आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२३: नोकरीत तुमचे पारडे जड राहील, कामे मार्गी लागतील, प्रवासात सतर्क राहा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 07:38 IST2023-04-13T07:26:08+5:302023-04-13T07:38:08+5:30

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस

Todays Horoscope 13 April 2023 relationship with life partner love life predictions wealth gain job career prediction | आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२३: नोकरीत तुमचे पारडे जड राहील, कामे मार्गी लागतील, प्रवासात सतर्क राहा.

आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२३: नोकरीत तुमचे पारडे जड राहील, कामे मार्गी लागतील, प्रवासात सतर्क राहा.

मेष- दिवसाची सुरुवात अनुकूल घटनांनी होईल. मनात आनंदी विचार राहतील. मित्रांच्या भेटी होतील. नोकरीत कामाचा ताण राहील. काहींना नवीन जबाबदारी मिळेल. घरी एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहुणे मंडळी येतील. आर्थिक प्राप्ती होईल.

वृषभ- दिवसाची सुरुवात थोडी दगदगीने होईल. एखाद्या कामानिमित्त धावपळ होईल. मनावर संयम ठेवणे आवश्यक आहे. प्रवासात सतर्क राहा. महत्त्वाची कामे सूर्यास्ताच्या नंतर हाती घ्या. आर्थिक आवक चांगली राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील.

मिथुन- आर्थिक व्यवहार जपून करा. महत्त्वाची कामे सूर्यास्ताच्या आत आटोपून घ्या. जीवनसाथीची चांगली साथ राहील. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. मात्र, कामाचा ताण राहील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा प्रवास शक्यतो टाळा.

कर्क- दिवसाची सुरुवात थोडी संथ गतीने होईल. आरोग्याच्या किरकोळ स्वरूपाच्या तक्रारी असतील. मात्र, दुपारच्या सत्रात अडचणी दूर होतील. योग्य सल्ला मिळेल. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. आर्थिक आवक चांगली राहील. कामे मार्गी लागतील.

सिंह- महत्त्वाची कामे दुपारच्या आत आटोपून घ्या. कामाचा ताण आटोक्यात आणण्यासाठी धडपड सुरू राहील. त्यातून चिडचिड होऊ शकते. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील.

कन्या- ग्रहमानाची साथ तुम्हाला मिळेल. नोकरी, व्यवसायात नवनवीन प्रयोग करून पाहिले जातील. नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील. मुलांची काळजी घ्या. त्यांना काय हवे नको ते विचारा. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. चांगल्या बातम्या कानावर पडतील.

तूळ- कामात सतत कार्यरत [राहाल काहींना कामानिमित्त फिरणे होईल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो हे लक्षात घेऊन त्यानुसार नियोजन करा. नोकरीत कामाचा ताण राहील. नातेवाईकांच्या भेटी होतील.

वृश्चिक- ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजून राहील. वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद मिळेल. व्यापारात प्रगती होईल. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. मनात काळजीचे विचार राहतील. मात्र, जीवनसाथी तुम्हाला सांभाळून घेईल. मुलांना यश मिळेल.

धनू- प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरु राहील. उत्साहाने कामे 'कराल. वडिलोपार्जित संपत्तीच्या कामात काही अनपेक्षित अडचणी येतील, नोकरीत चांगली परिस्थिती राहील. घरात एखादी गुप्त विता लागून राहील. मात्र, त्यातून मार्ग निघेल.

मकर- महत्त्वाची कामे सूर्यास्ताच्या नंतर हाती घ्या. मनात शंका न ठेवता कामे करा. खर्चाचे प्रमाण वाढते राहील. दूरच्या प्रवासाचे योग येतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण सामान्य राहील. प्रसिद्धी, मानसन्मान मिळेल.

कुंभ- महत्त्वाची कामे दुपारच्या सत्रात आटोपून घेतलेली बरी. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. वसुलीसाठी सकाळच्या सत्रात प्रयत्न करा. नोकरीत कामाचा ताण कमी राहील. घराच्या सजावटीसाठी पैसे खर्च कराल.

मीन- घरात आनंदी वातावरण राहील. लोकांची सतत ये-जा चालू राहील. आर्थिक व्यवहार जपून करा. उसने पैसे देताना विचार करून द्या. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. जीवनसाथीची चांगली मदत मिळेल. भावंडांची ख्यालीखुशाली कळेल.

Web Title: Todays Horoscope 13 April 2023 relationship with life partner love life predictions wealth gain job career prediction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app