Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ०८ फेब्रुवारी २०२३: सिंह राशीचा आत्मविश्वास दुणावेल, तर मीनसाठी फलदायी दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 07:23 IST2023-02-08T07:22:48+5:302023-02-08T07:23:47+5:30

Today Daily Horoscope: कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी जाणून घ्या तुमचं राशीभविष्य...

Todays Horoscope 08 February 2023 Leo will be confident while Pisces will have a fruitful day | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ०८ फेब्रुवारी २०२३: सिंह राशीचा आत्मविश्वास दुणावेल, तर मीनसाठी फलदायी दिवस

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, ०८ फेब्रुवारी २०२३: सिंह राशीचा आत्मविश्वास दुणावेल, तर मीनसाठी फलदायी दिवस

मेष: आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपल्या उग्र स्वभावावर संयम ठेवणे हितावह राहील. शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल. कष्टाच्या प्रमाणात यश मिळू शकणार नाही. संततीची काळजी सतावेल. आणखी वाचा...

वृषभ: आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज खंबीर मनोबल व दृढ आत्मविश्वासाने आपली कामे कराल. कामात अपेक्षित यश मिळेल. स्त्रीयांना माहेरहून लाभदायी बातमी मिळेल. आणखी वाचा...

मिथुन: आजचा दिवस नव्या संकल्पना राबविण्याच्या दृष्टीने अनुकूल आहे. सरकार कडून लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. आणखी वाचा...

कर्क: आज नकारात्मक दृष्टिकोनातून काही व्यवहार होतील. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य राहील. मनात दुःख व असंतोष राहील. डोळ्यांचा त्रास जाणवेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहणार नाही. आणखी वाचा...

सिंह: आज आपला आत्मविश्वास दुणावेल. कोणतेही काम करण्या विषयी त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील व वडीलधार्‍यां कडून लाभ होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल. आणखी वाचा...

कन्या: आज एखादा वाद होऊन आपला अहंकार दुखावण्याची शक्यता आहे. शारीरिक थकवा व मानसिक चिंता राहील. मित्र व स्वकीयांशी वैचारिक पातळीवर मतभेद होतील. स्वभावात उग्रपणा व संतापाचे प्रमाण वाढेल. आणखी वाचा...

तूळ: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विविध क्षेत्रांतून लाभ झाल्याने आपली प्रसन्नता वाढेल. उत्पन्न वाढेल. मित्रांसाठी खर्च करावा लागेल व त्यांच्याकडून लाभ सुद्धा होईल. प्रवास अथवा सहलीस जाण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आणखी वाचा...

वृश्चिक: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण आपणास अनुकूल राहील. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. आपली कामे सहजपणे पूर्ण होतील. मान मरातब वाढेल. नोकरीत बढती मिळेल. आणखी वाचा...

धनु: आज प्रकृती यथा तथाच राहील. शारीरिक दृष्टया आळस व अशक्तपणा जाणवेल. मानसिक चिंता व व्याकुळता राहील. व्यवसायात विघ्ने निर्माण होतील. नकारात्मक विचार दूर सारावे लागतील. कोणत्याही कार्याचे नियोजन जपून करावे. आणखी वाचा...

मकर: आज अचानकपणे खर्चाचे प्रसंग उदभवतील व त्यामुळे व्यावहारिक किंवा सामाजिक कार्यासाठी बाहेर पडावे लागेल. क्रोध नियंत्रित ठेवावा. सकारात्मक विचारांनी नकारात्मकता दूर करावी लागेल. व्यवसायात अनुकूलता जाणवेल. आणखी वाचा...

कुंभ: आज खंबीर मन व दृढ आत्मविश्वासाने आपण प्रत्येक काम कराल. प्रवास - सहलीची शक्यता आहे. स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद व नवी वस्त्र परिधान करण्याचे प्रसंग येतील. आणखी वाचा...

मीन: आजचा दिवस शुभ फलदायी आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. शारीरिक स्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. स्वभावातून अती उत्साह व उग्रता काढून टाकणे हितावह होईल. आणखी वाचा...
 

Web Title: Todays Horoscope 08 February 2023 Leo will be confident while Pisces will have a fruitful day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app