आजचे राशीभविष्य - १७ फेब्रुवारी २०२५: अपूर्ण कामे पूर्ण होतील, आर्थिक लाभ संभवतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 07:14 IST2025-02-17T07:11:46+5:302025-02-17T07:14:46+5:30

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope - February 17, 2025: Unfinished work will be completed, financial gains are possible | आजचे राशीभविष्य - १७ फेब्रुवारी २०२५: अपूर्ण कामे पूर्ण होतील, आर्थिक लाभ संभवतात

आजचे राशीभविष्य - १७ फेब्रुवारी २०२५: अपूर्ण कामे पूर्ण होतील, आर्थिक लाभ संभवतात

मेष - आज चंद्र रास बदलून 17 फेब्रुवारी, 2025 सोमवार च्या दिवशी कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रांत आपण प्रशंसेस पात्र ठराल. धनलाभाची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख व संतोष अनुभवू शकाल. बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल. वाणीवर संयम राखणे आवश्यक आहे. वैचारिक दृष्टया उत्साह वाटेल.  आणखी वाचा 

वृषभ - आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपले काम निर्धारित वेळेत नियोजनानुसार पूर्ण होईल. आर्थिक लाभ संभवतात. अपूर्ण कामे पूर्ण होतील. स्त्रीयांना माहेरहून आनंददायी बातमी मिळून काही लाभ सुद्धा होतील. प्रकृतीत सुधारणा होईल. आणखी वाचा 

मिथुन  -  आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपल्या मनात विविध विचार तरंग उमटतील. त्या विचारांत आपण गढून जाल. आज बौद्धिक कार्य कराल. मात्र वाद टाळावेत. आपण आज संवेदनशील व्हाल. आई व स्त्रियांशी संबंधित विषयात हळवे व्हाल. शक्यतो प्रवास टाळण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. आणखी वाचा 

कर्क  - आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्य सुरू करण्यास अनुकूलता लाभेल. मित्र व नातलग भेटतील. प्रिय व्यक्ती कडून आनंद मिळेल. आप्तेष्टांसह पर्यटनाचे बेत आखाल. मनात प्रसन्नता राहील. आज केलेल्या कार्यात यश मिळवू शकाल. नोकरी- व्यवसायात प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल.  आणखी वाचा 

सिंह -  आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस सुखा समाधानात जाईल. भावंडा बरोबरच्या संबंधात जवळीक निर्माण होईल. त्यांचे सहकार्य पण आपणास मिळेल. संबंधां मधील भावनांची जाणीव आपणाला होईल. एखाद्या रम्य पर्यटनस्थळी सहलीला जाण्याचे ठरवाल. आणखी वाचा 

कन्या - आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आपले विचार समृद्ध होतील. आपल्या वाणीमुळे आपण फायदेशीर संबंध जुळवाल. व्यावसायिक दृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे. प्रकृती उत्तम राहील. मन आनंदी राहील. आर्थिक लाभ होतील. सुख व आनंद मिळेल. चांगल्या बातम्या समजतील. आणखी वाचा 

तूळ  - आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपण आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. सृजनशीलता वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल. दृढ विचारांमुळे हाती घेतलेले काम पूर्ण कराल. आत्मविश्वास वाढेल. आणखी वाचा 

वृश्चिक - आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असून एखादा अपघात किंवा शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. शक्यतो वाद टाळावेत. आपल्या वक्तव्याने एखादा गैरसमज होण्याची शक्यता आहे. शारीरिक कष्ट व मानसिक चिंता ह्यामुळे त्रस्त व्हाल. हर्ष आनंदासाठी खर्च करावा लागेल.  आणखी वाचा

धनु - आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. योग्य प्रकारे आर्थिक नियोजन कराल. इतरांच्या सहकार्यासाठी प्रयत्न कराल. प्रत्येक कामात यश मिळेल. व्यापार विषयक योजना आखाल. दिवस आनंदात जाईल. व्यापारा निमित्ताने प्रवास घडतील. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल.  आणखी वाचा 

मकर - आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस व्यापार - व्यवसायासाठी लाभदायी आहे. जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी दिवस अनुकूल आहे. सरकार, मित्र व संबंधितांकडून लाभ होईल. त्यांच्या कडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. मात्र अग्नी, पाणी, अचानक आपत्ती ह्यापासून सावध राहावे लागेल.  आणखी वाचा 

कुंभ  - आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज अनेक विध विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल. मनातील संताप आवरण्याच्या प्रयत्नात काही अनिष्ट घडणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. चोरी, अवैध काम, निषेधार्ह काम व नकारात्मक विचारां पासून दूर राहणे हितावह राहील. वाणीवर संयम ठेवावा लागेल. कुटुंबात कोणाचा तरी विवाह ठरेल. आणखी वाचा 

मीन - आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपणातील लेखक किंवा कलाकारास कला व्यक्त करण्याची संधी मिळेल. व्यवसायात भागीदारी करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. दैनंदिन कार्ये व्यवस्थित पार पडल्याने दिवस आनंदात जाईल. आप्तेष्टांसह मेजवानी किंवा सहलीचे बेत आखाल. नाटक, चित्रपट, मनोरंजनाच्या ठिकाणांना भेट देऊन त्यांच्याशी जवळिक निर्माण कराल. आणखी वाचा 

Web Title: Today's Horoscope - February 17, 2025: Unfinished work will be completed, financial gains are possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app