आजचे राशीभविष्य - १६ एप्रिल २०२५, नोकरी - व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 08:04 IST2025-04-16T08:04:27+5:302025-04-16T08:04:51+5:30

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's horoscope - April 16, 2025, favorable conditions will prevail in job and business. | आजचे राशीभविष्य - १६ एप्रिल २०२५, नोकरी - व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील

आजचे राशीभविष्य - १६ एप्रिल २०२५, नोकरी - व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील

मेष -  आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवणे तसेच राग द्वेषापासून दूर राहणे हितावह राहील. गुप्तशत्रूंचा त्रास संभवतो. रहस्यमय व गूढ विषयांचे आकर्षण राहील. शक्यतो प्रवास टाळा. प्रवासात अनपेक्षित अडचणी उदभवतील. आणखी वाचा 

वृषभ -  आजचा दिवस शुभ फलदायी आहे. प्रकृती उत्तम राहील. मन प्रसन्न राहील. स्वकीय व जवळच्या लोकांसह जास्त वेळ घालवू शकाल. सामाजिक जीवनात यशप्राप्ती होईल. परदेशातून मनासारख्या बातम्या येतील. आणखी वाचा 

मिथुन  -  आजचा दिवस अपूर्ण कामे पूर्णत्वास जाण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. कुटुंबात हर्षोल्हासाचे वातावरण राहील. स्वास्थ्य उत्तम राहील. कामात यश व कीर्ती लाभेल. इतरांशी बोलताना आपल्या रागावर नियंत्रण ठेवून मितभाषी राहिल्यास मतभेदाचे प्रसंग उदभवणार नाहीत. धनप्राप्ती होईल. आणखी वाचा 

कर्क  -  आजचा दिवस अगदी शांत राहून घालवावा लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्यामुळे बेचैन राहाल. अचानक खर्च उदभवतील. प्रणयी जीवनात वाद होऊन मतभेद होतील. भिन्नलिंगी व्यक्तींकडे आकर्षित झाल्याने एखाद्या संकटात सापडाल. आणखी वाचा 

सिंह -  आज आपणास मानसिक अस्वस्थता जाणवेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. जमीन, घर अथवा वाहनाची खरेदी किंवा खरेदीपत्र करण्यास आजचा दिवस अनुकूल नाही. नकारात्मक विचारांमुळे निराशा येईल.  आणखी वाचा 

कन्या -  आज विचार न करता कोणतेही साहस करू नका. भावनात्मक संबंध प्रस्थापित होतील. भावंडांशी संबंधात सौहार्द राहील. मित्र व स्नेह्यांशी संवाद साधू शकाल. गूढ व रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील. आणखी वाचा 

तूळ  - आज आपला हट्टीपणा सोडून समाधानी वृत्तीने काम करावे. आपली असंयमित वाणी कोणाशी मतभेद निर्माण करेल. द्विधा स्थितीत अडकलेले मन कोणताही ठोस निर्णय घेऊ देणार नाही. आणखी वाचा 

वृश्चिक -   आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक प्रसन्नता वाटेल. कुटुंबियांच्या सहवासात आजचा दिवस आनंदात जाईल. मित्र व स्नेही यांच्याकडून भेटवस्तू मिळतील. प्रिय व्यक्तीशी सुसंवाद साधण्यात यश मिळेल. आणखी वाचा 

धनु -    आजचा दिवस समस्याग्रस्त आहे. कुटुंबीयांशी चर्चा होईल व दुःखी व्हाल. वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. मनाचा अतीउत्साह आवरावा लागेल. एखादा अपघात संभवतो.  आणखी वाचा 

मकर -   आजचा दिवस प्रत्येक गोष्टीत लाभदायक आहे. मित्रांची भेट होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय होईल. विवाहोत्सुक व्यक्तींच्या समस्या किरकोळ प्रयत्नांनी सुटतील. आणखी वाचा 

कुंभ  -  आज प्रत्येक काम सरळपणे होऊन त्यात यश सुद्धा मिळेल. नोकरी - व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. सरकारी कामे निर्विघ्नपणे पूर्ण होतील. वरिष्ठ अधिकारी सहकार्य करतील. प्रकृती उत्तम राहील. मानसिक उत्साह जाणवेल.  आणखी वाचा 

मीन - आजच्या दिवसाची सुरवात भीती व उद्विग्नता ह्याने होईल. शरीरास आळस व थकवा जाणवेल. कोणतेच काम पूर्ण न झाल्याने नैराश्य येईल. नशिबाची साथ मिळणार नाही. कार्यालयात वरिष्ठांशी मतभेद होतील. आणखी वाचा 

Web Title: Today's horoscope - April 16, 2025, favorable conditions will prevail in job and business.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app