Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - 19 नोव्हेंबर 2022 : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल; कुटुंबीयांसोबत गैरसमज होतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 07:27 IST2022-11-19T07:26:50+5:302022-11-19T07:27:38+5:30
Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य - 19 नोव्हेंबर 2022 : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल; कुटुंबीयांसोबत गैरसमज होतील!
मेष - आज आपल्या उग्र स्वभावावर संयम ठेवणे हितावह राहील. शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल. कष्टाच्या प्रमाणात यश मिळू शकणार नाही. संततीची काळजी सतावेल. कामाच्या धावपळीमुळे कुटुंबियांना योग्य तितका वेळ आपण देऊ शकणार नाही. आणखी वाचा
वृषभ - आज खंबीर मनोबल व दृढ आत्मविश्वासाने आपली कामे कराल. कामात अपेक्षित यश मिळेल. स्त्रीयांना माहेरहून लाभदायी बातमी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. सरकारी कामात यश मिळेल. आणखी वाचा
मिथुन - आजचा दिवस नव्या संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. सरकारकडून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. स्नेही वा शेजार्यांशी गैरसमज झाले असल्यास ते दूर होतील. आणखी वाचा
कर्क - आज नकारात्मक दृष्टिकोनातून काही व्यवहार होतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य राहील. मनात दुःख व असंतोष राहील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहणार नाही. कुटुंबियांशी गैरसमज होतील. आणखी वाचा
सिंह - आज आपला आत्मविश्वास दुणावेल. कोणतेही काम करण्या विषयी त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील व वडीलधार्यांकडून लाभ होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा
कन्या - आज एखादा वाद होऊन आपला अहंकार दुखावण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा व मानसिक चिंता राहील. मित्र व स्वकीयांशी वैचारिक पातळीवर मतभेद होतील. स्वभावात उग्रपणा व संतापाचे प्रमाण वाढेल. आणखी वाचा
तूळ - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विविध क्षेत्रांतून लाभ झाल्याने आपली प्रसन्नता वाढेल. उत्पन्न वाढेल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल व त्यांच्याकडून लाभ सुद्धा होईल. प्रवास अथवा सहलीस जाण्यासाठी दिवस अनुकूल आहे.आणखी वाचा
वृश्चिक - आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडेल. घरगुती जीवनात आनंद भरून राहील. मान - सन्मान उचांवेल. नोकरी - व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठ व वडिलधार्यांकडून फायदा होईल. धनलाभ होईल. व्यापारी वर्गाचे येणे वसूल होईल. आणखी वाचा
धनु - आज प्रकृती यथा तथाच राहील. शारीरिक दृष्टया आळस व अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता व व्याकुळता राहील. व्यवसायात विघ्ने निर्माण होतील. नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. कोणत्याही कार्याचे नियोजन जपून करावे. आणखी वाचा
मकर - आज अचानकपणे खर्चाचे प्रसंग उदभवतील व त्यामुळे व्यावहारिक किंवा सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावे लागेल. क्रोध नियंत्रित ठेवावा. सकारात्मक विचारांनी नकारात्मकता दूर करावी लागेल. व्यवसायात अनुकूलता जाणवेल. आणखी वाचा
कुंभ - आजचा दिवस भरपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल ह्यामुळे प्रणयाराधनेत आपण रंगून जाल. भिन्नलिंगी व्यक्तींचा परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री निर्माण होईल. आनंददायी सहल, प्रवास, स्वादिष्ट भोजन व नवे कपडे आपला आनंद द्विगुणीत करतील. आणखी वाचा
मीन - आज घरातील वातावरण सुख शांतीचे असल्यामुळे दैनंदीन कामे आपण आत्मविश्वास पूर्वक उत्तम प्रकारे करू शकाल. आज आपणास संताप व बोलणे ह्यावर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा