आजचे राशीभविष्य: बुधवार 28 मे 2025; या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्र फलदायी, वैवाहिक जीवनात सुख, समाधान प्राप्त होईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 07:54 IST2025-05-28T07:43:53+5:302025-05-28T07:54:34+5:30
Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य: बुधवार 28 मे 2025; या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्र फलदायी, वैवाहिक जीवनात सुख, समाधान प्राप्त होईल
मेष - दिवसाची सुरवात द्विधा मनःस्थितीने होईल. इतरांशी वाद होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या गोड बोलण्याने इतरांची मने जिंकू शकाल. आज आपली मनःस्थिती दोलायमान असल्याने शक्यतो नवीन कार्याची सुरवात करू नये. आणखी वाचा
वृषभ - आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. दिवसाच्या सुरवातीस शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. कलेस वाव मिळेल. दुपार नंतर मात्र द्विधा मनःस्थिती झाल्याने आपण महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. आणखी वाचा
मिथुन - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. हाती घेतलेली कामे अपूर्ण राहतील. शारीरिक अस्वास्थ्य व मानसिक व्यग्रता जाणवेल. दुपार नंतर कामाचा उत्साह वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. आणखी वाचा
कर्क - आजचा दिवस व्यापारासाठी लाभदायी आहे. एखाद्या सहलीचा बेत आखू शकाल. दुपार नंतर मात्र शारीरिक व मानसिक अस्वस्थता जाणवेल. डोळ्यांच्या विकाराचा त्रास सतावेल. कुटुंबातील व्यक्तींसाठी खर्च करावा लागेल. आणखी वाचा
सिंह - आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी आहे. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. मित्र व स्नेह्यांकडून भेटवस्तू मिळतील. नवीन ओळखींचा भविष्यात व्यापारासाठी लाभ होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा
कन्या - आज आपणास आपल्या व्यवसायात धनलाभ होईल. दूरवरचे प्रवास करू शकाल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. परदेशस्थ स्नेह्यांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. दुपार नंतर नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. दिवसभर मनात सुखा- समाधानाची भावना राहील. आणखी वाचा
तूळ - नियोजित वेळेत कार्य पूर्ण करू शकाल. प्रकृतीकडे लक्ष देण्याच्या दृष्टीने बाहेरील पदार्थ खाऊ नका. प्रवासात अडचणी येतील. पण दुपार नंतर मात्र परदेशस्थ मित्र व संबंधितांकडून काही चांगली बातमी आल्याने आपला आनंद द्विगुणित होईल. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. वैवाहिक जीवनात सुख व समाधान प्राप्त होईल. आप्तांसह सामाजिक समारंभात सहभागी होऊ शकाल. एखादा प्रवास संभवतो. दुपार नंतर आरोग्य विषयक तक्रारी उदभवतील. आणखी वाचा
धनु - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले नसतानाही प्रलंबित कामे आपण पूर्ण करू शकाल. आर्थिक नियोजन करण्यात यशस्वी व्हाल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. आणखी वाचा
मकर - आपल्या वक्तृत्व शैलीने इतरांना प्रभावित कराल. गोड बोलून नवीन संबंध प्रस्थापित करू शकाल. आर्थिक नियोजनात यशस्वी व्हाल. नोकरीत सर्वांचे सहकार्य मिळवू शकाल. दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होईल. आणखी वाचा
कुंभ - विद्यार्थी, कलाकार व खेळाडू ह्यांच्यासाठी आजचा दिवस शुभ फलदायी आहे. पिता व शासनाकडून काही लाभ होऊ शकेल. खंबीर मनोबलामुळे कार्यपूर्ती होण्यात कोणतीही आडकाठी येणार नाही. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील, सबब शक्यतो बाहेरचे खाणे- पिणे टाळा.आणखी वाचा
मीन - आजचा दिवस काल्पनिक विश्वात घालवाल. सृजनशीलतेला अचूक दिशा मिळेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा बेत ठरवू शकाल. दैनंदिन कामे आत्मविश्वास व एकाग्रचित्ताने पूर्ण करू शकाल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासाच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा