आजचे राशीभविष्य - १९ फेब्रुवारी २०२५: व्यवसायात धन, मान अन् प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 07:04 IST2025-02-19T07:03:09+5:302025-02-19T07:04:11+5:30
Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य - १९ फेब्रुवारी २०२५: व्यवसायात धन, मान अन् प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल
मेष - चंद्र आज 19 फेब्रुवारी, 2025 बुधवारी तूळ राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आजचा दिवस मानसिक समाधानाचा आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. त्याच बरोबर सुखद प्रवासाचा आनंद व रूचकर भोजनाचा आस्वाद घेण्याची संधी सुद्धा लाभेल. एखादी हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल. तरीही आपले विचार व अती उत्साहाला आवर घालावा लागेल. विदेशी व्यापाराशी संबंधित लोकांना यश व लाभ मिळेल. आणखी वाचा
वृषभ - आजचा दिवस आनंददायी आहे. कामात आघाडीवर राहाल व योजनेनुसार कार्य पूर्ण करू शकाल. अपूर्ण कामे यशस्वीरीत्या तडीस न्याल. कामाच्या ठिकाणी सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. स्त्रीयांना माहेरहून एखादी सुखद बातमी मिळण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
मिथुन - आजचा दिवस नवीन कामाच्या आरंभाला अनुकूल नाही. जीवनसाथी व संतती ह्यांच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. चर्चा किंवा वाद - विवाद ह्यात मानहानी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. स्त्री मित्रांसाठी पैसा खर्च होईल. शारीरिक व मानसिक अस्वस्थते मुळे उत्साहात कमतरता जाणवेल. आणखी वाचा
कर्क - आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. छातीत दुखणे किंवा इतर व्याधींचा त्रास जाणवेल. कुटुंबियांशी खडाजंगी उडेल. मानहानी संभवते. स्त्री किंवा वाणी यामुळे एखादे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. पैसा खर्च होईल. वेळेवर भोजन मिळणार नाही. आणखी वाचा
सिंह - आज आपण शरीरात चैतन्य व मनाची प्रसन्नता अनुभवाल. मित्रां बरोबर अधिक घनिष्टता अनुभवाल. मित्र किंवा स्वजन यांच्यासह लहानशी सहल कराल. आर्थिक फायदा होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास मन आनंदीत करेल. नशिबाची साथ मिळेल. आजचा दिवस नवीन काम किंवा योजना स्वीकारण्यास अनुकूल आहे. आणखी वाचा
कन्या - कौटुंबिक सुख - शांती व आनंद ह्यामुळे आजचा दिवस आनंदात जाईल. आपल्या मधुर वाणीचा प्रभाव आज इतर लोकांना प्रभावीत करेल. प्रवासाची शक्यता आहे. मिष्टान्नासह आज आवडीचे भोजन मिळेल. आयात - निर्यात व्यापारात चांगले यश मिळेल. आणखी वाचा
तूळ - आज आपल्यातील रचनात्मक शक्ती प्रकट होईल. सृजनात्मकताही दिसून येईल. वैचारिक दृढता असेल व त्यामुळे कामे सफल बनतील. वस्त्रालंकार, मौज - मजेची साधने व मनोरंजन ह्यासाठी पैसे खर्च होतील. आत्मविश्वास वाढेल. आणखी वाचा
वृश्चिक - आज आपला पैसा व वेळ हौसमौज व मनोरंजन ह्यासाठी खर्च होईल. स्वास्थ्या संबंधी तक्रार राहील. मनाला चिंता लागून राहील. एखादी दुर्घटना संभवते. कुटुंबीय किंवा सगे - सोयरे यांच्याशी गैरसमज किंवा मतभेद होतील. कोर्ट - कचेरीच्या कामात सावध राहावे लागेल. आणखी वाचा
धनु - आज आर्थिक लाभ व सामाजिक प्रतिष्ठा मिळवून कौटुंबिक जीवनात सुद्धा सुख संतोष अनुभवाल. आज मिळकतीत वाढ व व्यापारात लाभ होईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासात सुखद क्षण अनुभवू शकाल. मित्रांसह पर्यटन स्थळाला भेट द्याल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. आणखी वाचा
मकर - आज व्यवसायात धन, मान व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. व्यापारासाठी धावपळ व वसुलीसाठी प्रवास ह्यातून फायदा संभवतो. वरिष्ठ आपल्यावर खूश असल्याने पदोन्नती संभवते. सरकार, मित्र किंवा संबंधितां कडून फायदा होईल. आणखी वाचा
कुंभ - आज आपण जरी शारीरिक दृष्टया अस्वस्थ असलात तरीही मानसिक दृष्टया स्वस्थता टिकवण्याचा प्रयत्न करा. आज काम करण्याचा उत्साह कमी राहील. नोकरीत वरिष्ठांच्या नाराजीस सामोरे जावे लागेल. मौज - मजा तसेच सहलीसाठी खर्च होईल. संतती बाबतीत चिंता राहील. प्रतिस्पर्ध्यां बरोबर चर्चेत सहभागी होऊ नका. आणखी वाचा
मीन - आज अवैध कामा पासून दूर राहावे. क्रोध व वाणीवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. सरकार विरोधी कृत्यांपासून दूर राहावे. प्रकृतीच्या देखभालीसाठी पैसा खर्च करावा लागेल. मानसिक बेचैनी जाणवेल. कुटुंबियांशी असणार्या संबंधात नकारात्मकता येऊ देऊ नका. आणखी वाचा