आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२४ : कन्येसाठी खर्चाचा अन् वृश्चिकसाठी लाभाचा दिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 07:30 AM2024-04-20T07:30:47+5:302024-04-20T07:44:23+5:30

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Today's Horoscope, 20 April 2024: A day of expense for Virgo and gain for Scorpio | आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२४ : कन्येसाठी खर्चाचा अन् वृश्चिकसाठी लाभाचा दिवस

आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२४ : कन्येसाठी खर्चाचा अन् वृश्चिकसाठी लाभाचा दिवस

मेष - आज आपणास शारीरिक व मानसिक थकवा जाणवेल. कामाच्या मानाने यशप्राप्ती कमी झाल्याने हताश होण्याची वेळ येईल. सट्ट्या संबंधी थोडे चिंतित राहाल. कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष होईल.   आणखी वाचा

वृषभ -  आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वास व दृढ मनोबलाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. वडिलां कडून आपणास काही लाभ होईल. विद्यार्थी अभ्यासात उत्तम यश मिळवतील. संततीचे शिक्षण व अन्य बाबी ह्यासाठी खर्च होईल.  आणखी वाचा

मिथुन- आजचा दिवस नवीन योजना सुरु करण्यास उत्तम आहे. व्यावसायिकांना सरकारकडून लाभ मिळेल. तसेच नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. भावंडे व शेजारी ह्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध राहतील.  आणखी वाचा

कर्क- आज आपण शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. परिणामतः मनात नकारात्मक विचार निर्माण होतील. गैरसमजातून काही मतभेद होतील. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही.  आणखी वाचा

सिंह- आज भरपूर आत्मविश्वास व दृढ निर्णयशक्ती ह्यांच्या जोरावर कोणतेही काम लगेच निर्णय घेऊन पूर्ण कराल. समाजात मान - प्रतिष्ठा वाढेल. वडील तसेच भावना प्रधान लोकांचा सहयोग प्राप्त होईल. मन आनंदी राहील.  आणखी वाचा

कन्या - आज शारीरिक अस्वस्थते बरोबरच मानसिक चिंता वाढतील. डोळ्यासंबंधी तक्रार निर्माण होईल. कुटुंबियांशी मतभेद होतील. कठोर बोलणे व गर्व ह्यामुळे कोणाशी भांडण होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. अचानक खर्च वाढतील.  आणखी वाचा

तूळ- आज विविध क्षेत्रातून फायदा मिळाल्याने शारीरिक व मानसिक दृष्टया आपण आनंदी व स्वस्थ राहाल. मित्रांचा सहवास, एखाद्या रम्य ठिकाणास भेट हे आज नक्की घडेल. वैवाहिक जीवनात सुख - शांतीचा अनुभव येईल. स्त्री मित्रांचा सहवास घडेल.  आणखी वाचा

वृश्चिक-  आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडेल. घरगुती जीवनात आनंद भरून राहील. मान - सन्मान उचांवेल. नोकरी - व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठ व वडिलधार्‍यांकडून फायदा होईल. धनलाभ होईल. आणखी वाचा

धनु- शरीरात थकवा, उबग व बेचैनी राहील. प्रकृती साधारण राहील. मन चिंतित असेल. आज शक्यतो प्रवास टाळावेत. संतती विषयी चिंता निर्माण होईल. नशिबाची साथ मिळणार नाही. नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. आणखी वाचा

मकर- आज आहाराकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा प्रकृतीत बिघाड होऊ शकेल. आजाराच्या तपासण्या, प्रवास किंवा व्यापारातील कामे यासाठी पैसा खर्च होईल. नकारात्मक विचार व राग दूर ठेवल्यास संकटा पासून आपला बचाव करू शकाल.  आणखी वाचा

कुंभ- आजचा दिवस भरपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल ह्यामुळे प्रणयाराधनेत आपण रंगून जाल. भिन्नलिंगी व्यक्तींचा परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री निर्माण होईल. आनंददायी सहल, प्रवास, स्वादिष्ट भोजन व नवे कपडे आपला आनंद द्विगुणीत करतील. आणखी वाचा

मीन- आज घरातील वातावरण सुख शांतीचे असल्यामुळे दैनंदीन कामे आपण आत्मविश्वास पूर्वक उत्तम प्रकारे करू शकाल. आज आपणास संताप व बोलणे ह्यावर संयम ठेवावा लागेल.  आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope, 20 April 2024: A day of expense for Virgo and gain for Scorpio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app