Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ११ मार्च २०२३; अचानक धनलाभाची शक्यता, मनावरचा भार कमी होऊ शकेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 07:25 IST2023-03-11T07:24:10+5:302023-03-11T07:25:02+5:30
Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope: आजचे राशीभविष्य - ११ मार्च २०२३; अचानक धनलाभाची शक्यता, मनावरचा भार कमी होऊ शकेल
मेष - आज चंद्र कन्या राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस आनंददायी आहे. आर्थिक लाभ झाल्याने गुंतवणुकीशी संबंधित योजना यशस्वीपणे पूर्ण होतील. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील. जनसंपर्क वाढेल. आपल्या व्यावसायिक क्षेत्रा बाहेरील लोकांशी सुद्धा संपर्क होईल. बौद्धिक कार्यात रुची वाढेल. जवळपासचे प्रवास घडतील. आणखी वाचा
वृषभ - आजचा दिवस आनंददायी आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपले काम निर्धारित वेळेत नियोजनानुसार पूर्ण होईल. आर्थिक लाभ संभवतात. अपूर्ण कामे पूर्ण होतील. स्त्रीयांना माहेरहून आनंददायी बातमी मिळून काही लाभ सुद्धा होतील. आणखी वाचा
मिथुन - वैवाहिक जोडीदार व संतती ह्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. शक्यतो वाद -विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहावे. मानहानी होण्याची शक्यता आहे. मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. पोटाच्या तक्रारी उदभवतील. आणखी वाचा
कर्क - आज भावंडांकडून लाभ होतील. मित्र व स्वकीयांच्या सहवासाचा आनंद लाभेल. रम्य स्थळी सहलीस जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. भावनेला प्राधान्य दिल्याने संबंध सुखद होतील. आणखी वाचा
सिंह - आज विविध योजनांच्या विषयांवर अधिक विचार केल्यामुळे द्विधा अवस्था होईल. तरीही कुटुंबीयांसह चांगले वातावरण राहील्याने आपली प्रसन्नता वाढेल. दूरस्थ व्यक्ती किंवा संस्था यांच्या बरोबरचे संबंध दृढ होतील की ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. अतिरिक्त खर्च संभवतात. आणखी वाचा
कन्या - आजचा दिवस आनंददायी असेल. शारीरिक व मानसिक दृष्टया उत्साही व प्रसन्न राहाल. आर्थिक लाभ होतील. मित्र व स्नेह्यांची भेट आनददायी राहील. आणखी वाचा
तूळ - आज आपणास क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. शक्यतो वाद टाळावेत. कुटुंबियांशी एखाद्या विषयावर वाद संभवतात. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. विशेषतः डोळ्यांची निगा राखावी लागेल. एखादा अपघात संभवतो. कोर्ट - कचेरीच्या प्रकरणात लक्ष घालावे लागेल. एखादी मानहानी संभवते. आणखी वाचा
वृश्चिक - आजचा दिवस लाभदायी आहे. सांसारिक सौख्य मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. व्यवसायात विशेष लाभ होतील. वरिष्ठांची आपल्यावर मर्जी राहील. मित्र भेटतील. आणखी वाचा
धनु - आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची छटा पसरेल. प्रत्येक कार्यात यश मिळेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. पिता व वडीलधार्यांकडून लाभाची शक्यता. व्यावसायिक क्षेत्रात प्रवास होईल. कामाचा व्याप वाढेल. आणखी वाचा
मकर - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. बौद्धिक व व्यावसायिक क्षेत्रात आपण नव्या विचारांनी प्रभावित व्हाल. सृजनात्मक क्षेत्रात नवीन रचना क्षमतेचा परिचय करून द्याल. तरीही मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. संतती विषयक प्रश्न आपणाला दुःख देतील. पैश्यांचा अपव्यय होणार नाही याकडे लक्ष द्या. आणखी वाचा
कुंभ - आज अवैध कृत्यां पासून दूर राहावे. वाणीवर संयम ठेवल्यास पारिवारिक संघर्ष टाळू शकाल. प्रत्येक घटना व्यक्ती व वस्तू ह्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहाल. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण जाणवेल. क्रोधावर संयम ठेवा. आणखी वाचा
मीन - आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आजारपणावर अतिरिक्त पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांशी संयमाने वागावे लागेल. मात्र, अचानक धनलाभाची शक्यता असून आपल्या मनावरचा भार काही प्रमाणात कमी होऊ शकेल. आणखी वाचा