आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२३: कामात सफलता मिळेल, प्रेमात अनुकूल प्रतिसाद मिळेल, अचानक धनलाभ होऊ शकतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2023 07:34 IST2023-04-22T07:30:53+5:302023-04-22T07:34:58+5:30
Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२३: कामात सफलता मिळेल, प्रेमात अनुकूल प्रतिसाद मिळेल, अचानक धनलाभ होऊ शकतो
मेष- महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील, आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. प्रेमात असणाऱ्यांनी घरी सांगण्यास हरकत नाही.
वृषभ- मनात प्रसन्न विचार राहतील. प्रेमात असणाऱ्यांना अनुकूल प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू मिळतील. विवाहेच्छूंचा विवाह जुळेल. आपल्या अनेक अडचणी दूर होतील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. चमचमीत पदार्थ खाण्यास मिळतील.
मिथुन- ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. चैन, मौजमजा करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च होईल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरेल. एखादे महत्त्वाचे काम लांबणीवर पडेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. मात्र, पैशाची बचत होणार नाही.
कर्क- हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सोप्या रीतीने यश मिळेल. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. मित्र-मैत्रिणींना भेटण्याची संधी मिळेल, मौजमजा करता येईल. महत्त्वाच्या घडामोडी घडतील. चांगल्या बातम्या कळतील. मनात आत्मविश्वास राहील.
सिंह- घरात कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. त्या निमित्ताने लोकांची ये-जा चालू राहील. नोकरीत अनुकूल वातावरण राहील. सुखसोयी वाढवून मिळतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. सामाजिक कार्यात आघाडीवर राहाल.
कन्या- मनात आनंदी विचार राहतील. भाग्याची चांगली साथ तुम्हाला मिळेल. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मानसन्मान प्राप्त होईल. मुलांना योग्य संधी मिळेल. पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. चांगल्या बातम्या कळतील.
तूळ- अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात ठीकठाक परिस्थिती राहील. हाती घेतलेल्या प्रकल्पात काही अडचणी येतील. थोडा संयम बाळगण्याची गरज आहे.
वृश्चिक- व्यवसायात भरभराट होईल. भागीदारांचे चांगले सहकार्य मिळेल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल.. भेटवस्तूंची देवाण-घेवाण होईल. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ आहे. जीवनसाथीशी सूर जुळतील.
धनु- तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. जीवनसाथीची चांगली साथ राहील. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. मित्रांच्या संगतीत वाहवत जाऊ नका, विरोधकांच्या कारवाया उघडकीस येतील. थोडी तब्येतीची काळजी घ्या.
मकर- ग्रहमान अनुकूल राहील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता मिळेल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानी पडतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे. काहींना प्रवास घडून येतील. समाजात तुमचा गौरव होईल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील.
कुंभ- घरात आनंदी वातावरण राहील. एखाद्या समारंभाचे आयोजन केले जाईल. नातेवाईक, जवळचे मित्र- मैत्रिणी घरी येतील. नोकरीत काही अनुकूल बदल होतील. नवीन नोकरीच्या संधी मिळतील. वाहनसुख मिळेल. भावंडांशी सख्य राहील.
मीन- व्यवसायात मालाची विक्री चांगली होईल. हाती पैसा खेळता राहील. मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. जवळच्या प्रवासाचे योग येतील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्याशी बोलून मन मोकळे होईल, आर्थिक आवक राहील.