आजचे राशीभविष्य - २१ जानेवारी २०२३ - नोकरीत लाभ होईल, कुटुंबीयांशी गैरसमज होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2023 07:51 IST2023-01-21T07:50:58+5:302023-01-21T07:51:25+5:30

Today Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope - 21 January 2023 - Mind will be anxious, there is a possibility of misunderstanding with family members. | आजचे राशीभविष्य - २१ जानेवारी २०२३ - नोकरीत लाभ होईल, कुटुंबीयांशी गैरसमज होण्याची शक्यता

आजचे राशीभविष्य - २१ जानेवारी २०२३ - नोकरीत लाभ होईल, कुटुंबीयांशी गैरसमज होण्याची शक्यता

मेष: आज आपल्यात तरतरीतपणा व उत्साह यांचा अभाव राहील. तसेच रागाचे प्रमाण वाढल्याने काम बिघडण्याची शक्यता आहे.  कार्यालयात अधिकारी, विरोधक व घरात कुटुंबीय यांच्याशी वादात न पडता शांत राहून दिवस घालवणे अधिक चांगले. आणखी वाचा 

वृषभ: आज हाती घेतलेले काम पूर्ण न झाल्याने आपण निराश व्हाल. कार्यात यश मिळण्यासाठी जरा विलंब लागेल. खाण्या - पिण्यामुळे प्रकृती बिघडेल. नवीन काम सुरू करायला आजचा दिवस अनुकूल नाही. प्रवासात विघ्ने येतील. आणखी वाचा 

मिथुन: आजच्या दिवसाचा प्रारंभ आरामदायी व प्रसन्न वातावरणात होईल. पाहुणे व मित्रांच्या सहवासात मेजवानी, सहल, किंवा मनोरंजनाचा बेत ठरवाल. नवे कपडे, दागीने व वाहन खरेदी करू शकाल. मन आनंदाने भरून जाईल. आणखी वाचा 

कर्क:  आजचा दिवस चिंतामुक्त, खुशीचा राहील. कुटुंबियांना वेळ देऊ शकाल. त्यांच्या सहवासात घरात वेळ घालवाल. कार्यात सफलता मिळेल. नोकरदारांना नोकरीत लाभ होईल. सहकारी सहकार्य करतील. आणखी वाचा 

सिंह: आज आपण शारीरिक व मानसिक दृष्टया स्वस्थ राहाल. आंतरिक सृजनशीलता नवीन स्वरूपात व्यक्त होईल. साहित्य लेखनात नवीन कार्य प्रदान कराल. प्रिय व्यक्तीचा सुखद सहवास लाभेल. संततीच्या प्रगतीच्या बातम्या मिळतील.  आणखी वाचा 

कन्या: आज प्रत्येक कार्यात प्रतिकूलतेचा अनुभव येईल. आरोग्य बिघडेल. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबियांशी पटणार नाही व त्यामुळे घरात शांतता नांदणार नाही. सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता आहे. पाण्या पासून भीती आहे. आणखी वाचा 

तूळ:  सांप्रतकाळी धाडस करणे, एखादे काम हाती घेणे यांसाठी दिवस अनुकूल आहे. योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आपणास लाभदायक ठरेल. कुटुंबात भावंडांशी आपलेपणा व खेळीमेळीचे वातावरण असेल.  आणखी वाचा 

वृश्चिक:  आज कौटुंबिक कलह होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांशी गैरसमज होणाची शक्यता आहे. मनात येणारे नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. अनावश्यक खर्च उद्भवू नयेत ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा 

धनु: आज आपल्या कामात यश व आर्थिक लाभाची शक्यता आहे. एकाद्या मंगल कार्यास सहकुटुंब हजर राहाल. प्रवासाची शक्यता आहे. स्वकीयांची भेट आपणाला आनंदित करील. दांपत्य जीवनात जवळीक व गोडी निर्माण होईल. आणखी वाचा 

मकर: आज आपण एखाद्या मंगल कार्यांत मग्न राहाल. परोपकारी कार्यांवर पैसा खर्च होईल. नातलग, संबंधित व कुटुंबीय यांच्याशी जपून बोला कारण आपले बोलणे कोणाचे मन दुखावण्याची शक्यता आहे. खूप कष्ट व कमी यश यामुळे निराशा निर्माण होईल.  आणखी वाचा 

कुंभ: आज आपण एखाद्या नव्या कामाचे नियोजन किंवा सुरुवात करू शकाल. नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती होईल. स्त्री मित्र आपल्या प्रगतीत मदत करतील. आर्थिक लाभाच्या दृष्टीकोनातून आजचा दिवस फार चांगला आहे. आणखी वाचा 

मीन: आज नोकरी किंवा व्यवसायात यश मिळाल्याने तसेच वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळाल्याने आपणास अत्यंत प्रसन्नतेचा अनुभव येईल. व्यापार वृद्धी होईल. वसुलीची रक्कम प्राप्त होईल. वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. आणखी वाचा 

Web Title: Today's Horoscope - 21 January 2023 - Mind will be anxious, there is a possibility of misunderstanding with family members.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app