed; There will be times of disagreement, be careful...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app