Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - ३ डिसेंबर २०२२ : कुटुंबीयांसोबत मतभेद होतील, विनाकारण खर्च वाढतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 07:31 IST2022-12-03T07:31:01+5:302022-12-03T07:31:45+5:30

Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope - 3 December 2022 : There will be differences with family members, unnecessary expenses will increase. | Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - ३ डिसेंबर २०२२ : कुटुंबीयांसोबत मतभेद होतील, विनाकारण खर्च वाढतील

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - ३ डिसेंबर २०२२ : कुटुंबीयांसोबत मतभेद होतील, विनाकारण खर्च वाढतील

मेष - आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज दिवसभर प्रतिकूलतेचा सामना करावा लागेल. शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. विनाकारण खर्च वाढतील. आर्थिक गुंतवणूक करू शकाल. परोपकारात गमावून बसण्याचे संकट येईल.  आणखी वाचा

वृषभ - आजचा दिवस आनंदाचा आहे. व्यापार व प्राप्तीत वाढ होईल. कुटुंबीय व मित्र यांच्यासह आनंदात राहू शकाल. नवे संबंध व नवे परिचय व्यापारात लाभप्रद होतील. लहानसा प्रवास आनंददायी होईल. आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. सहकारी व वरिष्ठांशी संबंध चांगले राहतील. सामाजिक मान - मरातब वाढेल. बढतीची शक्यता आहे.  आणखी वाचा

कर्क  - आज आपण मंगल कार्य व परोपकारी कामात जास्त वेळ घालवाल. एखादा प्रवास संभवतो. शारीरिक व मानसिक दृष्टया प्रसन्न राहाल. नशिबाची साथ मिळेल. घरात भावंडांबरोबर आनंदात वेळ घालवाल.  आणखी वाचा

सिंह - आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. प्रकृतीसाठी खर्च करावा लागेल. नकारात्मक विचार आपणाला चुकीच्या मार्गावर नेणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. कुटुंबियांशी मतभेद होतील. आणखी वाचा

कन्या - आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. जोडीदाराशी जवळीक साधून सुखद क्षणांचा आनंद घ्याल. दांपत्य जीवनात गोडी राहील. भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटेल. सामजिक व सार्वजनिक क्षेत्रांत मान - प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा

तूळ - आज घरात आनंद व शांतीचे वातावरण राहील. सुखदायक घटना घडतील. कामात यश व सफलता मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आवश्यक कामांवरच खर्च होईल. नोकरीत यश मिळेल. मातुल घराण्याकडून चांगल्या बातम्या येतील. आणखी वाचा

वृश्चिक - आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य उत्तम राहील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. कार्यालयात सहकारी लोकांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल. मित्र - मैत्रिणी भेटतील. आणखी वाचा

धनु - आज शक्यतो प्रवास टाळावा. पोटाच्या तक्रारी निर्माण होतील. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्या संबंधी काळजी वाटेल. कामे अयशस्वी झाल्याने नैराश्य येईल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. साहित्य व कला ह्या विषयांची गोडी निर्माण होईल. आणखी वाचा

मकर - आज शारीरिक स्वास्थ्य व मनःस्थिती चांगली राहणार नाही. परिवारात संघर्षामुळे वातावरण खिन्न बनेल. शरीरात स्फूर्ती व उत्साहाचा अभाव जाणवेल. जवळच्या नातलगांशी मतभेद होतील. छातीत वेदना होतील. आणखी वाचा

कुंभ - मानसिकदृष्टया खूप मोकळेपणा जाणवेल. मनातील चिंतेचे ढग दूर होतील. मनात उत्साह संचारेल. भावंडांसह एखादे नवीन कार्य कराल व त्यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. आणखी वाचा

मीन - आनंद, उत्साह व प्रसन्न तन - मन ह्यामुळे आज चैतन्य व स्फूर्तीचा संचार होईल. नवीन कामे हाती घ्याल. त्यात यश मिळेल. एखाद्या मंगल कार्याला हजेरी लावाल. एखादा निर्णय घेताना मनःस्थिती द्विधा झाली तर तो निर्णय स्थगित ठेवावा. आणखी वाचा  

Web Title: Today's Horoscope - 3 December 2022 : There will be differences with family members, unnecessary expenses will increase.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app