Today's Daily Horoscope: आजचे राशीभविष्य- १८ नोव्हेंबर २०२२: तापट स्वभावावर नियंत्रण ठेवा, तर मिथुनसाठी नव्या सुरुवातीसाठी अनुकूल दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 07:35 IST2022-11-18T07:33:47+5:302022-11-18T07:35:32+5:30

Today's Horoscope- November 18, 2022: कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी वाचा तुमचं आजचं राशीभविष्य...

todays horoscope 18 November 2022 Control your passionate nature auspicious day for new beginnings for Gemini | Today's Daily Horoscope: आजचे राशीभविष्य- १८ नोव्हेंबर २०२२: तापट स्वभावावर नियंत्रण ठेवा, तर मिथुनसाठी नव्या सुरुवातीसाठी अनुकूल दिवस

Today's Daily Horoscope: आजचे राशीभविष्य- १८ नोव्हेंबर २०२२: तापट स्वभावावर नियंत्रण ठेवा, तर मिथुनसाठी नव्या सुरुवातीसाठी अनुकूल दिवस

मेष: आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आपल्या तापट स्वभावावर आज नियंत्रण ठेवणे हितावह राहील. मानसिक थकवा जाणवेल. कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी होईल. संतती विषयी काळजी राहील. आणखी वाचा..

वृषभ: आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज आपण कोणतेही कार्य खंबीर मनोबल व दृढ आत्मविश्वास ह्यांच्या जोरावर पूर्ण कराल. पैतृक घराण्याकडून आपणाला लाभ होईल. आणखी वाचा...

मिथुन: आजचा दिवस नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल आहे. शासनाकडून काही लाभ होतील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. भावंडे व शेजारी - पाजारी ह्यांच्याशी असलेले गैरसमज दूर होतील. आणखी वाचा...

कर्क: आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. निराशा व असंतोषाची भावना होईल. कुटुंबियांशी गैरसमज होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा...

सिंह: आज आपला आत्मविश्वास दांडगा असेल. कोणतेही काम करण्याचा निर्णय आपण झटकन घेऊ शकाल. वडील व वडीलधार्यांकडून लाभ होतील. सामाजिक मान - मरातब वाढेल. वाणी व कृती ह्यावर नियंत्रण ठेवणे हितावह राहील. आणखी वाचा...

कन्या: आज एखाद्या व्यक्तीशी आपला वाद होण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा व मानसिक तणाव वाढेल. एखाद्या गोष्टीवरून मित्रांशी गैरसमज होतील. स्वभावात तापटपणा वाढेल. एखाद्या मांगलिक कार्यासाठी खर्च होईल. आणखी वाचा...

तूळ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातून झालेल्या लाभातून आपल्याला समाधान मिळेल. प्राप्तीत वाढ संभवते. मित्रांकडून फायदा होईल पण त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देऊन आपले मन प्रफुल्लित होईल. आणखी वाचा...

वृश्चिक: आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण आपणास अनुकूल राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. आपली कामे सहजपणे पूर्ण होतील. मान मरातब वाढेल. आणखी वाचा...

धनु: आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपली प्रकृती नरम गरम राहील. आळस व अशक्तपणा जाणवेल. मनाला चिंता लागून राहील. व्यवसायात अडथळे येतील. शक्यतो नकारात्मक विचारां पासून दूर राहावे. आणखी वाचा...

मकर: आज अचानकपणे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. हा खर्च आजारपणावर, व्यावहारिक किंवा सामाजिक कामासाठी बाहेर जावे लागल्यामुळे होऊ शकतो. खाण्या - पिण्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा...

कुंभ: प्रणय, प्रेमालाप, प्रवास, पर्यटन, मनोरंजन हे आजच्या दिवसाचा भाग बनतील. मित्र व कुटुंबीयांसह भोजनासाठी बाहेर जाऊ शकाल. उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा...

मीन: आज दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील. घरात सुख शांती नांदेल. स्वभाव तापट राहील. उक्ती व कृती ह्यात समतोल साधावा लागेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आणखी वाचा...
 

Web Title: todays horoscope 18 November 2022 Control your passionate nature auspicious day for new beginnings for Gemini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app