आजचे राशीभविष्य - 17 मार्च 2024; धन, मान-सन्मान वाढेल, सरकारकडून लाभ होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2024 07:18 AM2024-03-17T07:18:51+5:302024-03-17T07:35:16+5:30

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Sunday 17 March 2024 | आजचे राशीभविष्य - 17 मार्च 2024; धन, मान-सन्मान वाढेल, सरकारकडून लाभ होण्याची शक्यता

आजचे राशीभविष्य - 17 मार्च 2024; धन, मान-सन्मान वाढेल, सरकारकडून लाभ होण्याची शक्यता


मेष - चंद्र 17 मार्च, 2024 रविवारी मिथुन राशीस स्थित आहे. आज आपणाला नवीन कार्य करण्याची प्रेरणा झाली तरी विचारात स्थिरतेचा अभाव असल्यामुळे काही बाबींत त्रास होईल. नोकरी - व्यवसायात स्पर्धात्मक वातावरण असेल. स्त्रियांनी बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. आणखी वाचा

वृषभ - आज आपल्या मनाची दोलायमान अवस्था महत्वाच्या संधीपासून आपणाला दूर ठेवेल. आर्थिक लाभ होईल. आजचा दिवस विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस उत्साह व स्फूर्तीदायक आहे. दांपत्य जीवनात सुख - समाधान लाभेल. आर्थिक लाभ व नियोजन यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. नकारात्मक विचारांपासून दूर राहावे. आणखी वाचा

कर्क - आज शरीर व मन अस्वस्थ राहील. मनाची साशंकता व द्विधा ह्यामुळे निर्णय घ्यायला अतिशय कठिण होईल. कुटुंबियांशी मतभेद झाल्याने मन उदास होईल. आईच्या स्वास्थ्याची काळजी वाटेल. पैसा खर्च होईल. गैरसमज व वाद-विवाद ह्यापासून शक्यतो दूर राहावे. आणखी वाचा 

सिंह - आजचा दिवस आपणासाठी लाभदायक ठरेल, पण मनाची दोलायमान अवस्था हाती आलेली संधी गमावू देणार नाही याची दक्षता घ्या. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास लाभदायक ठरेल. वडीलधार्‍यांचे आशीर्वाद मिळतील. घरात मंगल कार्ये ठरतील. आणखी वाचा

कन्या - आज नवीन कार्याची सुरुवात करण्या विषयी मनात आखलेल्या योजना साकार होतील. धन, मान - सन्मान वाढेल. सरकार कडून लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात सुख शांती व सुसंवाद राहील. आणखी वाचा

तूळ - आज आपण बुद्धिवादी व साहित्य प्रेमी यांच्या सहवासात ज्ञानाच्या चर्चेत वेळ घालवाल. नवीन कामे हाती घ्याल. प्रकृती यथा तथाच राहील. संततीच्या समस्या मनात चिंता वाढवतील. आणखी वाचा

वृश्चिक - उक्ती व कृती यांवर आज संयम ठेवावा लागेल. दैनंदिन कामे वगळता इतर कामे हाती घेऊ नका. आजारी पडण्याचा संभव आहे. खाणे - पिणे सांभाळा. त्यामुळे मानसिक शांती मिळण्या बरोबरच व्याधी दूर राहतील. आणखी वाचा

धनु - मेजवानी, सहल, प्रवास, रुचकर भोजन, सुंदर वस्त्र धारणा ही आजच्या दिवसाची विशेषता आहे. मनोरंजन विश्वात रमून जाल. बौद्धिक, तार्किक विचार विनिमय होईल. भागीदारीत लाभ होईल. आणखी वाचा

मकर - आज व्यापार - व्यवसायात वाढ होईल. आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी असल्याने आर्थिक देवाण - घेवाणीत सरळपणा राहील. मातृ घराण्याकडून चांगली बातमी समजेल. प्रतिस्पर्ध्याला पराजित कराल. मात्र फायद्याच्या गुंतागुंतीपासून सावध राहावे. आणखी वाचा

कुंभ - आज आपण संतती व स्वतःचे स्वास्थ्य ह्या संबंधी चिंतीत राहाल. अपचन, पोटाचे दुखणे ह्याचा त्रास होईल. विचारात वेगाने बदल होऊन मानसिक अस्थिरता जाणवेल. आज नव्या कामाची सुरूवात करु नका. आणखी वाचा

मीन - आज शारीरिक व मानसिक भीती निर्माण होईल. कुटुंबियांशी वाद - विवाद होतील. आईचे स्वास्थ्य खराब राहील. नको त्या घटनामुळे आपला उत्साह कमी होईल. निद्रानाशाने त्रस्त व्हाल. धन व कीर्ती ह्यांची हानी होईल. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. आणखी वाचा

Web Title: Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Sunday 17 March 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app