आजचे राशीभविष्य : मंगळवार 27 मे 2025; उक्ती आणि कृतीवर नियंत्रण ठेवणे हिताचे, हितशत्रूंपासून सावध राहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 07:54 IST2025-05-27T07:43:19+5:302025-05-27T07:54:35+5:30
Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

आजचे राशीभविष्य : मंगळवार 27 मे 2025; उक्ती आणि कृतीवर नियंत्रण ठेवणे हिताचे, हितशत्रूंपासून सावध राहा
मेष - आज आपणास आर्थिक व्यवहार सावधपणे करावे लागतील. वाद - विवादा पासून दूर राहिल्यास कुटुंबियांशी निर्माण होणारी कटुता टाळू शकाल. खाण्या - पिण्याची काळजी घ्या नाहीतर स्वास्थ्य बिघडवू शकते. भोजन वेळेवर घेता येणार नाही. विनाकारण खर्च होतील. आणखी वाचा
वृषभ - आजचा दिवस फायद्याने भरलेला आहे. आज आपण शरीर व मनाने स्वस्थ राहाल. तसेच पूर्ण वेळ ताजेतवाने राहाल. आपल्यात असलेली कलात्मकता व सृजनात्मकता यांचा उपयोग कराल. आर्थिक योजना बनवाल. धनलाभ सुद्धा होऊ शकतो. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल. आणखी वाचा
मिथुन - आजचा दिवस कष्टदायी असल्याने प्रत्येक काम सावधपणे करावे लागेल. कुटुंबीय व संततीशी मतभेद संभवतात. आवेश व संतापावर नियंत्रण ठेवल्यास कामे बिघडणार नाहीत. शरीर प्रकृती बिघडेल. डोळ्यांचा त्रास जाणवेल. एखादा अपघात संभवतो. अचानकपणे खर्चात वाढ होईल. आणखी वाचा
कर्क - आजचा दिवस उत्साहात व आनंदात जाईल. व्यापारात लाभ होईल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. मित्रांशी चर्चा झाल्याचा आनंद होईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. पत्नी व संतती कडून सौख्य लाभेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. आणखी वाचा
सिंह - आज आपल्या कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीने प्रभावित होऊन आपणावर खूष होतील. दृढ मनोबल व खंबीर आत्मविश्वासामुळे आपले प्रत्येक काम यशस्वी होईल. वडिलांशी सौहार्दाचे संबंध राहतील व त्यांच्या कडून लाभ सुद्धा होईल. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. धर्मिक कार्य व प्रवासास आजचा दिवस अनुकूल आहे. मित्र व संबंधीतांशी होणार्या चर्चेमुळे आनंद होईल. विदेशातील स्नेह्यांकडून आनंददायी बातमी मिळेल. आणखी वाचा
तूळ - आज शक्यतो वाद टाळणे हितावह राहील. रागावू नका. उक्ती व कृतीवर नियंत्रण ठेवणे हितावह ठरेल. हितशत्रूं पासून सावध राहावे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अचानक धनलाभ संभवतो. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस मनोरंजनाचा आहे. मित्रांसह मौजमजा, मेजवानी इत्यादीत आजचा दिवस घालवाल. वाहन व भोजनसौख्य लाभेल. मान - प्रतिष्ठेत वाढ होईल. आणखी वाचा
धनु - आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. घरात आनंददायी वातावरण राहील. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता लाभेल. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकार्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. आणखी वाचा
मकर - निर्णयाच्या अभावामुळे मन चिंताक्रांत राहील. तब्बेतीच्या बाबतीतही चिंता राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संततीशी मतभेद होतील. त्यांच्या आरोग्याची काळजी राहील. प्राप्त परिस्थिती विचारात घेता प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळणे हितावह राहील. आणखी वाचा
कुंभ - आज मन संवेदनशील राहील्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात यश प्राप्ती होईल. आज ठरवलेली सर्व कामे व्यवस्थित पार पडतील. स्त्रीयांना सौंदर्य प्रसाधनांवर खर्च करावा लागेल. आणखी वाचा
मीन - महत्वाचे निर्णय घ्यायला आजचा दिवस अनुकूल आहे. सृजनशक्ती वाढेल. वैचारिक खंबीरपणा व मानसिक स्थैर्य ह्यामुळे कामात सहज यश मिळेल. जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. पर्यटनस्थळी आयोजित सहलीमुळे मन प्रसन्न राहील. आणखी वाचा