आजचे राशीभविष्य २२ डिसेंबर २०२४ : या राशीला व्यापारात नफा संभवतो; वाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 07:17 IST2024-12-22T07:13:06+5:302024-12-22T07:17:57+5:30

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope 22 December 2024: This zodiac sign is likely to make profits in business; Disagreements with life partner are possible. | आजचे राशीभविष्य २२ डिसेंबर २०२४ : या राशीला व्यापारात नफा संभवतो; वाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात

आजचे राशीभविष्य २२ डिसेंबर २०२४ : या राशीला व्यापारात नफा संभवतो; वाहिक जोडीदाराशी मतभेद संभवतात

मेष

आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी असेल. साहित्य निर्मिती व कलात्मक अभिरुची वाढविण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. स्नेही भेटल्याने मन प्रसन्न राहील. दुपार नंतर घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील. आणखी वाचा

वृषभ

आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी असेल. आज मातेच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. स्थावर संपत्ती संबंधित कागदपत्रावर सह्या करणे टाळावे. नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. आणखी वाचा

मिथुन

आजचा दिवस सुखा - समाधानात जाईल. भावंडांशी सौहार्दता निर्माण झाल्याने आपला फायदा होईल. स्नेहीजन व मित्रांचा सहवास घडेल. दुपार नंतर मात्र मनावर नकारात्मक विचारांचा पगडा बसेल. भोजनाची वेळ पाळू शकणार नाही. आज आपण अधिक हळवे व्हाल. आणखी वाचा

कर्क

आजचा दिवस लाभदायी आहे. घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल. बोलण्याच्या सुंदर शैलीमुळे आपली कामे सहजपणे पूर्ण होतील. दुपार नंतर सहलीचा बेत ठरवू शकाल. आणखी वाचा

सिंह

 आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपली कार्य पद्धती खंबीर मनोबलयुक्त राहील. मोठया लोकांकडून लाभ होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. बोलण्यातील उग्रता कमी केल्यास कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. आणखी वाचा

कन्या

 आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी असेल. भावनेच्या भरात चुकीचे पाऊल पडेल. गैरसमज दूर करावे लागतील. एखादा वाद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील व्यक्तींशी मतभेद संभवतात.आणखी वाचा

तूळ

आज कार्यात अडचणी येण्याची शक्यता असल्याने नवे कार्य हाती न घेणे हितावह राहील. मनात सतत विविध विचार घोंगावत राहिल्याने मनाची खंबीरता कमी होईल. आणखी वाचा

वृश्चिक

 आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कामाची खूप प्रशंसा होईल. कामे सहजगत्या पूर्ण होतील. स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी दिवस अनुकूल आहे. सरकारी कामकाजात लाभ होईल. आणखी वाचा

धनु

आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्वभावातील चिडचिडेपणा वाढेल. एखादा प्रवास संभवतो. व्यवसायात त्रास किंवा वाद होण्याची शक्यता आहे. दुपार नंतर मात्र कामाच्या ठिकाणी वातावरण बदलेल. आणखी वाचा

मकर

आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आजारपणावर खर्च करावा लागेल. अचानक धन खर्चाची शक्यता आहे. कुटुंबियांशी मोठा वाद संभवतो.आणखी वाचा

कुंभ

आज व्यापारी आणि भागीदार यांच्याबरोबर जपून वागावे लागेल. वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होईल. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. घरातील वातावरण समाधानाचे राहील. आणखी वाचा

मीन

आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. कुटुंबातील व्यक्तींशी सुसंवाद राहील. दैनंदिन कामास विलंब होईल. सहकार्यांचे सहकार्य अल्प प्रमाणात मिळेल. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope 22 December 2024: This zodiac sign is likely to make profits in business; Disagreements with life partner are possible.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app